बटाटा कचोरी




Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

Batata kachori

This Batata kachori or vada is appetizing lunch time snack. It can be served as a appetizer or went with the full dinners. Here is the recipe to prepare it.

babata kachoriसाहित्य -: मोठे सहा उकडलेले बटाटे, एक वाटी कोवलेले ओले खोबरे,बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या, अर्ध्या लिंबाचा रस, चवीला थोडी साखर,चवी नुसार मीठ,काजू तुकडे, किसमिस, एक चमचा भाजलेले तिळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, कॉर्नफ्लावर, तेल.
कृती -: प्रथम बटाट्याची साले काढून घेउन ते बारीक कुस्करून घ्यावे. त्यात चवी नुसार मीठ घालावे. त्यात कॉर्नफ्लावर घालून मिसळून मळून घ्यावे. नंतर खोवलेल्या खोबर्यात मिरची, कोथिंबीर, काजू तुकडे, किसमिस, तिळ, चविसाठी थोडी साखर, चवी नुसार मीठ, लिंबाचा रस घालून मिश्रण तयार करून ठेवावे. नंतर बारीक मळून ठेवलेल्या बटाट्याचे लिंबा एवढे गोळे करून त्याची खोल वाटी सारखे करून त्यात खोबऱ्याचे तयार असलेले मिश्रण थोडे टाकून बंद करून थोडे चपटे गोळे करून ठेवावे, या प्रमाणे सर्व कचोऱ्या वळून ठेवाव्या. व त्या वर थोडा आरासर अगर कॉर्नफ्लावर घालून कचोरीला लाऊन ठेवणे म्हणजे कचोरी एकमेकाला चिकटणार नाही. व तळताना फुटणारही नाही. अश्या प्रकारे बनविलेल्या सर्व कचोऱ्या गरम तेलात गुलाबीसर तळाव्यात. व सर्व्ह करताना टोमाटो सॉस किंवा दह्याची चटणी सोबत द्यावी.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu