मनकारी प्रतिक्रिया : अचेतनामधून unconscious निघालेले विचार विवेकाच्या पातळीवर येऊन आदळतात. हे विचार योग्य असल्याच चेतनाकडे पाठविणे व अयोग्य असल्यास त्याचा तिथेच खात्मा करनं हे काम विवेकाद्वारे दमनकारी प्रतिक्रिये कडून करवून घेतले जाते. म्हणजे योग्य विचारांना आचरणात आणण्यासाठी चेतना कडे पाठविणे व आय्ग्य विचारांचे दमन (Vicharanche daman)करण्याचे काम रीप्रेष्ण या क्रियेद्वारे घडते.
रुपांतरण परिवर्तन : अचेतना पासून निघालेले विचार विवेकाच्या पातळीवर येतात व तेथे त्याची छाननी होते. नंतर हेविचार चेतना पर्यंत येतात. या ठिकाणी वास्तवतेतील विचारांनाच चालना मिळते. वत यांचा व्यवहारात विचार केला जातो वास्तवतेला अनेक पैलू आहेत. धर्माचे, स्वत:संस्कृतीचे, काळाचे, समाजाचे, देशाचे इ. या बाबींचा विचार करून योग्य विचारांच्या चाकोरीतून आपणास वाटचाल करावी लागते. पण वाईट विचार मनात आला तर तो वास्तवतेतच बसत नाही. म्हणून त्यावर अंमल सुद्धा करता येत नाही. अश्या वेळी छातीत धडधडणे, जीव घाबरणे, हातपाय थरथरणे (vibrations in legs and hands) , तोंडास कोरड पडणे (Dry Mouth), मनाची घालमेल म्हणजेच तळमळ होऊन मनात चांगले विचार सुद्धा येणे अशक्य बाब बनते. अश्यावेळी यातून मार्ग काढण्याकरिता विवेक धाऊन येतो व क्रियाशील होऊन आपली प्रतिष्ठा व्यक्तित्व सबळ ठेवण्याकरिता तगमग, काळजी, चिंता यांना दुसरीकडे वळविण्यास सुरवात करतो. जेणेकरून मनाची तगमग कमी होऊन सामान्यपणे जीवन जगता येईल. मग काळजी कुठे रुपांतरीत करतो तर आपल्याला अश्या व्यक्तीची भीती वाटते कि ज्यांच्याशी रोजच काम पडते. (उदा वडील.) पण वडिलांची भीती वाटणे यांसारखे मोठे दु:ख नाही. व त्यांची भीती घालविण्याचा मार्गही सापडत नाही. अश्या वेळी हि भीती दुसर्या कुठल्या तरी वस्तु वर किंवा प्राण्यावर टाकली जाते. समजा वडील एकटे तासन तास वाचन करतात मग त्या त्यांच्या एकटेपणाचीच भीती मनात घर करते. आणि अश्या वेळी कुणीही एकटे दिसले कि मनात भीती वाटते. समजा बॉसची ऑफिस मध्ये भीती वाटत असेल आणि बॉस ला चोर पावलांनी येऊन निरीक्षण करण्याची सवय असेल. अश्यावेळी बॉसचीही भीती वाटणे बंद होऊन पद्चाप, मांजर, कुणाच्याही हळूहळू चालण्याच्या चाहुलीची भीती वाटणेही सुरु होते.याची विचित्र उदा. आपल्याला कितीतरी वेळी अनुभवास येतात. मोठ्या पहेलवानास मांजराची भीती वाटते, काही महिला, उंदीर, झुरळ , पाल, कीटक यांना पाहूनच घाबरतात. यांचे कारण शोधून काढण्याचा प्रयत्न केला तर लहानपणी अचेतन मनावर कुठेतरी आघात आघात झालेला असतो. पण हा आघात नेमका कशाचा व केव्हा झाला हे सांगता येत नाही. भीती वाटते पण त्या मागचे कारण कळत नाही. या अवस्थेला अनाठायी भीती असे म्हणतात. हि भीती अनेक प्रकारची असू शकते. कुणास प्राण्याची, लख्ख प्रकाशाची, तर अंधाराची, विशिष्ट रंगाची, सावलीची,कुणास पाण्याची म्हणजे तलाव, विहीर याप्रमाणे, कुणाला विशिष्ट आवाजाची, पण हि भीती जास्त काळ टिकून राहिली तर दैनंदिन जीवनात फार अडचणी येतात. कोणतेही काम सुरळीतपणे होत नाही. अश्या रुग्णांना उपचार करताना त्याला ज्या वस्तू , किंवा पाण्याची भीती वाटत असेल त्या वस्तूंची तीव्रता कमी करण्या करीता डिसेंसी- टायईशन पद्धती वापरावी लागते, प्रसंगी वर्तनवाद पद्धतीचा उपयोग करून सोबत औषधांची जोड देऊन नैसर्गिक स्थिती प्रदान करता येते.
हेत्वारोप प्रोजेक्शन : आपण चित्रपट बघतो एका मशीनद्वारे पडद्यावर चित्र दाखविली जातात. सिनेमा बघताना या प्रोजेक्टरचा आपण कधीच विचार करीत नाही.फक्त पडद्यावर सिनेमा तेवढा बघतो त्यांच्या पात्रां मध्ये ईतके सरस होतो की कित्येकवेळी पडद्यावरील करून दृश्यामुळे आपल्या डोळ्यात अश्रू सुद्धा येतात. पडद्यावरील चित्र आपणच मशीनद्वारे दाखविलेले असते. थोडक्यात ती आपलीच किमया तरीपण पडद्यावरील व्यक्ती आपण खर्या मानतो. आपणच आपले विचार दुसर्यांवर, दुसर्या वस्तूवर टाकतो. आपल्युआला महिती असते हे नाटक आहे पण आपण त्यात ईतके एकाग्र होतो कि ते खर मानतो. म्हनजे मनात जे विचार त्यावेळी चालू असतात तसच दिसत. कधी कधी दुसर्याबद्द्ल शंका येणे, संशय येणे, त्यामुळे आपले मत वाईट होण हे आपल्या मनाच projection असतं ; तसेच संशय, शंका याचप्रमाण वाढल की त्याच चुकीचे समज, भ्रांती, भ्रम यात होते. या संशयी वृत्तीला paranoid किंवा paranoid, thinking म्हणतात.