आपल्या हिंदू धर्मातील अनेक चालीरीती व अनेक सण हे बदलत्या ऋतुं सोबत येणारेच असतात. आपल्या धर्मात धन-धान्य, जलाशय, नक्षत्र,गोधन, प्राणी,अवजारे, शस्त्र, देवी- देवतां, पितुदेव यां सर्वांच्या पुजाअर्च्या आपण सणानिमित्ताने करीत असतोच तसेच वृक्ष हे आपल्याला देवस्थानी आहेत. त्यात वटपुजा हे एक स्त्रियां साठी अतिशय महत्वाचे असे व्रत आहे. हे सर्व सण सृष्टी -निसर्ग यांच्याशी तादात्म्य पावलेल्या आमच्या द्रष्ट्या पूर्वजांनी प्रत्येक ऋतुंचा आणि प्रत्येक वृक्षाचा ईतका सखोल अभ्यास आणि ईतक सूक्ष्म चिंतन केलेलं आहे. कि त्यांनी जाणलेली मर्म आणि मांडलेला सिद्धांत आकलन करायला सुद्धा श्रध्देन आणि भक्ती जाणत्या सिद्धांच्या पायाशी बसून ‘तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया’ या पद्धतीने अभ्यासावे लागतील. मनाच्या अतिसूक्ष्म पातळीवर त्यासाठी उतरावे लागेल. आणि तेवढी तळ्भोर अनुभूती घ्यावी लागेल;. तरच त्याचे खरे अर्थ आम्हांला उलगडेल.
वटवृक्षच का?
सृष्टीच्या व्यवस्थेत सृजन, पालन आणि संहारण या तीन्हीना सारखेच महत्व असते. यात एकाचाही तोल गेला तरी सृष्टीचे संतुलन बिघडते, आणि तिच्या अस्तित्वाला धोका येतो. या तिन्ही व्यवस्थेच्या तीन देवता कलपिल्या आहे. ब्रम्ह, विष्णू, महेश वटवृक्षाची विशालता सहनशीलता, भव्यता, सर्जकता, धैर्यशिलता, सुदृढता, आनिउप्युक्त्ता लक्षात घेता आमच्या पूर्वजांनी त्यात हे तिन्ही देव एकत्र नांद्तांना पाहिले वृक्ष पर्जन्यवृष्टी खेचून आणतात हा हा पर्यावरण शास्त्राचा मौलिक सिद्धांत आहे. त्या दृष्टिन वडासारखा भारी भक्कम वृक्ष दुसरा नाही. वटमुळे स्थितो ब्रम्हा, वट मध्ये जनार्दन, वटाग्रे तू शिवो यश्य’ असा हा वटवृक्ष सृजनाची देवता मुळात कल्पिली आहे तर विश्वाचे भरण-पोषण करणारा विष्णू वडाच्या बुंध्यात मानला आहे, आणि पुन्हा पुन्हा भरून येणारा ऋतुमानाप्रमाणे गळून पडणार्या पानाफुलातून कल्पिला नित्यनुतन शिव, ‘न्युग्रोहो दुंबरोश्वत्थश्चाणूरांध्रनिषुद्न:| ही महाविष्णू ची नावं त्यातला न्यग्रोध म्हणजे वड चराचरातून वास करणारा,नित्यनूतन, अजर-अमर चैतन्यमय परमात्मा पाहण्याची दृष्टी असणार्या आमच्या ऋषी-मुनींना ज्ञांत्यां द्रष्ट्या पुरुष्यांना हे दिसतं. भक्कम बुन्ध्याचा बळकट फांद्यांचा, सधन-सुधृढ मुळ्यांचा आणि जाडजूड अश्या चकचकीत पानांचा हा वटवृक्ष. पारंब्या, पारंब्यातून पुन्हा पुन्हा जन्म घेणारा हा वटवृक्ष उदार, विशाल पाण्यावाचुनही तगणारा,रणरणत्या उन्हातही धैर्यांन जगणारा, निष्कांचन, निष्प्रभ न होणारा, सर्वांना आश्रय देणारा तापलेल्यांना निवविनारा, अनेक गुणधर्म अंगी बाळगणारा पारंब्या-पारंब्यातून विस्तारित जाणारा आणि जमिनीत भक्कमपणे पाय रोऊन उभा असलेला हा वटवृक्ष संसार असा ह्वा सदासर्वदा सर्वांच्या मदतीला तत्परअसा आमच्या पूर्वजांनी त्याला तसा मानलेला आहे. कुठल्याही परिस्थितीत हसू हसणारा असा भक्कम.
माणसाचा गृहस्थाश्रमी संसार असाच असायला हवा. असाच भरतो, झडतो, पुन्हा वाढतो, फुलतो,फळतो, आणि गळतो. पण मुळात तसाच कायम राहून अंगाअंगान विस्तारत जाणारा ह्वा. आपल्या सर्व चांगल्या गुणधर्मातून,पावित्र्यासोबत ईतका वाढत जावा. ज्याला अंत नाही. एकाच संसारातून असे अनेकानेक कर्तुत्वान संसार उभे राहावे. कुल,गोत्र, ज्ञाती-जाती, समाज,गाव,शहर, प्रांत,देश असेच विस्तारित जातात आणि आपल्या नीती-मुल्यां सोबत संस्कारासकट,जीवित उद्देशासकट अश्या या तरुच्या तळ्वटी गरती सुहासिनी वटवृक्ष याला आव्हान करतात. या सृष्टीच्या देवतेला, जीवनदायी परमेश्वराला आपल्या सौभाग्यासाठी उदंड औक्ष मागते.स्थितचरातून वसनार्या या परमेश्वराला सूत्रबद्ध करून आपल पुरुष प्रकृतीशी असलेल अनादि अनंत नात सिद्ध करते, त्याला फळ-फुल, धान्य अर्पून सौभाग्याच दान मागते. अमृतफलान (आंबा )त्याची ओटी भरून अमृतासारखे अमर,गोड जीवनानंद मागते.
ह्यात औचीत्य निश्चित आहे. सृष्टीच अस्तित्व,समाजाच स्थैर्य, घरातील मांगल्य, मनातील पावित्र्य आणि विश्वातील शांती टिकवून ठेवण हि तिची जबाबदारी आहे, असे तिला माता भगवतीदुर्गा ने शक्तीचे वरदानच दिलेले आहे. सौभाग्य ह्या शब्दाचा अर्थ तिच्या मनात खोलवर रुजलेला आहे वडाच्या मुळ्या प्रमाणेच.तिचा संसार पुरुष्यावाचून अर्थहीन आहे हे ती जाणून आहे.सृष्टीतील सत्य म्हणजेच पुरुष व चित-चैतन्य म्हणजेच स्त्री होय. या दोघांनी मांडलेला संसार त्यातील सत्कर्मे हे संसाराचे स्वरूप होयवटवृक्षाची पूजा हा आपल्या धर्मातील आचार आहे. हा सन ऋतूंवर आधारित आहे. आम्ही स्त्रिया हा सण श्रद्धेने करीत असतो. दरवर्षी श्रेष्ठ पुनवेला वटवृक्षाची पूजा कोणी तीन दिवसांची तर कोणी एक दिवसाची पूजा मांडून उपवास करतात. स्त्रियांच्या निष्ठांना बळ देणार अस ईश्वराच ते अधिष्ठान असतं ह्यात वावग वाटावं अस काय असत? त्यावर टीका टिप्पणी करण्या सारख अस काय असत ? पण त्यावर हि टीका करणारे आपली हौस भागवितात. टीकाकार प्रामुख्याने स्त्रीमुक्ती विषयांचा आधार घेऊन लिहिण्याचा प्रपंच करतात.
केवळ स्वत:च्या नावासाठी काहीतरी करीत असल्याचा देखावा करणार्या आणि स्त्री मुक्तीचा उद्योग करणार्या तथाकथित विद्वानांना मुक्ती या शब्दाचा अर्थ यांना ठाऊक आहे काय? मुक्तीची जाणीव ह्यातल्या कितीजणांनी अनुभवली असणार ? आणि अनुभवली असली तरी ती मुक्ती होती ह्याची त्यांना खात्री असते कां ? मग हे अस असताना हे सारे महाभाग आमच्या सारख्या अनेक स्त्रियांना मुक्ती द्यायला का निघतात ? मुक्ती हि वस्तू इतकी सवंग आणि बाजारू आहे का?
मुक्ती हि माणसाची एक मानसिक अवस्था आहे. आत्यंतिक शुचिभूर्त अशी हि अवस्था ज्याची त्यान कमवायची असते.ती अशी कोणी कोणाला आणून देऊ शकत नाही. आमची वेद-पुराणे, शास्त्र- तर्क, ह्यातले कुणीही कुणालाही कधीही मुक्ती हि वस्तू हातात आणून देत नाही. मुक्ती हि एक अनुभूती आहे. ज्याची त्याची ती आपापली आहे . हि एक कमाईच आहे. कधी लाखांत राहूनही अनुभवता येते नाहीतर रानात जाऊनही गवसेल ह्याची शाश्वता नसते. मुनी-तपस्वी, ऋषी-महर्षी, प्रेषित-अवलिये, साधू-संत हेच केवळ त्या वाटेवरचे पथर्दशक होऊ शकतात. कर्मयोग, सांख्ययोग, ज्ञानयग, भक्तियोग हे सर्व योग त्या अनुभूतीच्या टप्प्यात पोचण्याचे मार्ग आहेत. त्यामुळे ईतरांच्या मुक्ती वैगरे साठी होणाऱ्या या चळवळी म्हणजे आपल्या स्वत:च्या स्वार्थावर दृष्टी ठेऊन लोकांसमोर उभे केलेले केवळ देखावे आहेत. समाजातल्या दुर्बळ घटकांवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध विचारवंतांनी आणि सामर्थशाली लोकांनीच अगदी नेटान आणि कडाडून लढा जरूर द्यावा.त्यावाचून समाजाचा समतोल टिकून राहणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील अश्या अश्या कार्यांसाठी आयुष्य वेचलेल्यांच स्मरण केल तर केवढीतरी गौरवशाली नामावली तयार होईल. देश्याच्या कानाकोपर्यातून सुद्धा पण त्याच भांडवल राजकारणात प्रतिष्ठेची पद प्राप्त करण्याकरीता जेव्हा होतो तेव्हा त्या प्रयत्नांच पावित्र्यही आपोआपच नष्ट होऊन जात.
वृथा चर्चा
वटसावित्रीच्या कथेकडे माणसान थोडं डोळसपणान पाहिलं तर ती समजून घेण ईतक कठीण आहे कां ? एका फार वरच्या पातळीवर, विश्वातल्या सृजनशक्तीचा संहारशक्तीचा झालेला हा एक सरळ सरळ संग्राम आहे.आणि त्यात परमेश्वराच्या जीवनशक्तीन मृत्यूचा आदर करूनही त्यावर आपल्या प्रेमान केलेली लोभसवाणी मात आहे. स्त्रीन या शक्तीच्या मोहात पडू नये काय? सृष्टीकर्त्या ब्रम्हदेवाची पत्नी म्हणजेच पर्यायांन त्याठायी वास करणारीत्याची सृजनशक्ती म्हणजेच सावित्री. ऱाजा अश्वपतीन हि शक्ती प्रसन्न करून घेण्यासाठी केलेली अध्यात्मिक वाटचाल आणि त्या शक्तिच्या प्रसादान त्याला मूर्तरूपानं आकाराला आणता आलेली स्री म्हणजेच सावित्री स्वाभाविक मृत्यूशी भिडण्याच , त्याचा पाठपुरावा करून त्याला माघार घ्यायला लावन्याच सामर्थ्य ती जन्मत:च घेऊन आलेली होती आणि लक्षात घेण्यासारखे म्हणजे त्या मृत्यू देवतेचा सावित्रीन मानच राखला आहे. तिने यम देवाला आदरपूर्वक नमस्कार केला आहे.त्याची विनवणी केली आहे. सृष्टीतील यमराजाचे कार्यहि आवश्यक आहे हे यातून ध्वनित होते. सृष्टी तील ठरलेल्या नियमात ढवळाढवळ करण्याचा अधिकार सावित्रीनही आपल्या हातात घेतलेला नाही. पण स्त्यवानाचा मृत्यू हा अपमृत्यू होता म्हणून मृत्युन माघार घेतली. सृजन कार्य चालू राहावं, सृष्टीचा तोल सांभाळला जावा हा अधिनियम यमालाही लागू होताच की आणि अशी एखादी तप:पूत शक्ती प्रेमान त्यासंहाराच्या देवतेला समज द्यायला पुढे उभी ठाकते तेव्हा मृत्यूची देवता सुद्धा रागावण्या एवजी आतून पाझरतेच आणि त्या बुद्धिमत्तेच कौतुकही करते. ईतक सर्व हे भव्य आहे. आणि अस दिव्य करायलाही सावित्री सारखी तपश्चर्या लागते. व पुण्याई लागते.
स्त्री-पुरुष्याच नातं पती-पत्नीच नातं हे पुरुषकृतीच नातं आहे. शिव-शक्तीच नातं आहे. आमच्या मानण्यान मानण्यावर नाही ते आहेच ते साता जन्माचच नाही ते शत-शत जन्मांच्या पलीकडच आहे. अनंत आहे. आपल्या पृथ्वीच्याहि पलीकडे. नात्याचा हा सृजनस्रोत अनादि-अनंत आहे. मृत्यू सत्यवानाला घेऊन चालला असतो आणि त्यामागून चिवटपणान त्याचा पाठपुरावा करीत जाणारी सृजनशक्ती सावित्री सासरयाची दृष्टी, शक्ती, हिरावून घेतलेलं राज्य राजा अश्वपतीसाठी शंभर पुत्र व स्व:त साठी पुत्र असं वरदानात मांगल्य पेरीत चाललेली असते. हे सार सावित्री आपल्याला सत्यवानाहून वेगळ कल्पून कां मागत होती? विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. मृत्यूवर मात करणारी सृजनशक्ती स्त्री-पुरुष ह्यातल्या एकट्या कुणाचीच नसते. ती अशीच निरंतर एकत्र येवून मृत्यूची लाट मागे रेटत पुन्हा पुन्हा नव्यानं सातत्यान आणि जोमान आपल निर्माण कार्य करीत असते.
जीवनदायी व्रत…
उन्हाळा संपत आलेला असतो. सार सुकून, जळून, भगभगीत होऊन गेलेलं असतं. आटलेले जलाशय,उघडे बोके डोंगर तळमळनारी जीवसृष्टी, केविलवाणी झाडे-झुडपे ओसाड असा हाहाक्कार माजविलेल वातावरण उद्याच्या पर्जन्याची आतुरतेने वात बघत असलेली सृष्टी अश्या या उन्हाळ्या -पावसाळ्याच्या जोडावरील हे व्रत जाणती गरती स्त्री आचरती असते ब्रम्हशक्ती सावित्रीचे व्रत म्हणजे त्या शक्तीचेच होय सृजनशक्ती बाळगणाऱ्या स्त्रीन भावभक्तीने त्याश्क्तीची पूजा करायची असते.सौभाग्याच्या कल्पनेत एकटा कुंकवाचा धनी सामावलेला नसतो. तो तर तिच्याहून वेगळा नसतोच, समृद्धी संपन्नता, स्थैर्य, मांगल्य, चैतन्य, सौंदर्य, औदार्य, आनंद सुचिताअ असं कितीतरी स्त्रीला त्या अभिप्रेत असतं. सार शुभंकर, आशादायी त्या सौभाग्याच्या कल्पनेत सामावलेलं असतं त्यासाठीच हे जीवनदायी व्रत ती मांडते. आपल्या संसारासाठी तसेच सर्वांच्या कल्याणासाठी सृजनशक्ती अंगी बाळगणार्या स्री न भावभक्तीन हे व्रत करायचं असते. सत्यवान-सावित्री हि प्रतिक मात्र ठरतात, सत्यवानातील सत, अमंगला विरुद्ध तीन सार्या जगतासाठी तिने सारी शक्ती पणाला लाऊन जगायचं असतं. विष्णुपत्नी धरती मातेच्या आम्ही अनेक कन्यका वटवृक्षाच्या तळवटी, सत्यवान सावित्रीच स्मरण करून शिवाचीच मंगलपूजा केल्या जाते.
पतीव्रत्य धर्माची उगाच व्रात्यफोड करून काही विकृत समाजापुढे मांडण्या पूर्वी हाच विचार केल्या जातो का? आणि केला तर नक्कीच काही वेडवाकडे या पावन व्रता बाबत बोलणार नाही. दारू पिणे, स्त्रीला मारझोड करणे, छळणे , वाईट विचार ठेवणे, हा तसा विचारवंतांचा ज्ञानीजणांचा अंकुश न राहिलेल्या समाजान पुरुष जातीला केलेला आहेर आहे. मुळातच माणसाच्या वृत्ती-प्रवृत्ती पाण्यासारख्या तरल व उताराकडे वाहत जाणार्या असतात कुठे एवढीशी फट जरी सापडली तरी अधोगतीला वाहु लागतात. श्रेयस आणि शुभंकराचा विसर फार लवकर पडतो. पाणी सुद्धा वर चढवाव लागतं आपोआप चढत नाही. काही व्यक्ती जन्मत: अपप्रवृत्तीच घेऊन आलेल्या असतात. यात स्त्री – पुरुष दोघेही येतात.
अश्या काही गोष्टी भावगम्यचं असतात. उगाच वृक्ष व्यवहारी त्याचे अर्थ लाउ म्हंटले तर अर्थ न लागता डोक्यात विकृत प्रतीमा जागतात. मग मानवाला सारे काही विचित्र वाटू लागतं त्या संमज नसणार्यांना सारेच काही समजावण्या ईतके सोपे नाही. तरी त्यांच्या मनात रुजलेल्या या रुद्धेच्या,निष्ठेच्या मूल्यांना आघात पोचवण्याचे हक्क पोचतात का? माणसाच्या मनातल्या सगळ्या मंगल,कोमल,पवित्र भावनांचा असा निपटारा करण्याचे पाप कोणीही करू नये. या भावनाच माणसाला जगवतात . भावना संपल्या तर ह्या जगात जगण्या सारख काहीच राहणार नाही. भावना ह्या हळूवार असतात. व निष्ठा दृढ असतात. त्याच समाजाला एकसंघ राखू शकतात.आणि अश्याच समाज संस्कृतीच्या समुहान राष्ट्र घडतात. परस्पर स्नेह जडतात. हेच समूह परकीय सत्तांना उलथून पाडतात. आज पुन्हा हे सारे काही सांगण्याची गरज आमच्या देशात निर्माण झाली असल्याचे वाटत आहे.
आज आमच्यातल्या उच्चभ्रू म्हणविणार्या समाजातली स्री खोट्या प्रतिष्ठेच्या नावाखाली आपल्या श्रद्धा-निष्ठा गमावून निराधार झालेली आहे. वात हरवलेली हि स्त्री पुरुषजातीच अंधानुकरण करीत आधार,सुख शोधण्यासाठी अनेक व्यसनांच्या आहारी चाललेली आहे. त्याचे समाजावर होणारे दूरगामी परिणाम विचारवंतां समोरचे भयानक प्रश्नचिन्ह होऊन उभे ठाकले आहे. त्यामुळे कमीत कमी आमच्या धार्मिक व्रतवैकल्यांचे स्वरूप विकृत करून त्या स्त्री समोर मांडण्याचा प्रयत्न होऊ नये. कारण ज्याचे सारेच आधार जिथे संपतात. तिथे फक्त परमेश्वर कृपा व व्रतवैकल्य श्रद्धेचा आधार उरतो. जिथे सर्व वाटा बंद होतात तेथे राउळाची वाट सुरु होते.
माणसाच्या मनाची व्याप्ती शक्ती अफाट आहे. त्या मनात वसणार्या प्रेमाला पर्याय नाही. प्रेम हि ईश्वरी शक्ती आहे. स्री मध्ये हि शक्ती प्रकर्षान वास करते. या व्रतवैकल्यात मनाचा संयम करून पावित्र्य राखून,एकाग्रतेने मनाची सुद्दृद्ता वाढवायची असते. असे बळकट मन मग विश्वातल्या अनेकानेक शर्तीन वर मात करायला समर्थ असतात. व्रताची साधना आपल्या धर्मात त्या साठीच सांगितली आहे. हे सत्य आहे, हे सर्व आपल्याला पटत नसते त्यावेळी माणसाचे उदात्तीकरण होऊन आपण आपल्याच धर्माच व चालीरीतींच हास्यास्पद विकृतीकरण करीत जातो.
Note: Women pray for the prosperity and longevity of their husbands by tying threads around a banyan tree (wata) known as Peepal Puja on this day. Vat Savitri Puja is dedicated to the legendary married woman Savitri who succeeded to get back her died husband by penance.
1 Comment. Leave new
खुपच सुंदर आणि अन्तःर्मुख करायला लावणारी माहिती आहे….खुप खुप धन्यवाद!!!