Tomato omelette :
Tomato Omelette is a delicious Indian recipe served as a Main. Tomato Omelette is a quick, simple and highly nutritious breakfast dish. Learn how to make/prepare Tomato Omelette by following this easy recipe.
साहित्य -: चार छोट्या वाट्या तांदळाचे पीठ, दोन वाट्या चना डाळीचे पीठ, ४ टमाटे, ६ हिरव्या मिरच्या एक इंच आले, ६ लसून पाकळ्या, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर १/२ चमचा हळद, चवी नुसार मीठ, किंचित साखर, चिमुटभर खाण्याचा सोडा, ३चमचे तेलाचे मोहन.
कृती -: चार टमाटर गरम पाण्यात टाकून थोडावेळ थेवेआवेत व नंतर थंड पाण्यात टाकावेत त्याची साले काढून त्यांची मिक्सर मधून पेस्ट करावी. एका मोठ्या वाट्यात तांदळाचे पीठ व कणा डाळीचे पीठ एकत्रिर करून त्यात हिरव्या मिरच्या, आले-लसून यांचे वाटण अर्धा चमचा हळद, थडी चवीनुसार मीठ, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, टाकावी व नंतर तीन चमचे गरम तेलाचे मोहन करून मिक्स करावे. नंतर चिमुटभर खाण्याचा सोडाघालून गर्जे नुसार सासरीत भिजवावे. त्यानंतर नॉनस्टीक तवा गरम करायला ठेवावा, त्यावर एक चमचा तेल घालून थोडे थोडे आळवलेले पीठ टाकून धीरड्याप्रमाणे गोल पसरवावे. मंद आचेवर शिजवावी त्यावर झाकण ठेवावे, थोड्या वेळाने झाले काय बघून ते परत उलथावे, थोडे तेल ठाकून परत दुसर्या बाजूने मंद आचेवर शिजू द्यावे, तयार झाले की टोमाटो सॉस, आणि बेडच्या स्लाईड सोबत सर्व्ह करावे.