उन्हाळा व कांदा याचे अतूट संबंध आहे, उन्हाळ्यात रखरख उन तापू लागले कि, घरची मंडळी घरा वाहेर जात असताना आवर्जून सांगतात टोपीखाली किंवा खिशात एक कांदा ठेऊन बाहेर पडा. कांद्यात अनेक खनिजे असतात. उन्हाळ्यात शरीरातून खुप घाम बाहेर पडतो त्या द्वारे शरीरातील अनेक खनिजे बाहेर पडतात घाम अंगावर वाळला कि त्याचे मिठासारखे क्षार जमतात घाम शरीरातून निघून गेल्यांमुळे शरीरात खनिजांची उणीव भासते. ती भरून काढण्या करीता कांदा यथोचित प्रमाणात खाल्यांर ती उणीव भरून काढण्यात मदत होते. उन्हाळ्याच्या आरंभी गोवर कांजन्यासार्ख्या रोगांना आळा घालण्यासाठी कांद्यातील विविध जीवनसत्वे व खनिजे सहाय्यक ठरतात, नाक फुटून रक्त बाहेर येत असल्यास कांदा फोडून त्याचा वास द्यावा. मिरगी येउन बेशुद्ध पडलेल्यास कांदा फोडून त्याचा रसाचा वास दिल्याने शुद्धी येते अश्या रुग्णास तुपात भाजून कांदा खावयास देणे लाभदायक आहे, अजीर्ण झाल्यास कांद्याचे बारीक तुकडे करून त्यावर लिम्बाचा रस पिळावा हे जेवणात तोंडी लावावे. फोड फुटून लवकर बरे होण्यासाठी कांद्याचा जवस एकत्र वाटुन त्यावर लिचा रस पिळावा त्याचे पोट्यश फोडावर बांधावे.कफ दमा असलेल्यांनी कांदा अवश्य खावा. छातीतील कफ बाहेर पडण्यास मदत होते.
कांद्याचा रस,तोंडावरील मुरूम व काळे डाग यावर चोळल्यावर ते लवकरच नाहीसे होण्यास मदत होते. ओल्या कांद्याचा पाला खाणे उत्तम कारण त्यात व्हिटामिन ए भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे नेत्ररोग करण्याठी मदत होते. म्हणूनच उन्हाळ्यात आपल्या रोजच्या आहारात बहुगुणी कांद्याचे सेवन अतिशय हितावह व आरोग्यवर्धक आहे.