मान्सून येतोय दोन दिवसांत अंदमानमध्ये. मान्सूनच्या आगमनासाठी आवश्यक असणारं वातावरण सध्या अंदमान निकोबारमध्ये तयार झालंय. ही गूड न्यूज दिलीय भारतीय हवामान खात्यानं. सामान्यपणे अंदमान-निकोबार या भागात 20 मे पर्यंत मान्सून दाखल होतो. यंदा मान्सून आपल्या वेळेवरच येत असल्याचे हवामान खात्याने दर्शवले आहे. मान्सूनची परिस्तिति यंदा अनुकुल असल्याचे खात्याने सांगितले आहे . म्हणूनच मान्सून आता आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे .