शांताकुमारन श्रीशांत(Shantakumaran Shrishant), अंकित चव्हाण (Ankit Chauhan) व अजित चंडिला (Ajeet Chandila) या राजस्थान रॉयल्स संघातील तीन क्रिकेटपटूंना हिंदुस्थानात सुरू असलेल्या आयपीएलच्या सहाव्या मोसमात स्पॉटफिक्ंिसग (SpotFixing) केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुंबईत अटक केली. आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगने खळबळ माजली असतानाच याप्रकरणाचे धागेदोरे अंडरवर्ल्डशी आहेत का? याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. त्यातच पाकिस्तानातील बुकींनी तब्बल ३० फोन या फिक्सिंगच्या कालावधीत भारतात केल्याचेही समोर आल्याने संशयाला आणखीनच बळकटी मिळाली आहे. पोलिसांनी श्रीसंतसह तीन खेळाडूंचा बुरखा फाडला आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आज नवी दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयलच्या तीन खेळाडूंना अटक केलं. तर ७ बुकींनाही केली अटक. सामन्याच्यावेळी फिक्सिंगमध्ये अडकलेले खेळाडू कोडचा वापर करीत होते. लॉकेट फिरवणे, घड्याळ दाखविणे, फिल्डींगमध्ये बदल करणे, टी शर्ट खेचने किंवा वरती करणे तसेच रूमाल लावणे आणि न लावणे, शुजची लेस बांधणे आदींच्या इशाऱ्यांने हे फिक्सिंग केले जात होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.