सर्दी – पडसे




Like
Like Love Haha Wow Sad Angry

sardi padaseसर्दी-पडसे ही शरिराची  प्राकृतिक प्रतिक्रिया आहे. शरीरा मध्ये संचित होणारे विजातीय पदार्थ बाहेर काढून टाकण्याची हि प्रक्रिया आहे. आम्ही सर्दी-पडसे कमी होणारी औषधी घेऊन, या विजातीय पदार्थांना बाहेर काढण्यापासून रोखतो त्या मुळे अनेक उपद्रव भविष्यात होत असतात तात्कालिक आराम हा  रोगास समूळ नष्ट करीत नसतो.

आयुर्वेद सर्दीचे वेगवेगळे प्रकार मानतो. शरीराच्या सूक्ष्म अति सूक्ष्म लक्षणातील बदला नुसार औषधी बदलतात केवळ हाच पर्याय नाही. आयुर्वेद शरीराची चिकित्सा करतो त्यामुळे प्राकृतिक प्रतीशम क्षमता वाढविणे, ही आयुर्वेदाची मुलचिकित्सा संकल्पना आहे.

सर्दी — पडशाची  — कारणे

१) मलमूत्र अवानवात, क्षुधा, निद्रा आदी वेगाने धारण करणे. वित्सर्ज्नात अतीनियमितता असणे.

२) अजीर्ण, भोजन केल्यानंतर अन्न व्यवस्थित न पचणे

३) धूर, धूळ श्वास मार्गाने

४) रात्री जागरण

५ ) नेहमी पिण्याचे पाणी बदलणे थंड व गरम

६) पोहणे

७ ) हिवाळ्यात, पाहाटेच्यावेळी डोके, कानावर काहीच आवरण न घेता हिंडणे

८)  ऋतूमानात बदल होणे

९) डोके खाली जाईल असे झोपणे, किंवा उघड्यावर तोंड न पांघरता झोपणे

१० ) अतिशय जड, गोड, थंड, रुक्ष पदार्थाचे सेवन करणे.

११ ) जड जेवण केल्या नंतर स्नान करणे

१२) स्तनपाना नंतर मुलांना लगेचच झोपविणे

१३) मानसिक त्रास

१४) हिवाळ्यात ए.सि. कुलर, पंखे यात झोपणे, बसने.

१५ ) आंबट फळे खावून त्वरित पाणी पिणे

१६ ) विषम स्थितीत झोपणे  या कारणांनमुळे कधी कधी ताबडतोब सर्दी होते, कधितर कालांतरानेही होते.

प्राथमिक लक्षणे :

डोके जड होणे  वा भरल्यासारखे वाटणे, शिंका येणे, अंग दुखणे, नाकातून वाफा आल्यासारख्या वाटणे, टाळूच्या ठिकाणी चिरा पडणे, नाकामध्यॆ वळवळणे, आवाजात बदल होणे, नाकातून लाल स्त्राव होणे, ताप येणे अंग जखडल्यासारखे वाटणे. या प्राथमिक लक्षणांचे महत्व असे कि  या वेळी जर त्वरित चिकित्सा केली, आहार-विहार या सवयी मध्ये बदल केला तर त्वरीत आराम होतो.

आयुर्वेदात १. वातज सर्दी, २. पितज सर्दी, ३. कफज  सर्दी, ४. सान्नीपातीक सर्दी,५. एतज सर्दी असे वर्गीकरण आहेत. अश्या प्रकारचे भेद अन्य चिकित्सात नाही.

नस्य चिकित्सा : आयुर्वेदात पंचकर्म चिकित्सा हि अत्यंत महत्वाची अशी शरीर शोधनाची प्रक्रिया आहे. औषधी चिकित्सेने बरे न होणारे रोग पंचकर्म चिकित्सेने बरे होतात. रोगकारणांचा समूळ नाश करणारे म्हणून याचे महत्व आहे. नस्य चिकित्सा हि अशीच मानेच्या वरील सर्व अवयवासाठी होणाऱ्या आजारा साठी सफलदायी चिकित्सा आहे. यात नाकामध्ये विशिष्ट प्रकारच्या औषधांनी सिद्ध असे तेल टाकल्या जाते त्यामुळे साचलेल्या कफाचे शोषण होते. आतील स्नायुंना वन दिल्या जाते. हि नस्व चिकित्सा पंचकर्म क्लिनिक मध्ये केल्या जाते. आजकाल मिळणारे “नेझन ड्राफ”  हे या मधील नस्य चिकित्सेचा प्रकार आहे. अनुतेल, पंचेनद्रियवर्धक, वचा तेल नस्य असे अनेक प्रकार हे तेल नाकात ६ ते १२ थेंब १ ते २ वेळां नियमित टाकावे. पंचकर्म चिकित्सालयात हीच चिकित्सा दिली जाते त्याची विशिष्ठ पद्धती असते.

This article is based upon the various Allergy Symptoms & Treatments get drugs Dust Allergy Information and how to care about it.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu