कोथिंबीरीचे समोसे
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Kothambiriche Samose :

Kothambiriche Samose is a maharashtrian dish deeply fry in oil. This snack is famous in maharashtra. Must try this snacks and you will just love it . it’s all time favorite tea time snack of Maharashtrians.

kothimbir Ke Samose Recipe

साहित्य -: एक मोठी जुडी कोथिंबिर, दीड वाटी मैदा, ३ चमचे चारोळी, एक चमचा गरम मसाला, एक चमचा साखर, एक लिंबाचा रस, अर्धा चमचा लाल तिखट, चना डाळीचे पीठ, चवी पुरते मीठ, मोहरी, हिंग, हळद, तेल.

कृती –: मैद्यात गरम तेलाचे मोहन घालून, चवी नुसार मीठ टाकावे व मैदा भिजवावा. थोडा वेळ मुरु द्यावा, कोथिम्बिर स्वच्छ पाण्याने धुवून निवडून बारीक चिरून घ्यावी. कढईत अर्धा डाव तेल घालून गरम करून मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. त्यात चिरलेली कोथिंबीरी घालून थोडी वाफ आणून शिजू द्यावी. त्यात तिखट, चारोळी, चवी नुसार मीठ, गरम मसाला , डाळीचे पीठ, घालून भाजी प्रमाणे परतावे.  नंतर झाल्यावर त्या लिंबाचा रस घालून थंड करावे.  मैद्याच्या दोन सारख्या लाट्या करून गोलाकार करून एक एक साईड ने तेलाचा हात लावुन दोन्ही लाट्या एकावर एक ठेऊन पोळी लाटावी. ती पोळी तव्यावर हलकी भाजून घ्यावी नंतर त्या पोळीच्या तीन लांबट पट्या कापाव्यात. त्या मोकळ्या केल्या नंतर सहा पट्या होतात. प्रत्येक पट्टीत कोथिंबिरीचे सारण भरून पट्टीला त्रिकोणी खणा प्रमाणे आकार देवून कडा मैद्याच्या पेस्टने बंद कराव्या, सर्व पट्ट्या भरून झाल्यावर मध्यम आचेवर समोसे कुरकुरीत तळावे. चटणी सोबत सर्व्ह करावे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu