Finger Chips :
chop the potatoes lengthwise. rinse them in water a couple of times. now add them to a bowl of cold water. Check out Homemade Potato Chips Recipe and more Snacks Recipes.
फिंगर चिप्स +मसाला ताक
साहित्य : अर्धा किलो मोठे बटाटे ,लाल,हिरवी, पिवळी, भोपळी मिरची, अर्धा पाव बिन्स शेंगा, दोन गाजर, एक लांबट चिरलेला कांदा, १० पाकळ्या लसून बारीक चिरलेला, एक वाटी लांबट चीरलेली पान कोबी, थोटी वाटीभर टोमाटो सॉस, २ चमचे व्हाईट व्हिनिगर, २ चमचे सोया सोस, एक चमचा साखर, ४ हिरव्या मिरच्या, तेल, मीठ, मसाला ताक, अर्धा किलो दही अर्धा चमचा जिरे पावड, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : प्रथम बटाटे सोलून बोटा इतपत जाड चिप्स कापाव्या, भोपळी मिर्ची, कोबी, कांदा चिरावा, बिन्स चे तुकडे करावे, हे सर्व तेलात थोडे तळून घ्यावे, परत कढईत डावभर तेल टाकून गरम करून त्यात चिरलेला लसून, हिरव्या मिरच्या घालाव्या नंतर त्यात लांबट चिरलेला कांदा घालून परतावे, त्यात टोमाटो सॉस, सोया सॉस, व्हिनीगर, साखर, चवी नुसार मीठ घालून सारखे करावे. नंतर तळलेल्या भाज्या घालून एक मिनिट परतावे. ते गरमच सर्व्ह करावे सोबत दह्याचे ताक करून त्यात जिरे पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवी नुसार मीठ घालून ताक करावे व ग्लास मध्ये सोबतच द्यावे.