देह आणि मन




Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

Body and your Soul There is huge relation between your Body and your Soul. if your soul is clean your body will be clean. after born we have great relation between Body and your Soul.

human body and atmaमनुष्य म्हणून जन्माला आल्यावर मन आणि बुद्धी याच्या आधाराने त्याला जगातील सुख-दु:खाचा अनुभव घेता येतो. तसेच स्वत:चा विकासहि करता येतो. हा विकास मानवी देहा कडून मन आणि बुद्धी यांच्या मदतीने होतो. मन आणि बुद्धी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बुद्धीची धाव सतत विकासाकडे असते. व मनाची धाव नेहमीच विकारांकडे असते. हे मन त्यातच लिप्त होऊन राहते त्यावेळी मनुष्याचा बौद्धिक विकास कुंठीत होतो. मन ऐहिक गोष्टींत जास्त रमते आणि शारीरिक सुखाच्या मागे धावत सुटते. परंतु यासुखाचा त्याला शेवटी कंटाला येतो, त्यातील फोलपणा जाणवतो आणि हीच ऐहिक सुखे त्याच्या मनसिक दु:खाची कारणे बनतात. सामाजिक जीवन जगताना ईतर मानसिक सुख-दु:खे त्याला असतात या दु:खांमुळे होणार्या यातनातून मनुष्याला मुक्ती हवी असते. पण हि मुक्ती हवी तेव्हा मिळणे त्याच्या हातात नसते. कारण मानवी जीव हा मुळात मर्यादांनी बांधलेला असतो. त्याच्या प्रत्येक शक्तीला व कृतीला मर्यादा हि असतेच. पण माणसाला याची जाणीव नसते. त्यामुळेच  मर्यादांचा विचार नकरता तो जगतो. व येतो तसाच परत जातो.

वास्तविक पाहता जीव जन्माला येण्यापूर्वीपासूनच म्हणजे गर्भावस्तेत असताना त्याला मानवी जीवनाच्या यातनांचे ज्ञान झालेले असते. त्यामुळेच त्या जिवाचा गर्भावस्तेत ‘को$ हं’-‘को $ हं म्हणजेच ‘ मी कोण’? (Mi Kon Ahe? / Who I am ? )असा जप चालू असतो. स्वत:ला जाणण्याची ईच्छा  त्याला तेथे असते. जन्माला आल्यावरही तो कॉयं, कॉयं असाच आवाज करतो. स्वत:ला असहाय्य समजतो व मी कोण ? मी कोण? असाच आक्रोश करतो. पण अर्भकाच्या या हाकेला त्याची जन्मदाती तरी काय उत्तर देणार ? कारण तिला स्वत:लाच हे माहित नसते तो कोण आहे? मग ती त्याला काय सांगणार ? त्यामुळे हा जीव प्राप्त परिस्थिती व देहांर्तगत  असलेले षड्रिपू यांच्याशी समायोजन स्वीकारतो व ‘को$ हं’ला विसरून केवळ देहरुपाने तो ‘सो $हं’ म्हणत जगत राहतो त्याला स्वत:ला जाणण्याचा ध्यास तेथेच संपतो. सामान्य माणसे ती याच पद्धतीने ‘सो$हं’ म्हणत देह संपवितात.परंतु सतपुरुष या को $हं चे स्वरूप जाणतात. ‘को$ हं’ हा दुसरा कोणी नसून ‘सो$हंच’ आहे म्हणजेच ‘मी ‘ दुसरा कोणी नसून ‘तोच तो मी’ आहे याचं रहस्य स्वत: जाणतात. व ईतरांनाही या मार्गावर आणून सोडतात. परमात्माच जीवात्म्याच्या रूपाने जन्माला आलेला आहे. हे त्यांना समजते. त्यामुळेच त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. हा ‘मोक्ष’ म्हणजे दुसरे काहीच नसून जिवाचे परमात्म्यात विलीन होणे आहे.

आपण सर्व सामान्य माणसे आहोत, आपल्याला निदान या आत्म्याच्या अंतरी परमात्मा आहे याची जाणीव झाली तरी पुरे. हि जाणीव आपल्याला व्हावी म्हणून एका सद्गुरूची आवश्यकता आहे. मानवी देह म्हणजे नक्की काय आहे? त्याची अवस्था, त्याची स्थिती कशी असते?  त्यान मन कसे असावे ? मनाला कसे सांभाळावे ? स्वत:चा विकास कसा करावा ? मोक्ष कसा मिळविता येणे शक्य आहे? मोक्ष मिळविता आला नाही तरी त्या मार्गा पर्यंत कसे येता येईल ? आपल्या मनाची अवस्था या नर जन्मात तेथ पर्यंत पोचणे तरी आवश्यक आहे नाही का? याकरितां .

सर्व सामान्य मानवी देहाचि व्याख्या दोन हात, दोन पाय, दोन कान, दोन डोळे, नाम, धड, मस्तक अशी युक्त आकृती त्याची लांबी, रुंदी, रंग एवढेच आपण करतो. येथेच आपल्या सर्व सामान्यांचे वर्णन संपते. पण सत्पुरूषांला या देहाचे सूक्ष्म ज्ञान असते.

या देहाला अंतर्बाह्य पाहिलेले असते. त्यांनी त्याच्या प्रत्येक भागाचा अनुभव घेतलेला असतो. त्यांना प्रत्येक अवयवांच्या अवस्थेचे संपूर्ण ज्ञान असते, या देहाच्या जन्मापासून ते मोक्षापर्यंतच्या प्रत्येक अवस्थेबद्दल तेच अधिकारवाणीने बोलू शकतात.

देहाचे तीन भाग म्हणजे पहिला ‘स्थूलदेह’ हां आपण डोळ्यांनी पाहू शकतो. दुसरा ‘सूक्ष्मदेह’ हा सर्व सामांन्यांना दिसू शकत नाही. याचे ज्ञान सिद्धपुरुष्याला होते.हा त्यांना दिसत नसला तरी त्यांना अनुभवात येतो. तिसरा म्हणजे ‘कारणदेह’ यामुळेच मनुष्याला पुन: पुन: जन्म घ्यावा लागतो. पण याचे स्वरूप कसे असते ते का असते याचे ज्ञान सर्व सामांन्याना  होत नाही.  पण यातील गोष्टी सत्पुरुष किंवा सिद्धपुरुषयांच्या लक्षात व्यक्तीला पाहिल्याबरोबर लगेच येतात व्यक्तीची देहाकृती, शारीरिक हालचाल, चेहरा व कृती या सर्व गोष्टी पाहिल्या बरोबर कारणदेहाचे त्यांना ज्ञान होते. तो पशु-पक्षी असो वा मानवी देह असो कोणत्याही योनीत जन्माला येण्याचे कारण व त्यातून मुक्तीचा मार्ग हेही ते जाणतात.

‘स्थूलदेह’ हा अस्थी  आणि रक्तामासाचा एक गोळा असतो.या रक्त, मास, अस्थित त्यांना जोडणारी कोणतीही तार नसते किंवा कोणत्याही  चलित यंत्राचा उपयोग केलेला नसतो. तरीही स्थूल देहाला जिवंतपणाची भावना कशी येते. ? हेच मोठे रहस्य आहे. ‘स्थूलदेह’ वाढतो, जगतो, हालचाल करतो, तो प्रत्येक कृतीचा विचार करतो. स्थूल देहाचे सूक्ष्मतम कार्य कसे चालते. हे मानवाला विज्ञांना द्वारे कळते पण त्यामागील कार्यकारण भाव कळत नाही. स्थूलदेहाला जिवंतपणाची भावना सूक्ष्मदेहामुळेच येते. व सर्व कृती घडतात. आणि सुक्ष्मदेहाला ‘ आत्मा’ असे म्हणतात.

आत्म्याच्या अस्तित्वामुळे देहाचे गुण प्रकाशमान होतात. मन, मनाचे भाव, सुख-दु:ख, बुद्धी इत्यादी केवळ आत्म्यामुळे प्रकाशमान असतात ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुलळे  सर्व चराचरांच्या गुणांचा विकास होतो सर्व सृष्टी प्रकाशमान होते. व सूर्यास्त होताच ती अंध:कारात लुप्त होते. आणि जर सूर्य उगवलाच नाही तर कोणत्याही सजीवाला त्याचे गुण विकसित करता येणार नाही व त्याचे अस्तित्वच संपेल त्याच प्रमाणे आत्म्याच्या स्थूल देहातील वास्तव्यामुळे त्याला जिवंतपणाची भावना येते.

विश्वाच्या अफाट पसार्याच विचार केला तर मनुष्य जीव अगदी शुद्र आहे. अगदी छोटा जीव म्हणजे र्गभावस्थेतील जीव ! हा जीव मातेच्या मार्फत अन्न घेतो व वाढतो. हा वाढणारा भाग स्थूलदेहाचा असतो. मनुष्याचा पिंड अन्नमय असतो. अन्नामुळे  त्याची वृद्धी होते व अन्नाअभावी तो संपतो. देहासाठी अन्न हे एक शस्त्रच आहे. ते योग्य प्रमाणात घेतले नाही तर घातक ठरेल. जीवन जगण्यासाठी परमेश्वराने ते उत्पन्न केले आहे. प्राणवायू, पाणी तुम्हाला मोफतच मिळते. तरीही बुद्धीचा वापर करून त्याचा वापर आवश्यक तेवढाच करावा म्हणजे ते शस्त्र ठरणार नाही अन्न अभावी स्थूलदेह संपतो. हे ‘प्रायोपवेषन ‘ पद्धतीच्या देह समाप्तीच्या मार्गाद्वारे आपण अनुभवतो. ‘प्रायोपवेषन’ पद्धतीत देहाला अन्न देणे थांबविले जाते. अन्नच्या अभावाने देह खचू लागतो व नंतर हळूहळू संपतो. स्थूलदेह जमिनीवर पडण्या अगोदर निरनिराळी कारणे घडत असतात.कारण ” कारणा शिवाय मृत्यू नाही” . अशी भगवंताची नियती आहे. रोग, हत्या, आत्महत्या, अपघात असे काहीतरी त्याच्या मृत्यूचे कारण सांगितले जाते. मनुष्य मृत्यू पावतो म्हणजे नेमके काय होते ? देह तर समोर दिसतच असतो. देह येतानाही लोक पाहतात आणि गेलेला ही  पाहतात पण सामान्य लोकांच्या बाबत हे पाहणे स्थुलदेहाबाबतच असते.

स्थूल देहाची किंमत हि फक्त त्यात ‘ सूक्ष्म देह’ असे पर्यंत असते. जेव्हा स्थूल देहाला सूक्ष्म देह सोडून देतो, तेव्हा त्याची किंमत मातीमोल होते. गर्वाने ताठ उभा असलेल्या स्थूल देहाला सूक्ष्मदेह सोडून जाताच तो मातीवर आडवा होतो. व मातीतच विलीन होतो. म्हणून सतपुरुष “या स्य्हूल देहाचा अभिमान धरु नका” असे सांगतात. स्थूल देहाला जेव्हा सूक्ष्म देह सोडून जातो तेव्हा त्याला आपण ‘मृत्यू’ असे म्हणतो निरनिराळ्या नावाने याचे संबोधन केले जाते. कोणी मृत झाला असे म्हणतात, कोणी वैकुंठवासी झाला, तर कोणी कैलाशवासी झाला, तर कोणी यमसदनी गेले असे म्हणतात. काहींच्या बाबतीत ‘महाप्रयाण ‘ ‘महानिर्वाण’ असे आपण म्हणतो. मात्र सत्पुरुषाचे महानिर्वाण होते, हे सत्य आहे. त्यांची प्रत्येक कृती व वृत्ती महानिर्वाणाच्या योग्यतेची असते. पण सामान्याच्या बाबत स्वर्गवास किंवा यमसदन हेच असते. त्याचा मृत्यू कसा झाला हे आपण समजू शकत नहि. ते ज्याच्या त्याच्या कर्माच्या गतीवर अवलंबून असते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2




, , , , , , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा