अक्षय तृतीया
Like
Like Love Haha Wow Sad Angry
4

Akshaya Trithiya festival. why we celebrate Akshaya Trithiya festival? . how to celebrate Akshaya Trithiya festival?अक्षय तृतीया या दिवशी जे काही जप,होम,पितृतर्पण,दान ईत्यादी केले जाते ते अक्षय होते,असा शास्त्रसंकेत आहे. वैशाख महिन्यातील शुद्ध पक्षातीलतृतीया म्हणजे अक्षय तृतीया या दिवसाला कृतयुगाचा प्रारंभ दिन मानतात. हिंदू संस्कृती जे साडेतीन मुहूर्त पाळतात त्यातील अक्षयतृतीया हा अर्धा मुहुर्ताचा दिवस. अक्षयतृतीया हा वैशाख महिन्यात येतो वैशाख महिना हा वनव्यासाठी प्रसिद्ध आहे. सूर्याच्या तेजाने सृष्टी तापून निघत असते. अश्यावेळी थंडगार पाण्यासाठी जीव व्याकुळ होत असतो. म्हणून पांसथ्याची तृष्णा भागविण्यासाठी ठिकठीकाणी पानपोया सुरु केल्या जातात. तसेच वाटसरू रस्त्याने गर्द सावली असलेले झाड शोधत असतो. व त्याची पावले लगेच सावलीकडे वळतात. तेव्हाच त्याला विश्रांतीहि मिळते. आपल्या संस्कृतीत अन्नदाना पेक्षाही जलदानाला जास्त महत्व आहे. तेव्हा आपल्या पूर्वजांनी फार पूर्वी पासून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचा व पाणपोया लावण्याचा हाच उद्देश असावा. त्यामुळे तृशीतांची तहान भागते. व तहान भागविणारा पुण्याचा धनी होतो. वैशाखांचे हेच महत्व आहे.

अक्षयतृतीयेला देवता आणि पितर यांच्या उद्देशाने उदककुंभाचे दान करावे. असा संस्क्रुतिचा सांगावा आहे. मातीचे दोन माठ घेऊन एकात तांदूळ व एकात तीळ घालून देवापुढे थोडे धान्य पसरवून त्यावर हे दोन घट ठेवावेत. त्यांना दोरा गुंडाळून त्यात वाळा घालावा. त्याची पूजा करून नंतर ब्राम्हणाला दान करावे त्या सोबत आंबे व दक्षिणाही द्यावी. वर्षा आरंभी चैत्र तृतीयेला चैत्र गौरी बसविली जाते त्याची सांगता याच अक्षय तृतीयेला करतात. महिला हळदीकुंकू चा कार्यक्रम करून गोड जेवण व त्यासोबत हरबरा किंवा डाळीचे वाण ओटी मद्ये देतात. यादिवसात आंब्याचे पन्हे प्यायला देतात.

या उत्सवाला दोलोत्सव असेही म्हटले जाते. कारण चैत्रगौरी पाळण्यात स्थानापन्न केली जाते तिला झोका दिला जातो. गौरी व्यतिरिक्त विष्णू किंवा ईतर देवांसाठी हा दोलोत्सव साजरा केला जातो. अक्षयतृतीयेला गंगा स्नानाचेही फार महत्व आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्री भक्त पवित्र स्नाना करीता गर्दी करतात.यवहोम,यवदानआणि यवभक्षण  याचेही महत्व आहे.या दिवशी भगवान श्री कृष्णाला चंदनाची उटी लावूनपूजा करावी म्हणजे वैकुंठ प्राप्त होते असे म्हणतात. अक्षयतृतीया बुधवारी आली असता व त्या दिवशी रोहिणी नक्षत्र असेल तर म्हापुण्यकारक ठरते. अधिकस्य, अधिकम फलम अश्यावेळी पदरी पडते. अक्षयतृतीया वसंतोत्सवात येत असली तरी ग्रीष्माच्या तीव्र झळांनी वातावरण तापलेले असते.

अक्षयतृतीयेचे एक वेगळे महत्व म्हणजे या दिवशी परशुराम जयंती येते. परशुराम हा दशावतारातील सहावा अवतार. परशुराम हा रेणुकामाता आणि जमदग्नी ऋषी यांचा मुलगा. जमदग्नी हे अत्यंत कोपिष्टऋषी होते. त्यांनी संतापाच्या भरात माता रेणुकाच्या वधाची परशुरामास आज्ञा केलि. पुत्राने पित्याची आज्ञा त्वरित आत्मसात केली. परंतु परशुरामाने मी तुमची आज्ञा पाळल्याच्या बद्दल मला गुरूदक्षिणा द्यावी. आणि त्यात मला माझी माता परत जिवंत हवी अशी मागणी घातली त्यामुळे त्यांना माता रेणुकाला परत जीवित करावे लागले. परशुराम हे क्षत्रियांना धडा शिकविण्यासाठी नेहमी परषुचा वापर करत. त्यामुळे त्यांना परशुराम नावानेच संबोधत या परशुरामाला बघून क्षत्रिय चळचळा कापत. श्रीराम -जानकी विवाहा नंतर जेव्हा वर्हाड अयोध्येस परत येत असताना हाच परशुराम त्यांना रस्त्यात आडवा झाला. तेव्हा राजा दशरथ त्यावेळी घाबरले होते.पण दशरथी रामासमोर परशुरामाचे बळ फार तोकडे पडले.तेव्हा आपले अवतार कार्य संपले हे समजून परशुराम हे महिंद्र पर्वतावर तपश्चर्ये साठी निघून गेले. भारतीय संस्कृतीत क्षत्रियांचे शिरकाण करणारा जमदग्निपुत्र परशुराम आणि राक्षसराज रावणाला चारीमुंड्या चित करणारा दाशरथीराम या दोघांना डोक्यावर घेतलेले आहे. दशरथीरामा पुढे परशुरामाचे बळ तोडके पडले तरी रामाने परशुरामा पुढे नतमस्तक होऊन त्यांचा मानच राखला. परशुराम परतला तेव्हा त्यांच्या हृदयातील क्रोधज्योती श्रीरामाच्या हृदयी प्रविष्ट झाल्याचा उल्लेख श्रीराम विजयात आहे.

Get complete information about Marathi festival Akshaya Trithiya. why we celebrate Akshaya Trithiya festival? . how to celebrate Akshaya Trithiya festival? get answers of many questions of above.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
4
, , ,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu