Agitation for Woman Freedom : From so many years Woman are fighting for there freedom in this society. we are living in the 21st century still we they do not get freedom.
महत्वाचे मुद्दे : पूर्वीच्या स्त्रियांची स्थिती- पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीचे स्थान – स्त्री मुक्तीचा खरा अर्थ – स्त्री जीवनाचा विकास करून प्रगल्भ संसकृती निर्माण करायला हवी.
२-३ % स्त्रिया जर सोडल्या तर आपल्याला समाजात आजही स्त्रीची अवस्था सिंहा ने पाठलाग केलेल्या मानवाची जी अवस्था होते त्याप्रमाणे भयभीत झाल्या सारखीच आहे. तिचा भावनिक, वैचारिक कोंडमारा होत आहे, ‘ न स्त्री स्वातंत्र्य महर्ति, ”स्त्रीला कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य देऊ नये’ अशी आपली पुरुषप्रधान संस्कृती म्हणत आलेली आहे. त्यामुळे मुलीच्या जन्मापासूनच तिला गुलागीरीत राहण्याचे धडे दिले जातात. मुलींनी sबाहेर जायचे नाही, मोठ्याने हसायचे नाही,सतत काम करत राहायचं, सतत दुसर्यांचा विचार करून त्याच प्रमाणे वागायचे, पुरुष हा श्रेष्ठ असतो. त्याची बरोबरी करायची नाही. पुरुष तो भाऊ असो वा वडील असो कि पती त्याचा त्याचा मानराखायचा त्यांच्या इच्छे नुसार वागायचं. अशी भेदभावाची शिकवण घरातल्या स्त्रिया मुलींना देतात. आणि जन्मा पासूनच तीच स्वातंत्र हिसकावून घेतल्या जात. मुलाला मात्र हि शिकवण दिली जात नाही.
महात्मा जोतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात करून स्त्रीमुक्ती चळवळीचे पहिले पाउल टाकले. पण आता आज स्त्रियांच्या शिक्षणा कडे शासन अधिक लक्ष देत आहे. परंतु संपूर्ण समाजाची स्त्री विषयीची चुकीची धारणा बदलत नाही तोपर्यंत स्त्री मुक्त होणार नाही. आजही स्त्री शिकलेली असली तरी ती आर्थिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या परस्वाधीनच आहे. कुटुंबात तिची स्वत:च्या कमाइवर देखील सत्ता नाही. स्वत:च्या मुलांना ती स्वत:च्या ईच्छे नुसार संस्कारित करू शकत नाही. तिला स्वत:ला सुद्धा स्वत:च्या ईच्छेनुसार वागता येत नाही. मुलगी डॉ. इंजिनिअर शास्त्रज्ञ यांसारख्या अन्य विषयात उच्चविद्याविभूषित असली तरी तिचा कुटुंबातील दर्जा पुरुष्यापेक्षा खालचाच आहे. तिच्या विद्वत्तेच कौतुक होत नाही. शिकलेली असली तरी काय करायचं? स्वयंपाक, घरकाम येते का? असे तिला ठसक्यात विचारल्या जाते आणि स्त्रीमुक्तीला तिथेच बाधा आणली जाते. आणि विवाहित स्त्री ची गत तर ‘घरका न घाट का’ अशी असते. माहेर ही तीच नसत. व सासरी फक्त फुकटची मोलकरीण म्हणून किंमत असते. नवर्याची मर्जी किंवा सासरच्यांची मर्जी फिरली त्यांनी तिला घरा बाहेर जरी काढले तरी सासर कसेही असो ते तुझेच आहे हि सल्ला माहेरी मिळत असते. मग तिला आसरा कुठला? आणि तिने हिंमत करून स्वत:चा हक्क मागितला तर तिला बदनामी किंवा आप्तां पासून दुरावाच पत्करावा लागतो. अशा या स्थिती पायी म्हणूनच स्त्री मुक्ती चळवळ अत्यंत महत्वपूर्ण व आवश्यक आहे.
जन माणसात “स्त्री मुक्ती” या संकल्पने विषयी मुद्दामच काही गैरसमज पसरवलेले आहेत. उदा. स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुष जातीशी शत्रुत्व! पुरुषाला वाकविण्यासाठी स्त्रीने पुरुषाप्रमाणे वागणे म्हणजे स्त्रीमुक्ती ! स्त्रीमुक्ती म्हणजे स्वैराचाराचा परवाना! हि चळवळ म्हणजे उच्च्भ्रू स्त्रियांच्या करमणुकीचे साधन ! स्त्री हि कधी पुरुषाची बरोबरी करू शकेल कां ?
स्त्रीमुक्तीचा अट्टाहास म्हणजे स्त्रीचा निसर्गा विरुद्धचा लढा आहे. म्हणुन वरील सर्व गैरसमज समाजातून काढून टाकून स्त्रीमुक्तीचा खरा अर्थ समाजाला समजाविणे हे महत्वाचे आहे. तोच प्रथम समजाविला पाहिजे.
स्त्रीमुक्तीचा खरा अर्थ स्त्रीच्या कार्यशक्तीला आणि बुद्धीला विकसित होण्यास वाव देणे, स्त्रीचा दुय्यम दर्जा नष्ट करणे, स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करणे, स्त्रीचे अपमानित व परावलंबित जीवन सुधारणे, स्त्रीच्या भाव-भावनांचा आदर करणे.
विवाहा नंतर पुरुष स्वत:चे स्वातंत्र्य अबाधित राखतो. तो स्वत:च्या छंदासाठी वेळ देऊ शकतो. स्वत:चे आरोग्य, विश्रांती या गोष्टी वेळ काढून पूर्ण करतो. पण स्त्री हि विवाहा नंतर यासाठी अजिबात वेळ काढू शकत नाही. त्यामुळे विवाहा पूर्वीची उत्तम खेळाडू ,कलाकार, विदुषी हे सर्व विवाहा नंतर संपते. मग उरते ती फक्त पत्नी, गृहिणी, माता, स्वत:चे संपूर्ण स्वतंत्र अस्तित्व संपूष्टात आलेली. हे सर्व थांबविण्यासाठी समाजात व स्त्रियांमध्ये स्त्रीमुक्ती विषयी जागृती साठी स्त्रीमुक्ती संघटना कार्य करीत आहे. या विषयावर ‘ हुंडा नको ‘ ‘मुलगी झाली हो’ यांसारख्या प्रहसनांच्या द्वारे स्त्रीच्या कनिष्ठतेच प्रतिक असणार्या अनेक चालींवर आघात केल्या जात आहे. त्याच प्रमाणे स्त्रियांना त्यांच्या हितासाठी असलेल्या कायद्यांचे ज्ञान देणे, अडचणीत असलेल्या स्त्रीला कायद्याची मदत देणे, रोजगार मिळवून देणे. ईत्यादी कार्ये स्त्रीमुक्ती संघटना करीत आहे.
याच दृष्टीने भारत सरकारने शैक्षणिक धोरणात बदल करुन स्त्री-पुरुष समानतेचा दृष्टीकोन पुढील पिढीत रुजविण्याच्या दृष्टीने प्रगतीचे एक पाउल उचलले आहे. कष्टाळूपणा, लवकर उठणे, त्याग, सेवा ही स्त्रीचीच मक्तेदारी नाही, हे गुण पुरुषातही असले पाहिजे. स्वत:चा विकास करण्याची संधी दोघांना ही सारख्याच प्रमाणात मिळायला हवी. स्त्री-पुरुषात नैसर्गिक भिन्नता आहे ती तशीच राहणार आहे. निसर्गाने सोपविलेली जबाबदारी कोणालाच टाळता येणार नाही. पण मानवनिर्मित संस्कारात मात्र योग्य तो बदल करून प्रगल्भ संस्कृती निर्माण करता येईल. त्यानंतर स्त्री हि खर्या अर्थाने मुक्त असेल. व “यंत्र नार्यस्तु पुजन्ते,
रमन्ते तत्र देवता” हे सुभाषित प्रत्यक्षात येईल.