Why Problem Students Should Sit Up Front in Class, If your child is seated up front in his classroom, right under the teacher’s nose, it might be a good idea to ask why.
महत्वाचे मुद्दे : मुल जन्माला आले कि विद्यार्थी जीवन सुरु होते, मातृभाषा सोडून इंगजी माध्यमाच्या शाळेत रवानगी, अभ्यासाला आवश्यक असा निवांतपणा नाही, त्यामुळे तारांबळ, सालांत परीक्षा देताना व दिल्यानंतर ग्रासणारी वैफल्य-ग्रस्तता, उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थांपुढची प्रश्न चिन्हे.
खर्च आहे आज मुल दोन वर्ष्याचे होते न होते तोच त्याचे विद्यार्थी जीवन सुरु होते. आणि ते ऎव्लेसे मुल त्याच्या परीराज्यात रममाण होण्याच्या वयात असताना पालकांना मात्र भीषण समस्यांना सामोरे जावे लागते. व तेथेच त्यांच्या सत्व परीक्षेला सुरवात होते. ‘याला कोणत्या शाळेत प्रवेश मिळेल’? आता तर मराठी माध्यमाचा विचारच सोडलेला आहे, पण ‘मी कामावर गेल्यावर तो कोठे राहील’? या वयात मुलास नैसर्गिक विधी कुठे करावे याचे पुरेसे ज्ञानही त्याला आलेले नसते. बर तर अशा बाल वयातच त्यांची मुलाखत (?) घेतली जाते. त्या वेळेस त्या मुलाची कधी प्रकृती बरी नसली, कधी भूक लागलेली असेल, किंवा झोप हि लागलेली असू शकते अशा वेळेस ते धड बोलू शकत नाही, कधी घाबरून रडत सुटते आणि परिणामी त्याचा प्रवेश नाकारला जातो. त्याचा अर्थ तो बुद्धीत कमजोर असते असे मानल्या जाणे ही अयोग्य आहे.
* ज्या वयात विद्यार्थ्याला काहीच कळत नाही, अशा वयात पुढारलेले आणि स्वत:ला प्रगत समजणारे आई-वडील आपल्या मुलाला उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने मातृभाषा सोडून एकदम इंग्रजी शाळेत घालतात. ते मुल काही दिवस हे ओझे वाह्ते. पुढे ते ओझे त्याला असह्य होते आणि मुले ती भाषाव ते ज्ञान शिकायचे नाकारू लागते. याचेच पर्यावसन मुले शाळेमध्ये अभ्यासात मागे पडण्यात होते. शाळेत शिक्षक व घरी आई-वडिलांच्या बोलण्यामुळे त्याला जीवन नकोसे होते, व विद्यार्थ्या समोर प्रश्न उभे राह्ते – आता मी काय करू ?
* मुल मोठे होते शाळेत त्याचा अभ्यास वाढतो. गृहपाठ वाढतो ज्ञानार्जन अधिकाधिक दुर्बोद्ध व कंटाळवाणे होऊ लागते. पण अभ्यासासाठी वेळ काही वाढत नाही त्यातील गांभीर्य घरच्या लोकांच्या लक्षात येत नाही. अशा वेळी त्याला अभ्यासाला अधिक वेळ देणे आवश्यक आहे. त्याला निवांतपणे अभ्यासाला जागा हवी. शांतपणा हवा हे त्यांना कळत नाही. त्याच्या अभ्यासाच्या वेळी मोठ्यांसाठी टी. व्ही. चालू असतो. सर्व कुटुंबीय त्या करमणुकिचा आस्वाद घेत असतात त्यावर मुक्तपणे स्वत:ची मते मांडत असतात अश्या गोंगाटात विद्यार्थ्याचे अभ्यासात लक्ष लागणार तरी कसे? मग त्याचेहि टी. व्ही. कडेच लक्ष असणार हे मोठ्यांच्या लक्षातच येत नाही. जर मोठीच मंडळी टी.व्ही बघत असतील तर मग त्याचा काय दोष आणि वरून मोठीच मंडळी ओरड घालतात कि तुम्ही अभ्यास करीत नाही.
* घरात विद्यार्थ्याला अभ्यासात मार्गदर्शन करणारे कोणी नसते. मग पालक कोणत्यातरी जादा अभ्यास वर्गाला भक्कम शुल्क भरून हे मेंढरू एकदाचे कळपात सोडतात. व स्वत: हात सोडून मोकळे होतात. शाळेतील गृहपाठासाठी, क्लासच्या गृहपाठासाठी वेळ ह्वा. ही दोन्ही गृह पाठाची कसरत करताना विद्यार्थ्याची तारांबळ उडते. यातील त्याला न विचारताच सर्व गोष्टी केल्या जातात.
* पहिली महत्वाची म्हणजे शालांत परीक्षा यातच पालकांच्या अपेक्षा उंचावतात. शाळेच्या अपेक्षांना पंख फुटतात, आणि विद्यार्थ्याचे पंख कापले जातात. अवांतर छंद, करमणूक बंद होते. विद्यार्थी अभ्यासाच्या पिंजर्यात पूर्णपणे कोंडला जातो. त्याची वाढ खुरडते त्याचे मन खुरडते. त्याला याचा प्रश्न पडतो की हा आमचा विकास ? सर्वांगीण विकास की ही सूज? आमच्या कला, आमची आवड याचा कुठेच विचार केला जात नाही, आणि त्याचे तोंड बांधले असते, आई-वडिलांच्या इच्छेने आणि आर्थिक परिस्थितीने, चित्र कलेची आवड असणारा विद्यार्थी गणिताचा अभ्यास करतो, तेव्हा मनाचा कोंडमारा होतो. ते आक्रंदच असते. मला मुक्त करा, मला मुक्त करा.
* उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल लागतो. ह्लवायांच्या दुकानात ग्राहकांनी त्या दिवशी गर्दी केलेली असते.पेढ्यांची देवाण -घेवाण होते.विद्यार्थी मात्र अस्वस्थ. गुण पत्रिका हातात घेऊन कॉलेज, तांत्रिकी शालांमधून प्रवेश घेण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या, उच्चटक्के वारीसच प्रवेश असल्याचे फलक बघत.प्रवेश नाही. पुढे काय? छोटे छोटे खाजगी संस्थानतर्फे चालणारे प्रमाण पत्रांचे अभ्यास क्रम करून घेतात. व जीवनातील सर्वात अधिक कर्तुत्वाचा (?) क्षण म्हणजे नोकरी आणि ती मिळविणे ?
* कोण देणार नोकरी? मागासवर्गीय आहांत? अपंग आहांत? नाही? मग कुठे नोकरी? कुठे आहे नोकरी?
* आता पर्यंतचे आयुष्य, शिक्षण सर्वच फुकट गेले, विद्यार्थ्यांसमोर सर्वात मोठे प्रश्न चिन्ह. वैफल्य हेच त्याचे उत्तर.
* उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्या पुढील प्रश्न चिन्हे तरी कुठे संपलेली असतात? पदवीधर, उच्च पदवीधर विद्यार्थ्याला पात्रता व वेतन कमी असणाऱ्या जागांवर काम करावे लागते. उच्चतम शिक्षण घेण्याची ईच्छा असली तरी त्याची सोय भारतात क्वचितच असते.त्यासाठी प्रदेशगमन हा एकच उपाय असतो. परदेशगमनासाठी संपत्ती असल्यास ठीक अन्यथा तीही ईच्छा मारावी लागते. जे परदेशातून शिक्षण घेऊन भारतात येतात अशांच्या पात्रतेच्या नोकर्याच उपलब्ध नसतात.व वेतनमान फारच कमी असते. त्यामुळे भारतातील बुद्धिमत्ता प्रदेशात वास करते.