छंदे छंदे तीर्था जासी । परी अविद्यासि न सांडिसी ।
वायां आत्मरूप कष्टविसी । तेणें न पावसी रे नित्य सुख ।।
ध्यान धारणा मुद्रा जप । यम नियम करिसी तप ।
तेणें तुझी न चुके खेप । आराधी स्वरूप एकभावे ।।
पर स्त्री तितुकी जाण रे माता । एसें मनी मानी रे तत्वतां ।
पर द्रव्य येऊ देऊ नको रे चित्ता । मग गुरु नाथा सेवि तया ।।
तो सांगेल गर्भखून । तेणें तुज होईल आत्म ज्ञान ।
फिटेल भ्रांती देखसी निरंजन ।शून्य भुवन देहा माजी ।।
तेथून सुनीळ प्रकाशु । सोहं गर्जना रात्रंदिवसु ।
आणिला राजा परमपुरुषु । भोगी रहिवासु आत्मज्ञानी ।।
हे जरी सत्य न मानिती मनी । ते नर पुढती येती ये जनी ।
खेचर विसा करी विनवणी । कोप न धरी रे नामया ।।६।।
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल …..