Vidhnyan shap ki wardan. science progress, science is faithful and unfaithful.
महत्वाचे मुद्दे : विज्ञान हे अखिल मानव जातीच्या विकासासाठी लाभलेले वरदान — विज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्रात झालेली अपूर्वक्रांती – तंत्रज्ञानामुळे शेतीला झालेला फायदा. दूरदर्शन, आकाशवाणी, गणकयंत्रे, कृत्रिम उपग्रह यामुळे मानवीजीवन ज्ञानपूर्ण,वेगवान व सुलभ झाले आहे. यंत्राने झालेले अपघात टळण्यासाठी विज्ञानाचीच मदत – विज्ञान आधुनिक युगातला देव.
विज्ञान हे अखिल मानवजातीस मिळालेले वरदानच आहे.पण त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आपण कसा ठेवतो. यावर त्याची योग्ययोग्यता आपल्याला दिसत असते. विज्ञान हा शापच आहे असे म्हणणारयांना विज्ञानामुळे जगात घडलेली उत्क्रांती दिसण्यापेक्षा विज्ञांनाचा दुरुपयोग करून माणसाने केलेला विध्वंसच तेवढा दिसतो.
*विज्ञान हे विस्तवा प्रमाणे आहे. त्यात तुम्ही हात घालून भाजून घेता की त्याचा अन्न शिजवायला उपयोग करता हे ज्याच्या त्याच्या वृत्तीवर अवलंबून असते. विज्ञानाचे उपयोग पुष्कळ आहेत. मात्र आपण त्याचा योग्य तर्हेने वापर करून घेतला पाहिजे.
*विज्ञान हे अखिल मानवजातीच्या विकासासाठी लाभलेले एक प्रभावी साधन आहे. विज्ञानाची झेप आज कोठपर्यंत गेली आहे? चंद्र, मंगळाचे वेध घेतले ते विज्ञानामुळेच ! विज्ञानाच्या साहाय्यामुळेच सिद्धातांच्या आणि कल्पनांच्या मनोऱ्यानी तो गगनाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक क्षेत्रात विज्ञानाने सिंहाचा वाटा उचलेला आहे.
*आपण आज पाहतो कि माणसाला ‘टेस्टट्यूब बेबी’ चा शोध लागलेला आहे. ‘क्ष’ किरणांच्या शोधामुळे अनेक आजारांचे निदान करणे सुलभ झाले आहे. स्क्यनिंग सारख्या काही उप्च्यार पद्धतीमुळे ‘ब्रेन ट्युमर’ (Brain Tumer) सारखा असाध्य रोग आता उपचारक्षम झालेला आहे. एड्स(HIV ADS), ल्युकेमिया(Leukemia), कर्करोग(Cancer) यांसारख्या अजून असाध्य अश्या रोगांवर याही पेक्षा प्रभावी उपचार शोधण्यासाठी शास्त्रज्ञ धडपड करीतच आहेत. तसेच अपंगान्साठी कृत्रिम अवयवां चा शोध लाऊन त्यांच्या समस्या दूर झालेल्या आहेत. ते स्वयंपूर्ण झालेले आहेत. त्याच प्रमाणे रोपण आणि प्लास्टिकसर्जरीद्वारा ईतर दुय्यम न्यूनत्व काढता येणे सहजसुलभ झाले आहेत.
*भारत हा कृषीप्रधान देश आहे. ‘जय जवान जय किसान’ हा भारताचा मूलमंत्र आहे. शेतकर्यांच्या मदतीलाहि आता विज्ञान गेले आहे. ट्यक्टरनलिकासंरचनामुळे पाण्याची व शेतीची कामे सुलभ झाली आहे. परदेशात तर शेतीची सर्वच कामे यंत्रा द्वारेच होतात. आपल्या भारतातहि बरीच कामे यंत्राद्वारे करण्याच्या प्रगतीपथावर आहे. यामुळे वेळेची बचत, मनुष्यबळ कमी लागते हे दोन्ही फायदे झालेत. आज विज्ञानाच्या सहाय्याने उत्तम खते, बी-बियाणे यांद्वारा शेतकरी आपले पिक आणि उत्पन्न वाढवू शकला आहे. मृदासंधारणासारख्या व सर्वेक्षणासारख्या काही उपाय योजनांनी शेतकर्याला अधिक आनंदी बनविले आहे.
*हल्ली दूरदर्शन आणि आकाशवाणी या ज्ञानदानाची व ज्ञांनार्जनाची साधने आहेत. या द्वारे खेड्यातील बहुतांशी लोकांना सामुहिक शिक्षण दिले जाऊ शकते. आज आकाशवाणीचे कार्यक्रम घराघरातून एकले जातात.हि किमया विज्ञांणाचीच नव्हे का ! त्यामुळे आपले मनोरंजन व ज्ञांनार्जन घर बसल्या होते. केवळ कांही सेकंदात मोठमोठ्या अंकांची बेरीज आपण गणकयंत्राद्वारे मिळवू शकतो. परग्रहांचा शोध लावणार्या कृत्रिम उपग्रहांवर संगनकाच्या सहाय्याने नियन्त्र ठेवता येते. हजार माणसांचे आणि यंत्राचे काम आज एक गणकयंत्र यंत्रमानवाच्या सहाय्याने सहज तेणे करू शकतो. हि किमया विज्ञांनाचीच की! आज आपण अल्पावधीतच ईच्छित स्थळी जाऊ शकतो.त्यासाठी अनेक वाहने उपलब्ध आहेत.
*यंत्रे आली, वाहने आली त्यामागे अपघात हेही आलेच पण ते टाळण्यासाठी विज्ञांनाणेच सुविधा पुरविल्या आहेत. जागोजागी सिग्नल लावले असल्याने सांकेतिक खुणांच्या स्वरूपाने आता रहदारी नियंत्रणा खाली आली आहे. आज माणूस यंत्रमानव प्रमाणे अहोरात्र काम करतो. त्याला आराम देण्यासाठी वीज पंख्याच्या रूपाने दासी बनून वारा घालते.दूरदर्शन कलावंताच्या रूपाने मनोरंजन करते. आज विज्ञांनाच्या सहाय्याने कृत्रिम धागे व त्या पासून मिळणारे कपडे व अधिक टिकाऊ आणि उच्चप्रतीचे असतात. आज मानव पूर्णत: विज्ञांनावर अवलंबून आहे. विज्ञान आजच्या युगातील देव आणि जादुगरही आहे.