The Women of Honor in India, Women have always been shown respect in the Indian society. Read about Indian woman’s social position….
भारतीय समाजात नारीला एक विशिष्ट आणि गौरवपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. आर्य-पुरुष्याने तिला आपली अर्धांगिनी मानलेले आहे. व्यवहारात पुरुष-मर्यादेपेक्षा स्त्री-मर्यादा नेहमीच उच्च आहे. जसे यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता | यत्रैनास्तु न पुजन्त्ये सर्वास्तत्राफला: क्रिया: ||
अर्थ : “ज्या कुळात स्त्रियांचा आदर होतो. तेथेच देवतां प्रसन्न राहतात आणि जेथे असे होत नाही तेथील सर्व क्रिया निष्फळ होतात”.
सृष्टीच्या आरंभीच परमात्म्याने स्वत: ला दोन रूपांत विभक्त केले. अर्ध्या हिश्यापासून पुरुष बनले आणि अर्ध्यापासून नारी. उज्व्या भागापासून पुरुष व डाव्या भागापासून प्रकृती. सर्व शास्त्र, वेद, पुराण, स्मृती, संस्कृती देखील स्त्रीला पुरुष्याची अर्धांगिनी मानतात. गृहस्थाच्या घरी स्त्रीला लक्ष्मी मानतात. ज्या घरात स्त्री नसेल त्या घराला जंगलासमान मानले जाते. त्या घराला घर म्हटल्या जात नाही. जेथे गृहिणी राहते त्यालाच घर म्हटल्या जाते.
ज्या घरात नारिचा सन्मान होत नाही, तिच्या अधिकारांची सुरक्षा होत नाही, ते घर लक्ष्मीने शून्य होऊन जाते. ज्या घरात दु:खी स्त्री अभिश्याप देते, त्या घराचे धन, पशु, आणि संतान सर्व नाश पावतात. म्हणूनच सुख- शांती ईच्छीनाऱ्या लोकांनी प्रत्येक उत्सवात, भोजन-भूषण (Bhojan – Bhushan) इत्यादींनी नेहमीच नारिचा सन्मान केला पाहिजे. जेथे हे होते तेथेच सुख-शांती प्रसन्नता भरपूर असते. तिचा अपमान हा पुरुष्याचाही अपमान आहे.
स्त्री हि नेहमीच रक्षण करण्या योग्य आहे, सदा अवध्या आहे. कोणत्याही जातीची स्त्री (Stree), मग ती कशीही कां असेना, तिला मारणे पाप समजले गेले आहे. जो दुखा:त पडलेल्या नारीचे रक्षण करतो. तो जणू अनेक पापांचे प्रायश्चित करून पुण्याईचा संचय करतो. जो नारीचे रक्षण करीत नाही, व तिला पिडीत करतो तो आपल्या पापांचा संच करतो.
नारी ही अबला नाही ती सबला देखील आहे. ती भोग वस्तू नाही. ती पुरुष्याला देखील धडा शिकवू शकते. स्त्री ही आपल्या आई-वडील, सासू-सासरे आणि पती यांची उद्धारक होऊ शकते. जर ती आपल्या चारीत्र्य व साधनेत दृढ आणि उत्साही बनली असेल तर ती अधिक पूजनीय (Naree Pujania )आहे. ती अधिक सन्मानास प्राप्त आहे.