एका गर्दग्रस्ताची आत्मकथा
Like
Like Love Haha Wow Sad Angry

story of the drug addict

” एs हमाल ” मी दुकाना समोर बसलेल्या मळकट कपड्यातल्या, दाढी, केस वाढलेल्या एका असती पंजर इसमाला हाक मारली. त्याच्या डोक्यावर सामान देऊन आम्ही घराची वाट चालू लागल. मधून मधून तो थकून थांबत होता. घामाने निथळत होता. काय रे नुकताच हमाली करू लागला काय ? सवय दिसत नाही ” ” होय साहेब तुमचे सामान मी घेतलय पहिल्यांदाच . मी हमाल नाही ”

* मी चांगल्या घरातील तरून आहे. पण माझ्या वेश्यामुळे मला कोणी नोकरी देत नाही रोज मी त्या दुकाना समोर माझ्या दुरवस्थेचा व भवितव्याचा विचार करीत बसलेला असतो.”  ” मग तुझी हि अवस्था का ? ” साहेब मी गर्दग्रस्त होतो ( Drugs addict). नुकतच माझ व्यसन सुटले. पण पूर्वीची उमेद, उत्साह, जम मला अजून लाभलेला नाही. त्या गर्द ने मला इतक पोखरल आहे. कि माझ्या श्रीराच फक्त चिपाड राहील. एके काळी मी शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली होती. नाही ना हे खरे वाटत? पण ते अगदी खरे आहे. मी बुद्धिमान होतो बारावीला मी ९८% गुण मिळवून इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला. वस्तीगृहात राहण्याची सक्ती होती तिथे राहायला गेल्यावर सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांशी संबंध आला. तिथे मला गर्द ची नश्या कळली. पहिल्यांदा उत्सुकता, सक्ती नंतर व्यसनासक्त होऊन शेवटी मी सतत गर्द ओढू लागलो. महागड व्यसन, व्यसनपूर्तीसाठी पूर्णपणे वेडा झालो. वह्या, पुस्तके विकली. फी चे पैसे व्यसनात घालविले. नंतर प्राच्यार्यान्नि वडिलांना कळविले. वडील आले पण तेव्हा फार उशीर झाला होता. मी तर या व्यसनाच्या इतका अधीन झालो होतो कि आई-वडिलाच दु:ख त्याचे प्रेम, घराची होणारी वाताहात काही काही मला दिसत नव्हत. अखेर प्राच्यार्यांनी मला कॉलेज मधून काढले.  माझे वडील मला घरी घेऊन आले.

* वडिलांनी मला डॉ. कडे नेल. डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करून घेतल. व वडील घरी गेले.वार्ड बॉयला माझ्या कडे लक्ष ठेवण्यास सांगितले. डॉक्टरही निघुन गेले. माझ्या शरीरातील गर्द्ची मात्रा संपत आली होती (Lower the drugs quantity). मी अश्वस्त होऊ लागलो. थरथरू लागलो. घाम फुटला , वेडापिसा झालो. आणि वार्डबॉय ची नजर चुकवून पळालो-गर्द च्या शोधात. अड्ड्यावर पोचलो. गर्द घेतली आणि मगच माझा जीव शांत झाला. गरी पोचल्यावर परत माझी रवानगी रुग्नाल्यात झाली. पुन्हा तेच डॉ. तेच रुग्णालय, पण वडिलांनी डॉ. आशा सोडली नव्हती. यावेळेस मला मात्र मोकळ सोडले नाही. एका खोलीत दोन-तीन दिवस कोंडून ठेवले. गर्द अभावी माझी अवस्था पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे झाली. मी खोलीतल्या खोलीत धावत होतो. पुन्हा शक्ती संपली कि पडत होतो. मोठमोठ्याने ओरडत होतो. रडत होतो. शिव्या देत होतो पण माझी सुटका होत नव्हती. हळूहळू माझी शक्ती शिन झाली. अन्नावरची वासना कधीचीच उडाली होती. कधी म्ल्म्लायचं, कधी उलट्या व्हायच्या कधी जुलाब व्हायचे. हे सर्व गर्दचा अंश शरीरात नसल्याने व्हायचे गर्दच व्यसन लागले कि ते शरीरात सतत असणे आवश्यक होते.ते नसले तर माणूस माणूस राहात नाही. हळूहळू मी शांत होत होतो.डोक ठिकाणावर आले होत.डोक दुखायचं मी विचार करू शकत होतो.माझी मलाच लाज वाटायची पुन्हा पूर्वायुष्य आठवल कि गर्द्ची आठवण व्हायची. पण मी प्रयत्न पूर्वक त्यावर काबू करू शकत होतो. कारण मला आता बर व्हायचं होत, पुन्हा माणसात यायचं होत.

*  ‘ रुग्णालयात असताना विचार करू लागलो कि वाटायचं कि आपल्या सारखे किती तरी हुश्यार, होतकरू विद्यार्थी या व्यसनान पछाडले गेले असतील.किती तरी तरुणांच्या आयुष्याचे मातेरे झाले असेल, किती तरी घरे उजाड झाली असतील.कालकुटाहूनहि जहाल हे विष आलं कुठून? त्याचा बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर भारताच्या भावी पिढी मध्ये गर्दग्रस्तंची संख्या बेसुमार  वाढतच जाईल. भारताची पवित्र भूमी स्मशानभुमी होईल. हे सर्व रोखले पाहिजे. अल्कोहोनिम ऑनानिमस (Alcoholic anemia) सारख्या संस्थानच्या साहायाने तरुणांना जागृत केले पाहिजे. छापे घालून गर्दचे दलाल व साठे जप्त केले पाहिजे. गर्द्ची विक्री करणार्यांवर कायदेशीर इलाज केला पाहिजे. या विचारान मी एवढा भारलो कि माझी स्वत:ची, गर्दच्या व्यसनातून माझ्या मननोबलाची मी सुटका करून घेतली. “माझे भवितव्य भीषण आहे याची मला जाणीव आहे. पण माणूस हा स्वत:च्या जीवनाचा शिल्पकार आहे. असा माझा विश्वास आहे. आणि म्हणूनच माझे उज्ज्वल भवितव्य मी घडवू शकेन. मी माणसात आलो याचाच मला आनंद आहे. या  कामानेच माझ्या उज्ज्वल भवितव्याचा शुभारंभ झाला आहे. माझ्या या पुनरुज्जीवनातून माझ्या सारख्या अनेक गर्दग्रस्त तरुणांना स्फूर्ती मिळून तेही या भयानक व्यसनातून मुक्त होवून सुखी ( Free from drugs addictions ), निरामय जीवन जगू शकतील. त्या दृष्टीने आजचा दिवस माझ्या जीवनातील मोठा भाग्याचा, असच मी मानतो.”

*  तेवढ्यात  माझे घर आले.त्या तरुणाने सामान घरात ठेवले. दिलेले पैसे घेतले आणि माझे मन:पूर्वक आभात मानून तो परतला.

Story of Drugs Addict Person, This is my story. … My addiction had resorted to selling my body to get drugs. … if I have anything to say to the people who suffer from drug addiction

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu