हे जीवा अशी तगमग आणि तळमळ उत्पन्न झाली आहे काय? या संसार सागरातून या मायेच्या, मोहक, व मारक मोहजाळातून सुटून जाण्याची तुमच्या ठायी उत्पन्न झाली आहे काय? कनक-कामिनीच्या वैभवातून गुंगून,रंगून,आणि झिंगुन गेलेल्या जीवा ती मोह मदिरा उतरून तुला तुझ्या कृतकर्माचा पश्च्याताप होवून तुमचे हृद्य भरून येत आहे काय? पाण्या वाचून तडफ़डनाऱ्या माश्या प्रमाणे, आई वाचुन चुकलेल्या बालका प्रमाणे,धेनु वाचून हंबरनाऱ्या वासरा प्रमाणे तुमच्या जीवाची”सोs हं परब्रम्हा”साठी कासाविशी होत आहे काय? होत असेल तर आधी सद्गुरूमार्ग धरा व शरण जा. ममत्वरुपी वृक्षाचा छेद करा.
ध्यानाचे महत्व ( साधना ) (Dhyan Ka Mahhatwa) Sadhna :
ध्यान योगाने ज्ञान व ज्ञानाने विज्ञांन प्राप्त होते, म्हणूनच ध्यान योग श्रेष्ठ आहे.कारण ध्यानाने म्हणजे अवधानानें किंवा एकाग्रतेने कोणत्याही गोष्टीचे खरे मर्म किंवा ज्ञान किंबहुना,यथावत आत्मज्ञान होऊ शकते. ब्रम्ह साक्षात्काराच्या दृष्टीने घ्यान योगाचे वैशिष्ठ्य व महात्म्य नि:संशय,अपरंपार व अतुलनीय आहे. ध्यांनयोग विश्वातील सर्व योगांत श्रेष्ठतम योग आहे. कर्मयोग,भक्तियोग,ज्ञानयोग,प्रेमयोग, लययोग,मंत्रयोग, तंत्रयोग,यंत्रयोग, जपयोग,हटयोग,राजयोग,ईत्यादी जगांत जेवढे म्हणून योग आहेत त्या सर्वात ध्यानाची म्हणजे अवधानाची किंवा एकाग्रतेचि अपरिहार्यपणे पूर्ण आवश्यकता आहे. घ्यानाशिवाय जगातील कोणताच योग पूर्णत्वांला पोहचू शकत नाही.सर्व योगांचा राजा ध्यानयोग हाच खरा राजयोगाचा आत्मा आहे. असे स्वयं श्री गोपालकृष्ण म्हणतात.