Science and War Articles, For a number of centuries science kept itself aloof from warfare. It was not until the Chinese invented the gun-power that science became an active and powerful Science and war. The conflict in the Middle East has started a discussion in academic circles about the responsibility of scientists in times of political turmoil.
महत्वाचे मुद्दे :विज्ञानांत रोज नित्य नूतन भर,विज्ञांनाचा युद्धामध्ये केलेला गैर वापर, विज्ञांनामुळे सारे जग जवळ येते,
तिसर्या महायुद्धाचे सावट,विज्ञांनाचा उपयोग,मानव संहार की मानव कल्याण.
* मानवाने विज्ञांनात विलक्षण प्रगती केली आहे. विज्ञान हा मानवाचा तिसरा डोळा आहे (Science is third eye of human). जे मानवाच्या चर्म चक्षुंना दिसत नाही ते या विज्ञांनाच्या तिसऱ्या डोळ्याने दिसते. विज्ञांनात रोज नवनवीन संशोधन होत आहे. आजचे शोध उद्या जुने होत आहेत किंवा चुकीचे ठरत आहेत. विज्ञांनाच्या सहाय्याने मानव अशक्य वाटणार्या गोष्टी शक्य करीत आहे. शेती, वैद्यकशास्त्र यात मानवाच्या हितांच्या दृष्टीने नवनवीन प्रयोग केले जात आहे. वैज्ञांनिक शोधांपासून मानवाला असाध्य रोगांपासून मुक्ती मिळत आहे.शेती उत्पादन वाढल्याने देशाच्या समृद्धीला हातभार लागत आहे. हे सर्व खरे असले तरी मानवाला विज्ञानाचा लाभलेला तिसरा डोळा शंकराच्या तिसऱ्या डोळ्यासारखा विनाशाला कारणीभूत ठरत आहे. ‘बहुजन हिताय’ असणाऱ्या विज्ञांनाचा युद्ध शास्त्रात वापर केल्याने सारे जग भस्मीभूत होईल की काय अशी साधार भीती वाटत असते.
* “युद्धध्स्य कथा रम्या’ असे एक वचन आहे. युद्ध कथा ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात, शरीरात वीरश्री संचारते हे जरी ख्ररे असले, तरी रणांगणावर प्रत्यक्ष होणारा विनाश पाहिला की अशोकासारख्या महान योद्ध्याला सुद्धा विरक्ती येते तेथे सामान्य माणसाचा काय पाड ? ओंम शांती: शांती: शांती: चा मंत्र जपणारा मानव सुद्धा युद्धात राक्षस होऊ शकतो.
* युद्ध केल्याने मानवजात कधीच सुखी झाली नाही. रामायणातील राम -रावणाचे युद्ध काय किंवा महाभारतातील कौरव-पांडवांचे युद्ध काय, अनेक संहारक अस्त्रांच्या सहायाने युद्ध खेळले जाते. आणि या सर्वाचा शेवट एकच विनाश ! रामायण- महाभारत या काळातही विज्ञान प्रगत असल्याचे जानवते, कारण युद्धामध्ये ही आजच्या विज्ञान युगातील अस्त्रांप्रमाणे,पर्जन्यास्त्र, अग्न्यास्त्र, वायवास्त्र, ब्रम्हमास्त्र, इ. अस्त्रांचा वापर केला गेला. आज अस्त्रांचे प्रकार काळानुसार वेगळे आहे. दुसऱ्यां महायुद्धात जपानच्या अणुबॉम्बचा वापर करण्यात आला.आणि इराक-अमेरिका युद्ध झाले त्यात ‘स्कड’ आणि ‘पेट्रीयॉट’ यांसारखी क्षेपणास्त्रे वापरली गेली. त्यांच्या फेकीत अचूकता यावी म्हणून कॉम्प्युटरचा आणि लेसर किरणांचा उपयोग केला. ज्या उपग्रहांच्या सहायाने ईतर ग्रहांवरील छायाचित्रे घेतली जात होती त्याच उपग्रहांच्या सहाय्याने पृथ्वीच्या पोटांतील नागरिकांची आश्रयस्थाने असलेली भुयारे शोधून त्यावर बॉम्बवर्षाव करण्यात येत होता.
विज्ञांनामुळे सारे जग जवळ आले आहे.’जय जगत’च्या धोषणा दिल्या जात आहेत. विश्वबंधुत्व आणि विश्वशांतीचा संदेश घरोघरी टी.व्ही. द्वारे पोचविला जातो पण तेच विज्ञान विश्वविनाशाला कारणीभूत होण्याची चन्हे आहेत. सत्तांधतेमुळे मानव हा दानव झाला आहे.व “सर्वेन:सुखिन: सन्तु, सर्वे सन्तु निरामया: सर्वे भद्राणि पश्न्तु माकश्चित् दु:ख माप्नुयात्” ही भावना तो विसरला आहे. शस्त्रास्त्रांच्या खणखणाटाने मानवी उद्धार होणे कठीण आहे, या महात्मा गांधींनी दिलेल्या संदेशाकडे त्याने दुर्लक्ष केले आहे. विज्ञान हे सर्व भौतिक सुखांचे प्रवेशद्वार आहे. याचे भान त्याने न ठेवल्याने विज्ञांनाचे विपरीत ज्ञान होऊन ते मानवजातीच्या संहारास कारणीभूत ठरत आहे. एकीकडे अमेरिका- रशिया या बलाढ्य देशांमध्ये मध्यम पल्ल्याची क्षेपणातस्त्रे जागतिक शांततेच्या दृष्टीने नष्ट करण्याचे करार होत असतानाच दुसरीकडे शत्रूराष्ट्र नामोहरम करण्यासाठी अधिक प्रभावी आणि घातक अशी रासायनिक व जैविक अस्त्रे विज्ञांनाच्या साहाय्याने निर्माण करण्याचे प्रयत्न चालूच आहेत.
आज जगात तो विज्ञांनाचा युद्धशास्त्रासाठी दुरुपयोग होत आहे. याची कल्पना जर संशोधकांना त्यावेळी आली असती तर त्यांनी आपले उभे आयुष्य संशोधनात खर्ची घातले नसते. या सर्व शास्त्रज्ञानच्या आत्म्यांना नक्कीच दुख होत असेल.
तिसर्या महायुद्धाचे सावट जगावर पसरलेले आहेच. सारे जग विनाशा च्या गर्तेत उभे आहे. बहुतेक देशांकडे विविध प्रकारचे अणुबॉम्ब आणि क्षेपणास्त्रे तयार आहेत. पण पुढील प्रलय टाळायचा असेल तर वैज्ञानीक संशोधनाचा उपयोग युद्ध आणि मानवसंहारा साठी न करता केवळ मानव-कल्याणासाठी केला जाईल याची खबरदारी प्रत्येक राष्ट्र मानवाने घेणे आवश्यक आहे. अन्यथा विनाश अटळ आहे. “विनाश काले विपरीत बुद्धी “!– दुसरे काय होणार ?