Saints Doctrine (Santanchi Shikwan) : Je ka Ranjale Ganjale tyasi Mhane jo apule || Tochi sadhu Olkhawa, dev tethichi Janawa. our Saints teaches us how to live life in the shadow of God.
मुद्दे: संतांची शिकवण सर्व जग शिरोधार्य मानते. संत ज्ञांनेश्वर, एकनाथ, तुकाराम, रामदास यांची शिकवण, राष्ट्रसंतांनी राष्ट्रीय चारित्र घडविले, बहु जन हिताय बहु जन सुखाय हि संतांची शिकवण, संत म्हणजे समाजाचे दीपस्तंभाप्रमाणे खरे मार्गदर्शक.
“बालकाचे साठी, पंते हाती धरिली पाटी ।
तैसे संत जगी, क्रिया करुनी दावी अंगी” ॥
(Balkachya Sathi, Pant hathi dharile pathi | Taisi sant jagi, Kriya karuni dawi angi || )
संत केवळ उपदेश न करता स्वत:च्या आचरणाचे आदर्श समाजापुढे ठेऊन समाजाला सन्मार्ग दाखवितात. ‘आधी केले मग सांगितले’ याच उक्तीप्रमाणे ते वर्तन करतात. त्यामुळे संतांची शिकवण सर्व जग शिरोधार्य मानते. महाराष्ट्रात संत परंपरेची मौतिकमालाच तयार झाली आहे. वारकरी संप्रदायात या संतमालिकेचा गजर केला जातो. भजन, कीर्तन, प्रवचना पूर्वी निवृत्ती, ज्ञांनदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम असे प्रथम संतांचे स्मरण केले जाते. महाराष्ट्राबाहेर सुद्धा कबीर, मीरा, तुलसीदास, सूरदास यांसारखे शिरोमणी जनसामांन्यांना पथ दर्शन करून गेले. भूलोकी चे देव ठरलेल्या या संतमंडळीन्नी बहु जन समाजाला ईश्वरप्राप्तीचा सोपा भक्तिमार्ग तर दाखवलाच पण भवसागरात राहूनही परमार्थाचे पैलतीर कसे गाठावे याचीही शिकवण दिली.
वारकरी सांप्रदायाचे प्रवर्तक संत ज्ञांनेश्वरांनी विश्वाला कुटुंबवादाची प्रेरणा दिली पसायदानातून त्यांनी संपूर्ण मानव जातीचे हितच वांच्छिले आहे. एकनाथांनी हिशेबातील एका पैशाची चूक हुडकून काढण्यासाठी रात्रभर जागरण केले. हिशेब जमताच त्यांना अत्यानंद झाला या साध्या गोष्टीतून त्यांनी जनसामान्यांनाहि व्यवहारात चोख राहण्याचा जणू आदर्श घालून दिला. नेटका प्रपंच करूनही परमार्थ कसा साधावा याची शिकवण एकनाथ आणि रामदास यांनी समाजाला दिली. ईश्वर साधना करण्यासाठी विजनवासात जाण्याची गरज नाही. स्वकर्म राहूनही नामात रंगता येते, मोक्षसाधना करता येते हे त्यांनी लोकांना पटवून दिले,
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ॥ तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा ॥ यासारख्या अभंगातून सर्वच संतांनी भूतदयेचा मंत्र दिला.
(Je ka Ranjale Ganjale tyasi Mhane jo apule || Tochi sadhu Olkhawa, dev tethichi Janawa)
पापाची वासना विठ्ठला नको दावू डोळा हा अभंग रचताना तुकारामांनी जनसामान्यांकडून सदाच्र्नाचीच अपेक्षा केली आहे. “जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी,” आवश्यक तेवढे धन जरूर मिळवावे; पण ते सन्मार्गानेच मिळवावे. भ्रष्टाचार करू नये हीच आजच्या परिस्थितीत आवश्यक अशी शिकवण ह्या अभंगातून मिळते.
आज आम्ही ”झाडे लावा देश वाचवा” अशी घोष वाक्ये देत झाडांचे मानवी जीवनातील महत्व जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न करतो. पण हि जाणीव संत तुकारामांनी ‘ वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे अशा चरणातून कितीतरी शतकांपूर्वीच करून दिली आहे. आम्हाला आज ऑलिंपिक व एशियाड खेळाचे महत्व वाटते पण रामदासस्वामींनी तर बलोपासना, व्यायाम यांचे महत्व पटवून देण्यासाठी ३०० वर्ष्यापूर्वी ठिकठीकाणी आखाडे उभारले मारुतीची स्थापना केली व्यायाम शाळा उभारल्या. लोकान्ना अन्यायाचा प्रतिकार करण्यास शिकवले. संत रामदास म्हणतात ‘ठकासी व्हावे ठक, उधटासी उधट ‘ संत तुकाराम म्हणतात ‘मउ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदु ऐसे’ भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी, ‘स्वामी विवेकानंद, तुकडोजी माहाराज गाडगे महाराज या राष्ट्र संतांनी समाजातील दोष घालवून राष्ट्रीय चारित्र्य निर्माण केले. स्वत:च्या आचारातून,विचारांतून उच्चारातून जनतेला प्रखर राष्ट्रनिष्ठेचे धडे घालवून दिले.
जनसेवा हीच ईशसेवा मानणार्या बाबा आमटे,मदर तेरेसा, ताराबाई मोडक या आधुनिक संतांनी मानवतेची महान शिकवण समाजाला दिली. संतांची शिकवण ही ‘बहु जन सुखाय बहु जन हिताय अशीच असते. ती सार्वकालिक व सार्वजनिक आहे. त्यातील तत्वे अनादि अनंत आहेत. कालप्रवाहात समाज बदलतो., माणसे बदलतात, पण सत्य, सदाचार, सेवा, नीती, चारित्र्य, मानवता, कर्मयोग, व्यवहार, प्रेम, बंधुभाव, दिनदुबळ्याची सेवा हि संतांची तत्वे त्रिकालाबाधित व अविनाशी आहेत. म्हणूनच संतांना द्रष्टे म्हटलेलं आहे.
असे संत म्हणजे खरोखच समाजाचे सच्चे मार्गदर्शक आहेत. त्यांचा सहवास हा ईश्वर प्राप्तीपेक्षा अधिक मोलाचा आहे. म्हणूनच संत तुकाराम ईश्वरा जवळ मागणे मागताना म्हणतात ‘ नलगे मुक्ती धन संपदा संतसंग देई सदा ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत, अभंगगाथा अशांसारख्या अमुल्य ग्रंथातून हे विचारधनसंग्रहित करण्यात आले आहे. हे ग्रंथ भांडार पुढील पिढ्यांनाही दीपस्तंभांप्रमाणे पथदर्शक ठरणारे आहे.
11 Comments. Leave new
Tnx for giving such a wonderful information..We are proud to take birth on such a beautiful place..Also tnx to our great Maharashtra Santkavi..😇
☺😊☺👍 ☺nicely
Thanks for sharing your feedback.
Dhanyawad
khup mast
HOW TO PRINT
अप्रतिम, खुपच छान
धन्यवाद.
एकदम परफेक्ट माहिती आपणास संतांनी दिलेल्या शिकवनिबद्दल आपणास मिळते.मी ही निबंध स्वरूपी माहिती वाचून अत्यंत आनंदी आहे….आणि एक मला माझ्या मराठीचा खुप अभिमान आहे म्हणून मराठी मधेच रीप्ले केला……👌👌👌👌
It is very useful herttouching aanguage for all sant i very praud of india
it is information is good. I like information
Ya its very dharmic. The above information is true. I felt very good time reading this information.
This information is very interest king. I was happy to read it . It is also correct and wonderful.