क्रिकेटचा देव समजल्या जाणा-या सचिनचा आज (२४ एप्रिल) ४० वा वाढदिवस. तुमच्या शुभेच्छा आणि प्रार्थनांमुळे २३ वर्षांनंतरही मी सर्वांसमोर मैदानात त्याच दमात उभा राहू शकलो. हीच माझी खरी ताकद आहे. तुम्हा सर्वांचे आभार मानण्याची हीच योग्य वेळ आहे, अशी नम्र भावना व्यक्त करीत सचिन तेंडुलकर नावाच्या ‘विक्रमांच्या एव्हरेस्ट’ने ४0व्या वाढदिवशी चाहत्यांच्या निरपेक्ष प्रेमाला ‘सलाम’ केला. काळ्या रंगाचा शर्ट घालून आलेल्या सचिनने पत्नी अंजलीसह पाच किलो वजनी चॉकलेट केक कापला अन् अंजलीने त्या केकचा तुकडा सचिनला भरवला. कोट्यवधी चाहत्यांच्या शुभेच्छाशिवाय इतकी वर्ष क्रिकेटमध्ये सातत्य राखणे मला जमलेच नसते. मी भारतातील आणि जगभरातील चाहत्यांचे आभार मानू इच्छितो. त्यांनी मला पाठिंबा दिला आणि गेली २३ वर्षे माझ्यावर निरपेक्षपणे प्रेम केले. हे माझ्यासाठी खास असल्याचे सांगून सचिन भावुक झाला.