भविष्याचे वेड !
Like
Like Love Haha Wow Sad Angry

People thinking about future

future thinkingमहत्वाचे मुद्दे माणसाला अज्ञाताचे आकर्षण नियत कालिका मध्ये भविष्य देण्याची प्रथा. लग्ने, प्रवास, शुभवार्ता इ. साठी भविष्यावर अवलंबून. भविष्यावरील अतोनात श्रद्धा. भविष्यकाळ सुधारण्यासाठी ज्योतीष्यांकडून सुचविलेले उपाय. आपले भविष्य कर्तुत्वावर अवलंबून आहे.
माणसाला निसर्गत:अज्ञाताचे आकर्षण आहे. त्यातूनच भविष्यकालात आपल्या घडनार्या बऱ्यावाईट घटना अगोदरच जाणून घेण्याची त्याला मनस्वी ओढ असते. माणसाच्या या नैसर्गिक प्रवृत्तीतुंनच भविष्यकथनाचे शास्त्र जन्माला आले असावे. म्हणूनच या जगात विज्ञानयुगातही अनेक होरारत्न, होराभूषण हे पत्रिकेवरून, हातावरून, चेहर्यावरून भविष्य सांगताना आढळतात. बरेच कुडबुडे, ताकपीठे ज्योतिषी रस्त्याच्या कडेला पोपटांचे पिंजरे घेऊन बसलेलं दिसतात. अनेक लोकही त्यांच्या कडे भविष्य विचारायला जातात.
माणसाची भविष्याची हि ओढ ध्यानात घेऊन वर्तमान पत्रे, साप्ताहिके मासिके यात रोजची एका ओळीची, तसेच साप्ताहिक मासिक, किंवा वार्षिक कालावधीची भविष्ये दिली जातात. बरेचजण ती अगदी उत्साहाने आणि उत्सुकतेने ती वाचतात. तर काही जण त्याचा ध्यासच घेतात. अशी माणसे सकाळी उठल्या उठल्या भविष्य वाचतात. पण हि सर्व भविष्ये खरी असतात का? कित्येकदा तर दोन वृत्तपत्रानमध्ये अगदी परस्पर विरुद्ध भविष्य वर्तवलेले आढळते. एकात प्रियजनांच्या गाठीभेटी होण्याची भविष्यवाणी असते; तर दुसर्यात प्रियजणांचा विरह किंवा प्रियजना विरह किंवा प्रियजन अंतरतील असे सांगितलेले असते.
त्यामुळे दिवसभर मनावर थोडे दडपण असते. पण दिवस संपतो. पण यापैकी काहीच घडत नाही. काही नियतकालिकांकडून शुभ वार्ता कळतील, नातेवाईकांच्या भेटी होतील, प्रवास घडण्याची शक्यता, तब्येतीला जपा यांसारखी गुळमुळीत भविष्ये सांगितलेली असतात.
* अनेक कार्ये पंचांग पाहून सुमुहूर्तावर पार पाडली जातात. बहुतेक लोक पत्रिका जमते कि नाही. हे पाहून त्या नुसार लग्न जमवितात. ईतके करूनही छत्तीस गुण जमलेल्या काही जोडप्यांचा परस्परांशी छत्तीसचा आकडा असतो. असा अनुभव आहे.
* असे असले तरी बहुतेकांचा भविष्यावर विश्वास असतो. ज्योतिष्याच्या शब्दावर अनेकांच्या आयुष्यातील सुख-दु:ख अवलंबून असते. काहींचे भविष्याचे वेड हे सामान्य वेडा पलीकडचे असते. उद्या बँकेत जाऊ की नको ? नातेवाईकांच्या भेटीला बुधवारी जावे कि गुरवारी? याचे निर्णय घेण्या साठी सुद्धा ते शुभ वेळेच्या शोधात असतात. काहीजण भविष्यावर ईतकी श्रद्धा ठेवतात. की, ‘ वाईट घटना घडतील’ असे भविष्य असले आणि साधी सर्दी जरी झाली तरी ‘ भविष्यात होतेच वाईट घटना घडतील म्हणून ‘ असे ते सर्दी झाल्याचे समर्थन करतात. तसेच घरी भांडण न होता दिवस गेला की , ‘ आज भविष्यात होतेच मुळी आनंदात दिवस जाईल म्हणून. ‘ असे मनाचे सामाधान करून घेतात. ईतकेच काय काहीजण वजनाच्या काट्याच्या तिकिटावरील वजन पाहण्या आधी तिकीटामागचे भविष्य वाचतात.
*भविष्यकाळ सुधारण्यासाठी ज्योतीष्याकडून उपाय सुचविले जातात.कोणी विशिष्ट खडा,मोती, वापरायला सांगतात, तर कोणी अळणी मंगळवार,पांढरे बुधवार करायला सांगतात. किंवा गुरवार, शुक्रवार आणि करायला सांगतात. ईडापिडा टळण्यासाठी एकवीस चतुर्थ्या, सोळा सोमवार, अकरा एकाद्श्या, सोळा पौर्णिमा असे उपवास करण्यास सुचविले जातात. मग त्यासाठी एखाद्या देवाची किंवा ग्रहाची पूजा पाठ केला, त्यासाठी बरेच दानधर्म सांगितले जाते. असे लुटारू पंडीत उपाय सुचवितात. आणि आपण श्रद्धे खातर विश्वास ठेवतो. मग लागणार्या खर्चा कडे सुद्धा बघत नाही.
*उलट-सुलट वर्तवलेल्या आणि खोट्या ठरलेल्या. भविष्याचा माणसांना अनुभव येत असतो.पण तरीही बहुसंख्य माणसे भविष्यावर अवलंबून असतात.ज्योतिष्य हे एक शास्त्र आहे, असे मानणारे आणि त्याचा गाढा अभ्यास करणारे.अनेक ज्योतिषी समाजात आहेत. ‘द सेंच्युरीज’ या आपल्या भविष्यविषयक ग्रंथात नॉस्टरॉडेमस याने पाच हजार भविष्ये सांगितली आहेत. जुलै १९९९ मध्ये महायुद्ध होवून साऱ्या जगावर भारताचे वर्चस्व प्रस्थापित होईल असे भविष्य त्याने केले आहे. पण आजच्या जागतिक परिस्थितीचा विचार करता हि गोष्ट आज तरी अशक्यप्राय वाटते.
* असे असले तरी माणसाने भविष्यावर किती अवलंबून राहायचे याला काही तरी सीमा हवीच. नाहीतर भविष्याच्या वेडाने माणूस नादान ठरायचा. खरे तर– ” नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठीमे क्या है ?
मुठ्ठी में है तकदीर हमारी ।
हमने किस्मत को बसमें किया है ”।
असे म्हणून प्रयत्नांच्या जोरावर प्रगतीपथावर वाटचाल करत राहिले पाहिजे. त्यातूनच आपले भविष्या आपण घडवू शकू.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d