वर्षभर मुंबईकरांना जेवणाचे डबे वेळेत पोहोचवणारे मुंबईचे डबेवाले उद्यापासून तब्बल सहा दिवसांच्या रजेवर आहेत. त्यामुळे मुंबईकरांना पुढील पाच दिवस सक्तीचा उपवास धरावा लागणार आहे. डबेवाल्यांनी २२ ते २७ एप्रिल अशी सहा दिवसांची हक्काची सुटी काढली आहे. एप्रिल-मे दरम्यान शाळा आणि उन्हाळी सुटीच्या काळात बरेच चाकरमानी आपापल्या गावी जात असतात. अशा वेळी ग्राहकांची संख्या कमी असल्याने ५0 टक्क्यांहून कमी डबे असते. एप्रिल-मे दरम्यान ५0 टककयांपेक्षा ग्राहक कमी असल्याने डबेवाले रजेवर आहेत. घरची कार्ये आणि ग्रामदेवतेची यात्रा असा स्वार्थ आणि परमार्थ साधतानाच मुंबईत परतल्यानंतर पुन्हा वर्षभर जोमाने हे काम सुरूच होईल.