ठाण्यात सात मजली बिल्डिंग कोसळून २९ बळीं. ठाण्यात शिळफाट्याजवळ सात मजली बिल्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या २९ वर पोहचलीय तर जखमींचा आकडा ६५ वर गेलाय. अनधिकृत बांधकाम मुळे हि घटना घडल्याचे समजते, या वरून मुंबई बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उमटू लागलेले आहे. अश्या बांधकामाला परवाना मिळतोच कसा ? . या पूर्वी सुधा मुंबईमध्ये असे बरेच अनधिकृत बांधकाम करण्यात आलेले होते. घटनास्थळी गुरुवारी रात्रभर मदत आणि बचावकार्य सुरु होतं. मुंबई महापालिकेची टीम इथं मदतीसाठी दाखल झालीय. आज संध्याकाळपर्यंत ढिगारा उपसण्याचं काम सुरू राहील. महत्त्वाचं म्हणजे, महिन्यांपूर्वी ही अनधिकृत इमारत बांधून पूर्ण झाली होती. वर्षभरात या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं होतं. वर्षाच्या आतच हे काम पूर्ण झालंच कसं, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
Source : Zee News.
2 Comments. Leave new
Wow, wonderful blog layout! How long have you been blogging for? you made blogging look easy. The overall look of your site is great, let alone the content!
far durdaivi ghatana ahe…