Motherhood, MOTHERHOOD to me is all about shared experiences, having fun, lots of commitment and lots of joy.
जगतां मध्ये एक माताच अशी आहे कि जिचा स्नेह अपत्यावर जन्मा पासून शैशव, यावन, आणि प्रौढावस्थे पर्यंत कायम राहतो. हे मातृप्रेम मनुष्येत्तर जातीमध्येच पहावयास मिळते. माता बालकाला कसे घडविते ते आपल्या इतीहासात सुविदित आहे.माता कुंतीने पांडवांना धर्मावर दृढ राहून क्षात्रधर्म आणि प्रजा पालन करण्याचा उपदेश दिला. कि त्यानुसार राहून ते नेहमीच कृतकार्य करीत राहिले. माता कौसल्येलका मर्यादा पुरषोत्तम भगवान श्रीरामाची जननी म्हणण्याचे भाग्य लाभले. जेव्हा भगवान वनवासाला निघाले तेव्हा भावी वियोगजनितदुखाने व्याकुळ होऊन, मागचा-पुढचा विचार करून, धर्माचा विचार करून पुत्राला आशीर्वाद देताना तिने असा आशीर्वाद दिला कि ‘हे पुत्रा! मी तुला कोणत्याही प्रकारे थांबउ शकत नाही. आता तर तू वनवासाला जा, पण लवकर परत ये आणि सतपुरुश्याच्या मार्गावर चालत रहा, प्रेम आणि नियमा बरोबर तू चालत आला आहेस, तो धर्मच तुझे रक्षण करील.’
शिवाजींची माता जिजाबाई, शिवाजीला वीर बनविण्याची गीते पाळण्यातच ऐकवीत असे. म्हणूनच ते तेवढ्याच उच्चते पर्यंत पोचले. मुलांच्या बाबतीत जीतक्या उच्च स्थितीत त्यांची माता असते. तेच गुण मुळात उतरतात म्हणून म्हणतात कि खाण तशी माती. गर्भात बालक येताच मातेने आपल्या कर्त्याचे पालन केले पाहिजे, तिने हि गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि तिला एका उत्कृष्ट अपत्याला जन्म द्यायचा आहे. आपल्या बालका साठी तिला एक आदर्श मातेचे कर्तव्य करावयाचे आहे. तिने आपल्या तन-मनाच्या स्वास्थ्याकडे काळजी पूर्वक लक्ष केले पाहिजे. शरीर निरोगी व मन सद्विचारी असावे. मातेच्या रक्तापासून बालकाचे पोषण होते. मातेचा आहार-विहार शुद्ध आणि सात्विक असणे आवश्यक आहे. जन्माच्या वेळेपासून बालकाचा शारीरिक आणि मानसिक विकास अश्यापद्धतीने झाला पाहिजे कि तो एक आदर्श बालक बनू शकेल. बालकाला लहानपणा पासूनच बाजारातील खाद्य- पदार्थ आणि मिठाई देता कामा नये. त्याची रुची आणि आवश्यकता जाणून घेऊन त्याच्या साठी योग्य आहाराची व्यवस्था करावी. मातेने मुलाला कुसंगापासून दूर राहण्यास प्रोत्साहन देऊन कपट, चोरी, शिवीगाळ इ. पासून रोखण्याचा प्रयत्न करावा, त निर्भय सत्यवादी, आणि बलिष्ठ होईल असे प्रयत्न करावे. त्याच प्रकारे गोष्टी सांगून त्याला प्रोत्साह्न द्यावे. गुरुजन व वडील धार्यांपुढे तो नम्र व विनयशील वाणी आज्ञाधारक राहील असे भाव मुलात जागृत करावे. बालकाला आवडी नुसार व योग्यते नुसार शिक्षण द्यावे. त्याच बरोबर थोर चारित्र्याचे शिक्षण देणे सुद्धा आवश्यक आहे. शिक्षणाचा उद्देश आत्मकल्याण आहे. म्हणून धार्मिक आणि अध्यात्मिक शिक्षण तर त्याला दिलेच पाहिजे. मुलींना विशेषत्वाने असे शिक्षण दिले पाही ज्यामुळे त्या सीता सावित्रीच्या आदर्शाचा स्वीकार करू शकतील. व पुढे आदर्श गृहिणी, आदर्श माता बनू शकतील.
मुलांच्या जीवनरुपी बागेला सद्गुणांच्या फुलांनी सुवासित केल्याने स्वत:मातेचे जीवन देखील सुवासिक आणि आनंदमय बनेल.! मुलां मध्ये जर दुर्गुणांचे काटे वाढले तर ते मातेला देखील टोचतील, जीवन खिन्नतेने भरून टाकतील. म्हणून मातेचे हे परम कर्तव्य आहे कि तिने मुलांच्या जीवनाचे शारीरिक, मानसिक , नैतिक, अध्यात्मिक संरक्षण आणि पोषण करून आदर्श माता बनावे. आपल्या जीवनाच्या सुगंधाने कुटुंब, समाज आणि संपूर्ण पृथ्वीला सुवासिक करावे.
Mothers Day Paintings: