वैधव्याला दिव्य बनवा




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Make the Divine of of Widow Life and Death its a part of life and some becomes widow its not here fault. try to make happy all widows and treat them like mother. this world sees them like a evil.

the widow storyजीवन दु:खमय असते. दु:खाची कारणे आहे आपली स्वत:चीच कर्मे( Workship ), जर आपल्याला सुख हवे असेल तर संयमपूर्ण होवून अशी सत्कर्मे (Satkarm) करावीत की परिणामी सुख होईल. स्त्री विधवा का. होते? याचे कारण कि स्त्रीच्या पुर्व जन्मातील दुराचार. जर विधवा स्त्री येथे देखील पुन्हा भ्रष्ट होवून विषय-सेवनात मग्न झाली. तर तिचे भावी जीवन आणखीनच अंध:कारमय आणि दुखी होईल. विधवांचा धर्म फार कठीण आहे. परंतु तो फारच परम-पवित्र आहे. ज्याप्रमाणे आश्रम धर्मामध्ये संन्यास सर्वात पूज्य आहे. त्याच प्रमाणे स्त्री-धर्मात विधवा धर्म सर्वपूज्य आहे. हिंदू जातीच्या त्या आदर्णीय विधवा ज्या भोगविलासाच्या सर्व सामुग्रीचा तृणवत त्याग करून, परमात्म्याच्या चरणी चित्त एकाग्र करून, आपले दु:खमय जीवन पवित्र मनाने सुखमय बनवून जगतात, आपल्या अद्भुत त्यागाने ज्या विधवा हिंदू जातीचे मस्तक उंचावतात त्या विधवा पूज्य असतात.

आजकाल कोठे कोठे विधवा-धर्मपालनात जो विपरीत भाव दिसून येतो त्याचे कारण म्हणजे अध्यात्मिक शिक्षणाचा अभाव, मूर्खपणामुळे विधवांशी असतव्यवहार आणि अधिकांश बाबतीत पुरुष जातीच्या नीच वृत्ती आहेत. जर विधवांना धार्मिक शिक्षण  मिळाले, त्यांच्याशी उत्तम व्यवहार केला. आणि पुरुष जातीने आपल्या नीच वृत्तींचे दमन केले तर विधवा धर्म पुन्हा हिंदूजातीच्या गौरवाचे कारण बनू शकेल!

विधवांनी समजून घेतले पाहिजे की परम करुणामय परमात्म्याने आपल्याला विषय-विकारां पासून दूर सारून भगवत भजन करण्याची, आत्मज्ञान प्राप्त करण्याची एक उत्तम संधी दिली आहे. विधवा- जीवन घृणित व दु:खमय नसून पवित्र (Pavitra) असे दैवी-जीवन आहे. भोगासक्त जीवनाचा अंत होउन दु:खाची आत्यंतिक निवृत्ती होते. आणि परमानंदाची प्राप्ती करविणार्या आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ होतो. भोगासक्त स्त्रियांना, विषयविकारात बुडलेल्या स्त्रियांना, कुणास ठाऊक किती जन्मा नंतर साधनेची सुसंधी मिळू शकेल. आपल्याला आता याच जन्मातच संधी मिळाली, असे समजून विधवा स्त्रीने परमात्म्याला हृद्यपूर्वक धन्यवाद देऊन ईश्वराचे भजन केले पाहिजे. असे पवित्र भाव ठेऊन जीवनाला ऊर्ध्वगामी बनविण्याची ईच्छा असलेल्या स्त्रीला  जर एखाद्या ब्रम्हनिष्ठ महापुरुष्याने दर्शन, सत्संग मिळाला तर ती आपली अध्यात्मिक यात्रा इतक्या तीव्र गतीने पार करू शकते की शेकडो सौभाग्यवती महिला तिच्या पायापडून आपले भाग्य बनविण्यास उत्सुक राहतील.

सुख किंवा दु:ख वास्तविक एखाद्या घटनेत किंवा परिस्थितीत नसते परंतु त्या घटनेला किंवा परिस्थितीला अनुकूल किंवा प्रतिकूल मानण्याच्या भावनेत असते. एखादा संन्यासी घर-दार सोडून, विषयापासून विरक्त होऊन सुखाची अनुभूती करतो. परंतु दुसर्या एखाद्या व्यक्तीला जबरद्स्तीने घरा बाहेर काढले तर विषय सुखाच्या अभावी तो दुखानुभव करतो.  दोघांची विषयसुख रहित स्थिती एक सारखी आहे परंतु एकाला सुख होते. आणि दुसर्याला दु:ख ! अनुकुलता आणि प्रतीकुलतेची भावनाच सुख-दु:ख (Sukha : Dukha) निर्माण करते. म्हणून विधवेने विवेक विचार करून आपली भावनाच सुमार्गगामी बनविली पाहिजे. विषय-विरहीत जीवन परमगौरवाची वस्तू आहे. असे समजून भगवत-प्राप्तीच्या साधनेत मग्न झाले पाहिजे. परमात्म्याशी तार जुळली तर तिला स्वत:ला सुखाचा अनुभव मिळेल. आणि समाजातही आदरणीय दर्जा मिळेल.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा