Maayboli Marathi , Maayboli: A Great resource for Marathi language, Marathi People and Maharashtra culture.
महत्वाचे मुद्दे : प्राचीन कवींनी मराठी भाषे विषयीची प्रेम भावना व्यक्त केली आहे. इंग्रजीचे आक्रमण महाराष्ट्राची स्वतंत्र राज्य म्हणून निर्मिती होऊनही मराठी मागासलेली राहिली मायबोलीला मानाचे स्थान मिळवून द्यायचे असेल तर अनेक उपाय योजना राबवायला पाहिजे.
‘ मराठी असे अमुची मायबोली जरी आज ती राज्य भाष्या नसे ‘ कवी यशवंतांनी या ओळी मध्ये मराठी भाषेविषयीची आत्मीयता प्रकट केलेली आहे. मराठीला राज्य भाषेचा दर्जा नव्हता त्या काळात सुद्धा कविवर्यांनी मराठी विषयीची प्रेमभावना व्यक्त केली. पण आज तिला महाराष्ट्रात राज्य भाषेचा दर्जाही प्राप्त झालेला आहे, पण आम्ही तिचीच लेकरे तिच्यापासून दुरावत चाललो आहे.
* मराठीत पहिली काव्य रचना ज्ञानेश्वरांनी केलेली आहे. ज्ञानेश्वरीच्या निर्मितीने मराठी भाषेची माधुरी प्रकांड पंडिताना तसेच जनसामांन्यांनाहि चाखायला मिळाली, या अमृततुल्य भाषेचा ओघ संत आणि पंत मंडळींनी आपली वाड्मय रुपी गंगा त्यात सोडून विस्तीर्ण केली. अभंगगाथा, भागवत, केकावली, यांसारखी वाड्मयातील तीर्थक्षेत्रे निर्माण केली. आमच्या मराठी या आमच्या मायबोलीला एक विशिष्ट दर्जा या सुपुत्रांनी दिला. मोगलांच्या आक्रमण काळातही आपल्या मायबोलीचे तेज नष्ट होवू दिले नाही. श्री शिवाजी राजांनी आपल्या स्वराज्याचा कारभार मराठी भाषेतूनच चालविला.
* इंग्रजांच्या राजकीय आक्रमणाबरोबरच इंग्रजी भाष्या आणि संस्कृतीचेही आक्रमण भारतावर झाले. सारा देश इंग्रजाळला. तरीही हि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी भाषेत अप्रतिम वाड्मयनिर्मिती करून मायबोलीचे संरक्षण केले. त्यांना मराठी भाषेची कधीच लाज वाटली नाही. कारण तीत्यांची मायबोली होती.इंग्लंडमध्ये अध्ययनासाठी गेलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महात्म्याने मातृभाषेविषयीचा अभिमान कधीही सोडला नाही. मराठी भाषेच्या शुद्धीकरणाची चळवळ त्यांनीच सुरु केली. परभाषीय शब्दांना मराठी प्रतीशब्द दिले.व मराठीचे अस्सल मराठीपण राखले.
* स्वातंत्रोत्तर काळात भाषावर प्रांतरचना झाली. महाराष्ट्राची निर्मिती झाली. आणि मराठी भाषेला वैभवाचे दिवस येतील अशी आशा निर्माण झाली. पण ते एक दिवा स्वप्नच ठरले. महाराष्ट्राच्या राज्यकारभाराची भाषा म्हणून म्रात्झीला मान्यता मिळाली; पण मातृभाषा म्हणून तिचा सापत्न भावानेच तिचा स्वीकार होवू लागला. मराठी माध्यमाच्या शाळेपेक्षा इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे मराठी माणसाचा ओढा लागला. मराठी बाषेत उत्तमोत्तम साहित्याची निर्मिती होत आहे. मराठी लेखक ज्ञानपीठ पारि-तोषिकांचे मानकरी होत आहेत. पण तरीही हे एका वेगळ्या पातळीवर चालले आहे. मातृभाषा हि ज्ञानभाषा वा विचारांचे माध्यम म्हणून स्वीकारताना आम्हाला कमीपनाच वाटतो. वास्तविक मराठी भाषेची किती विविध गोंडस रूप आहेत. अहिराणी, वर्हाडी, डांगी, मराठा, झाडी, कोकणी या बोली ऐकताना एक वेगळाच आनंद मिळतो. पण तरीही मी मराठी असून माझे माध्यम इंग्रजी आहे हे सांगताना आमची छाती अभिमानाने फुलून येते. हे कितपत योग्य आहे? एखादा मराठीचा प्रेमी, मातृभाषेचा भक्त माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट ‘ असे गातो, किंवा नरेंद्रा सारखा एखादा कवी मराठीचा महिमा सांगताना — सहा भाष्यांचे रस एकत्र मराठी तयार झाल्याने तिची गोडी काही औरच आहे.’ असे म्हणतो पण आजची वस्तू स्थिती निराळीच आहे.
*रेडीओ, टी.व्ही.वर मराठी बातम्या देण्यासाठी किंवा निवेदनासाठी महाराष्ट्रात शुद्ध व स्पष्ट बोलणारे युवक-युवती फारसे उपलब्ध नाहीत. मुलाखत घेणारे अस्खलित मराठी बोलू शकत नाही. बहुतेक युवक-युवती इंग्रजी माध्यमातून शिकलेले असल्यामुळे मराठी शब्दाचे उच्चार तोंडातल्या तोंडात, अत्यंत चुकीच्या तर्हेने करत असतात. मराठी भाषेवर सुद्धा इंग्रजी उच्चार पद्धतिची छाप दिसते. मराठीचे भ्रष्ट स्वरूपच कानांवर पडत आहे.
*मराठी माध्यमातून उच्च-शिक्षणाची सोय नसल्याने मराठी माणूस हा उच्च-स्तरीय क्षेत्रात मागासलेला आहे; कारण इंग्रजीवर प्रभुत्व नाही आणि मराठीतून व्यावसायिक परीक्षा देण्याची सोय नाही. यामुळे मराठीची आणि मराठी माणसाची आबाळ होते. राष्ट्रीय स्तरावर मराठीभाषिक पोचू शकत नाही. त्यामुळे बुद्धिमान मुलांची बुद्धिमत्ता वाया जाते. आपल्या मायबोलीला मराठीला जनमानसात मानाचे स्थान मिळवून द्यायचे असेल तर महाराष्ट्रात राहणार्या प्रत्येक माणसाला मराठी भाषा कामापुरती तरी आलीच पाहिजे. असा दंडक घातला पाहिजे. नोकरीत घेण्यांपूर्वी मराठी लेखन-वाचनाची परीक्षा अवश्य असावी व त्यातील क्षमता हा नोकरीचा निकष मानला जावा. महाराष्ट्राचा सर्व कारभार मराठीतून चालावा. महाराष्ट्रदिना प्रमाणेच ‘मराठी भाषादिन’ पाळला जावा. या सर्व प्रशासकीय पातळीवर बाबी झाल्या मायबोलीची थोरवी वाढवायची असेल तर प्रत्येक महाराष्ट्रातील माणसाने तिचा आदर केला पाहिजे. तिच्या विषयी मनात जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे. माझे मुल मराठी माध्यमातून शिकेल असा निश्चय केला पाहिजे. मराठी वाड्मयातील उत्तमोत्तम पुस्तके त्याला वाचनासाठी उपलब्ध करून दिली पाहिजेत. तरच मुलांना लहानपणा पासून मराठीची गोडी लागेल. आणि मगच आम्ही आद्य मराठी कवी ज्ञानेश्वरांनी केलेली.
* “माझा मऱ्हांटाचि बोलु कौतुके । परी अमृतातेही पैजा जिंके । ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन ‘।।हि प्रतिज्ञां तडीस नेऊ शकू !
Maayboli Marathi , Maayboli: A Great resource for Marathi language, Marathi People and Maharashtra culture.