जे जे असेल प्राल्ब्धी




Like
Like Love Haha Wow Sad Angry

marathi abhang

जे जे असेल प्राल्ब्धी । तें न चुके कर्म कधी ।
होणारा सारखी बुद्धी । कर्म रेषा प्रगटे ।।
न कळे पुढील होणार । भुत-भविष्य हा विचार ।
कर्म-धर्म तदनुसार । भोगणे लागे सर्वथा ।।
ऐसा लिहून गेला विधाता । मग कासया करावी चिंता ।
आपुलिया संचिता । कर्म रेषा प्रमाण।।
जैसें असेल आचरण । घडले असेल पाप-पुण्य ।
तैसे सानुकूल होतील कर्म । मान-अपमान जन करीता।।
काल अनुकूल अथवा प्रतिकूल । परी सोडू नये आपुले धैर्यबळ ।
अनाचारी मन केवळ । नये बाटवू  सर्वथा ।।
अखंड वाणी हरि स्मरणी । सुख विश्रांती कीर्तनी ।
खेचर विसोबा म्हणे प्राणी । मनुष्य देह दुर्लभ ।।६।।

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu