Jiwabhawacha Durawa! Weaw all are in search of peace in life. with in anger we loss our most loving buddies. to maintain good relationship need to maintain life in proper way.
जीवाभावाचा दुरावा! या गोष्टी सहसा आजकाल फार घडतात. (विषय कोणताही असो हा जीवा भावाचा दुरावा कधी कधी जीवघेणाच अनुभवास येतो) त्या वेळेला आपण चिंताक्रांत होऊ नये. स्वत;ला सावरणे कठीण होऊ देऊ नये. काही गोष्टीचे कसोशीने पालन केल्यास तुम्ही या तणावातून बाहेर होऊ शकता, सर्व प्रथम तुमच्या कडे प्रियकराचे छाया चित्र किंवा पत्रे वै. त्वरित नजरे आड करून टाका. तुमच्या मनात येणार्या भावना किंवा विचार लपउ नका. आणि रडत बसू नका. तुम्ही रडत बसलात तर ते विचार दूर न होता.जास्त त्रास दायक होतील व तणाव कायम राहील.यामुळे तुम्ही शारीरिक किंवा मानसिकरीत्या कमकुवत व्हाल. तुमच्या आयुष्यातून (आठवणीतून) प्रियकर पूर्ण पणे निधून जावा यासाठी त्याच्याशी संबंधित सर्व वस्तू दूर करा, ध्यान धारणा केल्यांने आत्मशांन्ती,समाधान आणि शक्ती लाभेल. सामाजिक कार्याकडे अथवा आपल्याला जे आवडीचे कार्य असतील त्यात मन गुंतवण्याचा प्रयत्न करा, ज्यांच्या जीवनात तुमच्यापेक्षा जास्त अपेक्षाभंग असतील त्याना भेटावे. आपल्या आयुष्यात असंख्य दु;खे आणि आव्हाने असूनही ते जीवन चांगल्या रीतीने जगत आहेत, हे लक्षात येईल.शक्य असल्यास आपल्या आवडीच्या लोकां मध्ये चार दिवस घालवा. ते तुमच्या हितकारक असतील तर.नाहीतर एखादे अध्यात्मिक ( faundation ) संस्था मध्ये सामील व्हा, आजकाल अश्या खुप संस्था उपलब्ध आहेत, त्याचा आधार घ्या, मनाला शांती अवश्य लाभेल. दुख दूर होईल. मन मजबूत होऊन तुम्ही आपल्या पुढील कार्यास लवकरच लागाल. एकदम तुटून पडण्यातुन सुटका होईल.
स्वत:ला सावरा !
धटस्फोटाला सामोर्या गेलेल्या बर्याच मैत्रिणी स्व:तला दोष देतात. पण भुतकाळ विसरणे आवश्यक असते. भूतकाळातील घटना विसरून स्व:त कडे, आरोग्याकडे किंवा मुले अससल्यास त्यांच्या कडे लक्ष देणे आवश्यक असते. सर्व कार्य विस्कळीत होण्यापूर्वी हा विचार करणे, जास्त जरुरीचे आहे. त्यामुळे आपल्याला सामान्य व्यक्ती प्रमाणे राहून समाजाला तोंड द्यावयाचे आहे, ह्यांची जाणीव असू द्या. आपल्या करिअर कडे विशेष लक्ष करा. जो छंद किंवा कला तुमच्यात असेल त्याला पुढे न्या. तुम्ही निराश न होता कुणा समाज सेविकेची मदत घ्या. आपल्या अहिताच्या व्यक्तीन सोबत व्यवहार किंवा संबंध करू नका. त्यांच्या नकारात्मक विचारांनी तुम्ही हतबल होऊन स्वत:ला कमजोर समजू लागाल. तेव्हां अश्या व्यक्तिं पासून दूर रहा. आपल्या दैनंदिन जीवनात बदल करण्याचा अतोनात प्रयत्न करा.चांगल्या व सकारात्मक गोष्टीकडे वळण्या चा प्रयत्न करा. प्रियकरा वर प्रेम करण्यापेक्षा स्वत:वर व स्वत: च्या जीवनावर प्रेम करायला शिका.