देश हा देव असे माझा




Like
Like Love Haha Wow Sad Angry
19941111

I Love My God, My Country, I love it first because it is my country,

desh prem

भारत क्रिकेट सामना हरला की अनेक वस्त्यांतून आनंदाचा जल्लोष होतो . भारताचा राष्ट्रध्वज भारतातच जाळला जातो. राष्ट्रगीताचा अपमान केला जातो. आणि सहिष्णुतेच्या नावाखाली राष्ट्राचा हा अपमान सहन केला जातो. यातूनच या वृत्ती अधिक फ़ोफ़ावतात. भारतात येणार्या तथाकथित निर्वासितांमुळेच देशावर अधिक आर्थिक बोजा लादला जातो. यातूनच तस्करी करणारे, लाच खाणारे, देशाची गुपिते शुल्लक स्वार्थासाठी प्रदेशाला विकणारे देशद्रोही निर्माण होतात. यामुळेच देश पोखरला जातो.

“देश हा देव असे माझा” या भावनेतून देशाकडे पाहिले पाहिजे. पुढारी नेत्यांनीही बेजबाबदार विधाने, भाषणे करून स्वत:च्या स्वार्थासाठी जनतेची दिशाभूल करणे टाळले पाहिजे. वृत्तपत्रे व अनेक प्रसारमाध्यमेही अनेक बातम्या भडकपणे व एकांगीपणे जनते समोर ठेवतात. सर्वसामांन्यांना नीरक्षीरविवेक नसल्याने जे कानावर पडेल ते खरे मानून तसे वागण्याची त्यांची वृत्ती असते. यातूनच अशांततेचे वातावरण निर्माण होते.

विश्वशांती ( Vishwashanti), सहिष्णुता( Sahishunta), सर्वधर्मसमभाव(Sarvdharm sambhav) अशा कल्पनांचे चुकीचे अर्थ लावून भारतीय जनता वीरता, निर्भयपणा विसरली आहे. राष्ट्रीयत्वाची बूज तिला राहिली नाही. आपल्या देशाची महानता आपण विसरलो आहे. आपल्या देशाच्या महानसंस्कृतीबद्दल, बौद्धिकवारशाबद्दल आपल्याला जराही अभिमान नाही. ज्यावेळी बाकी जग रानटी टोळ्यांच्या अवस्थेत होते अशा वेळी आपला देश उन्नतीच्या शिखरावर होता. ही अस्मिता परकियांच्या स्वाऱ्यांनी धुळीला मिळाली. विकासाच्या सर्व खुणा पुसल्या गेल्या गुलामगिरी जनतेच्या नसानसांत भरली गेली. ती ईतकी की आज भारताला स्वातंत्र मिळून ६५ वर्षे होऊन गेली तरी आमची मने गुलामगिरीतच आहेत ती अजूनही विसरली नाही. आमच्या देशात उत्तम कला,शास्त्र, विज्ञान असूनही आम्ही परक्या देशाकडे डोळे लाऊन बसतो. आमच्या देशात तयार झालेली उत्तम वस्तूही आम्हाला परदेशी वस्तूपेक्षा दुय्यम दर्जाची वाटते. आमच्या संस्कृतीचे उत्तम संस्कार आम्ही त्यागतो आणि परदेशातील ड्रग्जची व्यसनं, एड्स सारखे रोग परदेशी संस्कृती आत्मसात केल्याने कळत-नकळत तिला स्वीकारतो. तेव्हा हे सर्व संपल पाहिजे कि नाही ते आपल्यालाच ठरवायला पाहिजे !

आज आमच्या राष्ट्रपुरुष्याचे पौरुषत्व आणि अस्मिता लयाला गेली आहे. जीव धरून राहणं व स्वता:पुरते स्वार्थ साधनं एवढ एकच परम कर्तव्य झालं आहे. देशासाठी झीजायची तयारी अपवादात्मक आहे. आमचा भारत हा अठरा धान्यांच कठबोळ नसून ते एक राष्ट्र आहे अशी स्थिती देशात निर्माण करायची असेल तर राष्ट्रभक्ती, स्वार्थत्याग, उत्तमशील, शिस्त व राष्ट्रसेवा इत्यादी गुणांचे बाळकडू पाजणे आवश्यक झाले आहे.  पण हे प्रत्येकाला म्हणजे पुढारी, नेते, भ्रष्टाचारी, जनता सर्वालांच लागू आहे. तेव्हा समाज पुरुष्या उठ ! जागा हो ! ! स्वत:चे उत्थान कर !!! सर्वात समोर तूच हो !!!

Like
Like Love Haha Wow Sad Angry
19941111




, , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu