मराठी सारस्वतात मराठीतील आद्य आत्म चरित्रकार म्हणून प्रसिद्ध झालेले श्री संत नामदेव माहाराजांच्या प्रसिद्ध गाथे मधील काही अभंग;…
।। नमन लंबोधरा ।।
प्रथम नमन करू गणनाथा । उमाशंकराचीया सुता ।
चरणावरी ठेउनी माथा । साष्टांगी आता दंडवत ।।
दुसरी वंदू सारजा । जे चतुराननाची आत्मजा ।
वाकसिद्धी पाविजे सहजा । तिच्या चरणवोजा दंडवत ।।
आता वंदू देव ब्राम्हण । ज्यांचेनी पुण्य पावन ।
प्रसंन्न होऊनी श्रोते जन । त्या माझे नमन दंडवत ।।
आतां वंदू साधूसज्जन । रात्रदिवस हरीचे ध्यान ।
विठ्ठलनाम उच्चांरिती जन त्या माझे नमन दंडवत ।।
आता नमू रंग भूमिका । कीर्तनीं उभी लोका ।
ताळ मृदुंग श्रोते देखा । त्या माझे दंडवत ।।
ऐसे नमन करुनी सकळा । हरी बोले बोबड्या बोला ।
अज्ञान म्हणुनी आपल्या बाळा । सकळा नामा म्हणे ।।६।।
……………………………………………………………………………………
(Lambodhara Tuj shudand)लंबोधरा तुज शोभे शुंडादंड । करीतसे खंड दुश्चीन्हांचा ।।
चतुर्भुजे आयुधें शोभताती हाती । भक्ताला रक्षिती निरंतर ।।
भव्यरूप तुझे उंदीर वाहना । नमन चरणा करीतसे ।।
तुझे नाम घेतां दोष जळताती । कळिकाळ कांपती तुझ्या नामें ।।
चौदा विद्या तुझे कृपेने येतील । मुके बोलतील वेदघोष ।।
रुणझुण पायी वाजताती वाळे । एकोणी भुलले मन माझे ।।
भक्तवत्सला एकें पार्वतीनंदना । नमन चरनां करीतसें ।।
नामा म्हणे आता देई मज स्फूर्ती । वर्णीतसे कीर्ती कृष्णाजीची ।।८।।
……………………………………………………………………………………
।। नमन सरस्वती माते ।। (Naman Saraswati Mate)
सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती । येतों काकुलती तुजलागीं ।।
लाडके लडिवाळ मागतसे तुज । वंदिन हे रज चरणींचे ।।
त्वरें येउनिया मस्तकी ठेवी हात । जाईल हि भ्रांत तेव्हां माझी ।।
आपुल्या बाळासी धरी आतां हातीं । न करी फजिती जनामध्यें ।।
विश्वात्मा जो हरि त्याची वर्णीन कीर्ती । आवडीचा ओती रस यातें ।।
ऐकोनियां स्तव प्रसंन्न । नाम्या तुझा अभिमान मजलागीं ।।६।।
……………………………………………………………………………………
(Deva adideva Sarvatrachya Jiva)देवा आदिदेवा सर्वत्रांच्या जीवा । ऐके वासुदेवा द्यानिधी ।।
ब्रम्हा आणि ईन्द्र वंद्य सदाशिव । ऐकेवासुदेवा दिनबंधु ।।
चौदा लोकपाळ करिती तुझी सेवा ।ऐके वासुदेवा कृपासिंधु ।।
योगियांचे ध्यानी नातुडसी देवा । ऎके वासुदेवा जगद्गुरू ।।
निर्गुण निराकार नाही तुज माया । एकें कृष्णराया कानडिया ।।
करुणेचा पर्जन्य शिंपी मज तोया । एकें कृष्णराया गोजरीया ।।
नामा म्हणे जरी दाखवीशील पाया । तरी वदावया स्फूर्ती चाले ।।७।।
……………………………………………………………………………………
(Kshirsagrat asshi Bisala)क्षिरसागरात असशी बैसला । धावोनी मजला भेटी देई ।
शेषावरी जरी असशी निजला । धावोनी मजला भेटी देई ।
कैलाशी शिव पुजीतसे तुजला । धावोनी मजला भेटी देई ।
योगियांचे ध्यानी असशी बैसला । धावोनी मजला भेटी देई ।
गहिवरोनि नामा बाहात विठ्ठला । धावोनी मजला भेटी देई ।।५।।
……………………………………………………………………………………
(Adakhluni pdashi Nako Joda)अडखलूनी पडशी घालू नको जोडा । धांवत दुडदुडा येई आतां ।।
बैसावया साठी घेऊ नको घोडा । धांवत दुडदुडा येई आतां ।।
भोजना बैसलासी येथें घेई विडा ।। धांवत दुडदुडा येई आतां ।।
बाहुबळे काढीला देवांचा जो खोडा । धांवत दुडदुडा येई आतां ।।
कृपाळु बहुत लक्ष्मीचा चुडा । त्याला बाह्तसे वेडा नामदेव ।।५।।……………………………………………………………………………………
(Akashi wani hoy sange saklasi)
आकाशी वाणी होय सांगे सकलांसी । तळमळ मानसी करू नका ।।
देवकीच्या गर्भा येईल भगवान । रक्षील ब्राम्हण गाई भक्त ।।
उतरील भार मारील दैत्यांसी । आनंद सर्वांसी करील तो ।।
रोहिणी उदरी शेष बळिभद्र । यादव समग्र व्हावे तुम्ही ।।
ऐकोनियां ऐसें आनंद मानसिं । येती स्वस्थळासी नामा म्हणे ।।५।।
……………………………………………………………………………………
(Sheshapati bole lakshmicha to war)शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर । चला अवतार घेऊ आतां ।।
पृथ्वीवरी दैत्य ते मातले फार । गार्हाणे सुरवर सांगू आले ।।
शेष म्हणे मज श्रम जाले फार । या लागी अवतार मी न घेचि ।।
राम अवतारी जालो लक्षुमन । सेविलें अरण्य तुम्हा सवें ।।
चौदा वर्षांवरी केले उपोषण । जाणता आपण प्रत्यक्ष हें ।।
नामा म्हणे ऐसे वडे धरणीधर । हांसोनी श्रीधर काय बोलें ।।६।।
……………………………………………………………………………………(Purvi tu anuj jalasi kanista)
पूर्वी तू अनुज जालासि कनिष्ट । सोसियेले कस्त मजसवें ।।
आतां तू वडील होई गा सर्वज्ञां । पाळीन मी आज्ञां तुझी बारे ।।
देवकी उदरी राहावें जांवोनी । मायेसी मागोनि पाठवितो ।।
योगमाया तुज काढील तेथोन । घालील नेवोन गोकुळासी ।।
लक्ष्मीसी सांगे तेव्हां हृषीकेशी । कौंडण्यपुराशीं जावे तुम्हीं ।।
नामा म्हणे ऎसा करुनि विचार । घ्यावया अवतार सिद्ध असें ।।६।।