Dowry… Symbol Of Women’s Injustice, dowry: give and take… dowry is matchfixing · a bride to be · dowry series 4 · dahej hatya kya hai? dahej maangna · dowry… symbol of women’s injustice.
महत्वाचे मुद्दे : हुंड्यापायी अमानुषपणे नववधुंची होत असलेली हत्या हा भारतीय संस्कृतीला लागलेला डाग आहे. – हुंडा हा वरपक्षाची प्रतिष्ठा वाढविनारा मोजकाटा, – पूर्वीच्या काळची स्त्री-धन ही कल्पना, हुंडा प्रथा कशी रुजली? – हुंडा विरोधी अनेक कायदे, – अनेक सामाजिक संस्थांनी केलेले जागृतीचे उपाय,- खेड्या-पाड्यातून दुष्ट रूढीतून रुजलेला हुंडा हा गलिच्छ प्रकार युवकांनी विविध प्रकारे विचार जागृतीचे कार्य करून निपटून काढला पाहिजे.
‘हुंडा’ हि आजच्या समाजाला लागलेली कीड आहे. त्यामुळे हुंडा बळीची ज्वलंत समस्या समाजापुढे उभी आहे. रोज वृत्तपत्रात कुणी – न – कुणी हुंड्याचा बळी झालेली बातमी असते. अशा या नवविवाहितांना सासरच्या मंडळीनी जाळून मारलेले असते. कारण त्यांना त्यांच्या मनाजोगा हुंडा मिळालेला नसतो.
तशी भारतीय स्त्री अग्नी-दिव्य करायला कधीच कचरली नाही. सीतेचे निष्कलंक चारित्र्य सिद्ध करण्यासाठी, राजपूत स्त्रियांनी आपल्या शीलाच्या रक्षणासाठी, तर रमाबाई पेशव्यांसारख्या सतीनी स्वत:ची आणि पतीची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी अग्नी परीक्षा दिली. तसेच अनेक निष्पाप नववधुंची केवळ हुंड्यापायी अमानुषपणे हत्या केली जात आहे. हा तर भारतीय संस्कृतीला लागलेला कलंक आहे.आज विसाव्या शतकात देखील काही पुरुष हुंड्याच्या लालसेने धकधकत्या ज्वालांमध्ये आपल्या पत्नीला ढकलून देतात. विष देवून तिची हत्या करतात.पाण्यात बुडवितात, नाहीतर आत्महत्या करण्याजोगी परिस्थिती निर्माण करतात. आणि पुन्हा गुढग्याला बाशिंग बांधून, दुसऱ्या बळीची वाट पाह्तात. दिल्या घरी सुखी राहा हा मंत्र माहेरी नववधूला दिला जातो. पण सर्व हाल सोसून अश्रू गिळून हसतमुखाने वावरणार्या पत्नीचा साधा जगण्याचा हक्कही सासर कडून नाकारला जातो.
* हे सारे कश्यासाठी तर श्रीमंतांनी अधिक श्रीमंत होण्यासाठी मध्यवर्गीय तरुणांना आपले नाकर्तेपण झाकून वधूपक्षाकडून मिळणार्या हुंड्यातून एकदा घर खरेदी करण्यासाठी, नाहीतर उद्योगधंदा उभारण्यासाठी अथवा स्वत:चे श्रीमंती चोचले पुरविण्यासाठी हुंडा हा वर पक्षाची प्रतिष्ठा दर्शविणारा जणू मोजकाटाच झाला आहे.
* पूर्वीच्या काळी स्त्री-धन (Stri dhan) आणि वरदक्षिणेच्या रुपात राजेरजवाडे, दासदासी, गोधन, सोने-रूपे मुलीबरोबर तिच्या सासरी पाठवत. वरपक्ष या संपत्तीची भिक मागत नसे. पुढे स्त्रियांवर अनेक बंधने लादली गेली. त्यांना शिक्षणही नाकारले गेले. म्हणून हे स्त्री-धन तिच्या उपजीविकेचे साधन झाले. अशिक्षित, अडाणी, कुरूप मुलीचे न्यूनत्व झाकण्यासाठी आणि मुलगी उजवली नाही तर जन्मभर ती ओझे होऊन राहील या भीतीने वरास संपत्तीची लालूच दाखविली जात असे. मग हळूहळू हा प्रकार सर्वच मुलींच्या बाबतीत अनिवार्य होऊन बसलहुंड्या शिवाय लग्न नाही, असा वर पक्षाचा आग्रह होऊ लागला. त्या काळातील स्त्री परावलंबी, अशिक्षित असल्याने तो मान्य होवू लागला. एक दुष्ट प्रथा समाजाला जळू सारखी चिकटली. आणि वधूपक्षाचे रक्त शोषु लागली. वरपक्षाकडील वडीलमंडळी हुंड्याचा अट्टाहास करू लागली व तरून त्याकडे मान तुकवू लागले.
* याविरुद्ध उपाय म्हणून हुंडाविरोधी अनेक कायदे केले गेले. हुंड्यासाठी (Dowry) बळी घेणार्या व्यक्तीस फाशी सारखी शिक्षाही सुनावली जाऊ लागली असे असून सुद्धा या कायद्यात ईतक्या पळवाटा आहेत की हे गुन्हेगार त्यातून सहजगत्या निसटून जातात. सद्ध्या समाजात अशा गुन्हेगारांचा सुळसुळाट झाला आहे.
* या बाबतीत कायदेशीर प्रयत्नान मध्ये सामाजिक संस्थांनी केलेले सामाजिक जागृतीचे उपाय अधिक प्रभावी ठरतील. या दृष्टीने संपूर्ण समाजाचे विचार परिवर्तन विचार करण्यासाठी काही संघटनांनी हुंडा घेणारया व देणारया विरुद्ध सामाजिक बहिष्काराचे हत्यार उभारले नारी अत्याचार विरोधी मंच व स्त्री मुक्ती संघटनेसारख्या संघटना ‘मुलगी झाली हो’ सारखे पथनाट्य दाखवूनहुंडा विरोधी जनमत तयार केले आहे. नाट्य व चित्रपट क्षेत्रातील जागरूक निर्मात्यांनी व दिग्दर्शकांनी हुंडा समस्या प्रधान चित्रपट व नाटके केली. टी. व्ह, रेडिओ या लोकशिक्षणाच्या साधनाद्वारे या धातक प्रथे विरुद्ध प्रचार केला जात आहे. अनेक युवक हुंडा न घेण्याच्या शपथा वाहून त्याच प्रमाणे वर्तन होत आहे. युवा मंच्या तर्फे परिचयोत्तर विवाह घडवून आणले जात आहे. युवकांच्या बाबतीत विचारपरिवर्तन होणेही अत्यंत आवश्यक आहे. पत्नी हि क्रय वस्तू नसून ती आपली सहचारिणी आहे याचे भान तरुणांनी ठेवणे आवश्यक आहे. लग्न संस्था समानतेच्या पायावर उभी राहिली पाहिजे. तरुणांनी वधू पक्षा कडून हुंडा न घेता स्वकर्तुत्वावर स्वत:चे शिखर गाठावे. त्यात पत्नी कडून सर्व साथ मिळणारच आहे.
1 Comment. Leave new
Chor asked for dowry. good people dont.
In India states like maharashtra, bihar, rajastan and madhyapradesh are famous for dowry. people kill the girls for dowry.
This is shame in india. we should all protest and go against the dowry. from poor to rich people follow the dowry no its becomes the business