(Kshtriya Mhanwine ani Pathishi Ghay Sahane)
क्षत्रिय म्हणविणे आणि पाठीशी घाय साहणे ।।
बोलता लागीवाने आहें जी देवा ।।४।।
पितृभक्त म्हणविणे आणि पितृआज्ञां न पाळणे ।।
बोलता लाजिरवाणे आहे जी देवा ।।५।।
ऐसे भक्त किती गेले अधोगती ।।
नामा म्हणे श्रीपती दास तुझा ।।६।।
……………………………………………………………………………………(Dadi Jadibuti Jaran Maran)
दावी जडीबुटी जारण मारण । नागवे हिंडणे काज काज ।।
दावी उग्र तप केले उपवास । फिरतांहि देश काय काज ।।
काय काज तरी होशील फजिती । स्मरारे अनंत सर्व काळ ।।
नामा म्हणे नव्हे उदंड उपाऊ । धरी आधी पाय विठोबाचे ।।४।।
……………………………………………………………………………………(lamb lamb kay sangashil gosti)
लांब लांब काय सांगशील गोष्टी ।करी उठाउठी निरभिमान ।।
मितूपण जव दंभ गेला नाही । साधिलें त्वां न कांही तत्वसार ।।
अहंभाव देही प्रपंच्याचे दृष्टी । काय चाले गोष्टी रोकडी ते ।।
नामा म्हणे ऎसे नेणती विचार । जाती निरंतर यमंपंथे ।।४।।
……………………………………………………………………………………(Mukhi Nam Hati Tali)
मुखी नाम हाती टाळी । द्या नुपजे कोणे काळी ।।
काय करावे ते गाणें । धिक धिक तें लाजिरवाणे ।।
हरिदास म्हणोनी हळवी मान । कवडीसाठि घेतो प्राण ।।
हरिदासाचे पायी लोळे । केशी धरोनी कापी गळे ।।
नामा म्हणे अवघे चोर । हरी नाम हें थोर ।।५।।
……………………………………………………………………………………(Chandra Suryadi Bimb)
चंद्र-सुर्यादि बिंब लिहीताती सांग । परी प्रकाशाचे अंग लिहिता न यें ।।
संन्यासाची सोंगे आणिताती सांग । परी वैराग्याचे अंग आणितां न यें ।।
नामा म्हणे कीर्तन करिताती सांग । परी प्रेमाचे तें अंग आणीत न यें ।।३।।
……………………………………………………………………………………(Hari bhakt athile ekse te uttam)
हरी भक्त आथिले ऐसे ते उत्तम । येर ते अधम अधमाहुनी ।।
हरीभक्त सप्रेम तेंचि तैसे नाम । येर ते निनामे अनामिक ।।
नामा म्हणे जया नाही तरी हरिसेवा । तें जितचि केशवा प्रेत वाणे ।।३।।
……………………………………………………………………………………(Murk Baisale Kirtani)
मूर्ख बैसले कीर्तनी । न कळे अर्थाची करणी ।।
घुबड पाहे भलतीकडे । नाईके नामाचे पवाडे ।।
पांहू ईच्छी परनारी । चित्त पादरक्षां वरी ।।
नामा म्हणे सांगू किती । मूढ सांगितले नायकती ।।४।।
……………………………………………………………………………………(Sang Khota prnaricha)
संग खोटा परनारिचा । नाश होईल या देहाचा ।।
रावण प्राणासी मुकला । भस्मासुर भस्म जाला ।।
गुरु पत्नीशी रतला । क्षय रोग त्या चंद्राला ।।
ईन्द्रा अंगी सहस्त्र भगें ।नामा म्हणे विषयासंगे ।।४।।
……………………………………………………………………………………(Lavanya Sundar rupachi brwi)
लावण्य सुंदर रूपाचे बरवी । पापिन जाणावी ते कामिनी ।।
देखता होतसे संगाची वासना । भक्ताच्या भजना नाश होय ।।
ऎसी जे घातकी जन्म कासयासी । चांडाळीण तिसी नरक प्राप्त ।।
नामा म्हणे तिचे पाहू नये तोंड ।। पापिन ते रांड बुडवी नरा ।।४।।
……………………………………………………………………………………(Kaya rupi jiche Hinwt Ati)
काया रूप जिचे हिणवट अति । माउली धन्य ती आहे नारी ।।
तियेवरी मन कदापि न जायें । भजना न होये कडा चळ ।।
ऐसिये माउली परउपकारी । घात हा न करी भजनाचा ।।
नामा म्हणे तिचे चरण वंदावे । वदन पहावें माउलीचे ।।४।।
……………………………………………………………………………………
Collection of Aartis Hindi Prayers, The Hindu aartis in Hindi. Various aartis prayers for Indian Desi. This page lists collection of all Aarti
1 Comment. Leave new
nice blog )