नोकरी कि व्यवसाय?




Like
Like Love Haha Wow Sad Angry
5

Business or Job, which is bette? Now, This will be an interesting debate, “Out of every 10 people born in this world , 9 work for the 10th , be the 10th one” Many people work throughout their life …

worker and businessman

महत्वाचे मुद्दे

* उत्तम शेती,

* मध्यम व्यवसाय,

*कनिष्ठ नोकरी,

* नोकरी पेक्षा व्यवसाय प्रतीश्ठीत,

* व्यवसाया साठी कठोर परिश्रमाची आवश्यकता,

*  नवनवीन उद्योग धंद्याचे दालन,

* मराठी युवक व्यवसाय मागे कां ?

*  तरुणांनी लघु-उद्योग कसे करावेत?

* नोकरी कि व्यवसाय ? आजच्या युवकां समोर बेकारीचा भस्मासुर उभा असताना हा प्रश्न काहीसा अप्रस्तुत वाटत असला तरी त्यावर सखोल विचार होणे आवश्यक आहे.  आमच्या सुजाण पूर्वजांनी ‘उत्तम शेती मध्यम व्यवसाय’व कनिष्ठ नोकरी अशी पटवारी लावली होती. नोकरी  म्हणजे स्वत:चे कष्ट दुसर्याला विकणे त्यामुळे ती कनिष्ठ ठरते. नोकरीतही सरकारी आणि खाजगी असे दोन प्रकार आहेत. सरकारी नोकरी म्हणजे आज वरदान मानले जाते. भरपूर सुट्या, जादा पैसा, आराम, नोकरीची शाश्वती, निवृत्ती वेतन, यांमुळे जन्माची काळजी मिटते. खाजगी नोकरी मध्ये कठोर परिश्रम करावे लागतात; पण संशोधनाला, कर्तुत्वाला वाव नसतो. नोकरी शाश्वत नसली तरी कामाचे चीज होते.

* नोकरीपेक्षा व्यवसाय हा केव्हाही श्रेष्ठ दर्जाचा असतो, अशीक्षित मनुष्य सुद्धा थोडा अनुभव व माहिती मिळाल्या नंतर श्भेच्या वस्तू बनविणे, खाद्य पदार्थ बनविणे, शिवणकाम, रंगकाम, कुकुट पालन या सारखे लघु उदयग करू शकतो. अल्प शिक्षित तरुणास तंत्र शिक्षण घेऊन त्या क्षेत्रातहि व्यवसाय सुरु करता येईल. आज कला, क्रीडा, संगीत, अभिनय, कथाकथन इ. क्षेत्रे नुसती आवड म्हणून  न राह्ता भरपूर आर्थिक लाभाची व्यवसायिक क्षेत्रे म्हणून पुढे येत आहे. या व्यवसायान मध्ये प्रारंभिक उपजत प्रतिभा व कल्पकता यांना अविश्रांत श्रमाची जोड देऊन रसिक वर्गाच्या कसोटीत उतरावे लागते. प्रसंगी हसत हसत टीकाही शन कराव्या लागतात. यशाच्या शिखरावर विराजमान असताना. त्या अल्प कालावधीत पुढील आयुष्याची पुंजी जमवावी लागते. उच्च बुद्धिमत्ता लाभलेल्यांसाठी वैद्यकीय व्यवसाय वकिली, आजच्या कांप्युटर युगात उद्योगांना काहीही कमी नाही. तर काही क्षेत्रात स्पर्धात्मक परीक्षा उतीर्ण होऊन आपली योग्यता सिद्ध करावी लागते.

आजच्या युवकांपुढे दालन उभे आहेत. उद्योग धन्द्याच्या क्षेत्रातही भरपूर वाव आहे.पण साहस दाखवायला हवे. “साहसे श्री प्रति वसती।” धाडस दाखविणाऱ्या च्या पायाशी संपत्ती आपोआप लोळण घेते. क्न्ताहि व्यवसाय सुरु करताना कठोर परिश्रमाची तयारी हवी. सिंध, आणि मारवाड मधून महाराष्ट्रात आलेली माणसेआज येथे मोठमोठे उद्योग धंदे काढून स्थिरावली आहेत. त्यांनी प्रारंभी च्या काळात घरोघरी जाउन रेवड्या, पापड, गोळ्या अश्या फुटकळ वस्तू पासून उदयोग केलेले किती तरी उदा. आहेत. ज्यांनी ओसाड जागी जावून तेथील शेतकर्यांच्या सहाय्याने नागर तयार करून विकायला सुरवात केली. ते किर्लोस्कर आज उद्योग समूह स्थापन करून महाराष्ट्रांतील आघाडीचे उद्योगपती झाले आहेत. गरवारे, ओगले. किंवा पर्यटन  व्यवसायातील अग्रणी राजा पाटील अश्या कित्येक व्यक्तींचे आदर्श आजच्या तरुणांनी डोळ्या समोर ठेवावेत.

* आज मत्सोद्योग,खते, क्यटरिंग,या सारखे नवनवीन उद्योग पुढे येत आहे. उद्योगधंद्यासाठी सरकार तर्फे भांडवल पुरवले जात आहे.बी-बियाणे, खते, यंत्रे पुरवून लहान शेतकर्यांना मदत केली जाते. तसेच व्यवसायिक मार्गदर्शन करणार्या स्म्स्था देखील निघाल्या आहेत. ईतके सर्व असूनही आजचा तरून व्यवसाय स्वीकारायला कां कचरतो? याचे मुख्य कारण म्हणजे आजच्या मराठी युवकाला श्रम नकोत. जोखीम नको, कुटुंबांपासून काही काल जरी दूर जायचे असले तरी ते त्याच्या जीवावर येते.शहरात कमी श्रमात जास्त मोबदला मिळणारे काम त्याला हवे आहे. या वृत्ती मुले तो आलेल्या सुवर्ण संधी घालवतो. सरकारी नोकऱ्यावर उद्या मारतो आणि बेकारी पसरली अशी ओरड करतो.

* तरुणांनी खेड्यात जावे तेथील गरजा नुसार छोटे छोटे उद्योग सुरु करावे. घामाचे मोती पेरून सोन्याचे पिक मिळवावे. बड्या उद्योग पतींच्या हाताखाली काम करून अनुभव व कौशल्य मिळवावे, सचोटीने वागावे, व्यवसाय करताना उपभोक्त्याला स्वत:च्या व्यवसायाला संपूर्ण सामाधान मिळेलअशी नीती ठेवावी. यातूनच आजचा युवक स्वत:ची व राष्ट्राची प्रगती साधु  शकेल. भारतभूमी म्हणते आहे. ‘मज नकोत अश्रू घाम हवा’ तव्हा युवकांनी उठावे जागृत होवून कामाला लागावे. राष्ट्राचे भविष्य प्रगतीशील उधोगधंद्यांवर अवलंबून आहे.

 

Business or Job, which is bette? Now, This will be an interesting debate, “Out of every 10 people born in this world , 9 work for the 10th , be the 10th one” Many people work throughout their life …

Like
Like Love Haha Wow Sad Angry
5




, , , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu