Andhashrddha Nirmoolan Samiti, Andhashraddha Nirmoolan Samiti,Committee for Eradication of Blind faith, Promotion of Scientific Temper, Promotion of scientific outlook, Andhashraddha Nirmoolan Samiti Latest News, Photos,Biography, Videos and Wallpapers.
अंधश्रद्धा निर्मुलनाचा अर्थ, सर्वच पुरातन रूढी व प परंपराचा त्याग करणे असा नाही. जून ते सोन नव तें हव या वृत्तीने हितकारक अशा नव्या व जुन्या रीतीरिवाजांचा सुंदर मिलाप करून मानवाचे हित साधने अत्यंत डोळसपणाचं व शास्त्रास घरून होईल. हितकारक अशा पद्धतीमागील शास्त्रीय आधार विसरल्यामुळे त्यांना भाकडकथांचे व अंधश्रद्धेचे रूप आलेले आहे.
मानवांच्या मनाच्या कमकुवतेमुळे अनेकदा अंधश्रद्धा या सुशिक्षितांना त्यातील निरर्थकता कळून सुद्धा सोडवत नाही. पाचवीचे व सटीचे पूजन मुल जन्माला आल्यावर करण्यामागे हाच मनाचा कमकुवतपणा असतो. पण मानसिक समाधान मिळण्यासाठी या प्रथांचे आचरन केले जाते. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभ असताना सुद्धा अंधश्रध्येने पछाडलेली माणसे आपल्याला दिसतात.अंधश्रद्धेचे निर्मुलन करण्यासाठी गेले दीड शतक महात्मा जोतिबा फुले, राजाराम मोहन रॉय, दयानंद सरस्वती, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर,स्वातंत्रवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महान विभूतींनी सामाजिक प्रबोधनाचे प्रयत्न केले. आजही अनेक विज्ञाननिष्ठ संस्था अंधश्रद्धानिर्मुलन,व जनजागरणाचे काम करत आहे. आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी माध्यमांतून लोकशिक्षणाचे कार्य सुरु आहे. पथनाट्य, विविध प्रदर्शने व्याख्याने, प्रात्यक्षिके यांच्याद्वारे जनसामान्यांपर्यंत विज्ञानदृष्टी पोचण्याचे कार्य होत आहे. दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या प्रदूषण,पर्यावरण,प्रथमोपचार,समतोल आहार इत्यादी प्रश्नांच्या सहाय्याने माहिती देऊन समाजाला विज्ञांनिष्ठ बनविण्याची आवश्यकता आहे.सामाजिक कार्यकर्त्यांनी गावागावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांच्या सभा घेऊन मुलाखती, चर्चा, तपासणी यांद्वारा विज्ञांनांचा प्रचार व अंधश्रद्धा निर्मुलन करणे आवश्यक आहे. पत्रकार, साहित्यिक, वक्ते यांनाही वैज्ञांनिक दृष्टीकोनातून अंधश्रद्धानिर्मुलनाबाबतीत भरीव कामगिरी करण्यासारखी आहे.
विज्ञान आणि अंधश्रद्धा ! (Fetish and Science)
महत्वाची मुद्दे : अंधश्रद्धेची परिभाषा ( अंधश्रद्धा म्हणजे काय? ) – अंधश्रद्धांचे प्रकार , उदाहरणे अंधश्रद्धानिर्मुलन करण्यासाठी प्रयत्न ( काय करने आवश्यक)- अंधश्रद्धानिर्मुलनासाठी झालेले
प्रयत्न : -विज्ञाननिष्ठ दृष्टी समाजाला देण्यासाठी चाललेले कार्य, – विज्ञान व अंधश्रद्धानिर्मूलनाच्या बाबतीती विविध संस्था व व्यक्तीचे योगदान.
विश्वात कोणतीही गोष्ट निसर्ग नियमानुसारच घडते. त्या घटने मागे विशिष्ट कार्यकारणभाव असतो. हे नियम व कार्यकारणभाव समजावून घेणे त्याला विज्ञान म्ह्न्तात. त्याच प्रमाणे एखाद्या कृतीमागील शास्त्रीय कारण समजावून न घेणे, बाबा वाक्यं प्रमांणम् असे म्हणून ती कृती आंधळेपनाने अनुसरणे म्हणजे अंधश्रद्धा यातूनच मग अर्थहीन कर्मकांड जन्म घेते.
अज्ञान विपरीत चुकीचे ज्ञान,निरक्षरता, गैरसमजुती आणि सामाजिक व वैज्ञानीक दृष्टीकोनाचा अभाव ही अंधश्रद्धानिर्मितीमागची प्रमुख कारणे आहेत. गावात दुष्काळ पडतो, पूर येतात, देवी, गोवर, घटसर्प, कांजिण्या, यांसारख्या साठीच्या रोगांना माणसं, गुरं बळी पडतात. उभी पिकं कीड लागून नष्ट होतात. याचा संबध दैवी कोपाशी लावला जातो. शास्त्रीय चाचण्या किंवा वैद्यकीय आनिऎत्र उपाय योजना करण्याएवजी देवीला प्रसन्न करण्याकरीता नरबळी किंवा प्राण्यांचे बळी देणे, सर्व गावाने उपवास धरणे, इत्यादी अशास्त्रीय उपाय केले जातात. संतती मिळण्यासाठी, गुप्तधन मिळण्यासाठी, गंडे, दोरे, ताईत, अंगारे याचा आधार घेतला जातो. त्यामुळे मांत्रिक, बुवाबाजी यांना चांगलेच फ़ावते.
पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण हि पण एक प्रकारे अंधश्रद्धाच म्हणता येईल. भारतीयांच्या रुतुमानास घातक असे घट्ट व खूप कपडे घालणं, दारू पिणं , सिगारेट ओढणं, यासर्व गोष्टी आहेत. पण भारतासारख्या उष्ण प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या प्रकृतीला घातक असणाऱ्या अशा गोष्टींचे दूषपरिणाम जाणून न घेता अंधानुकरण केले जाते. भेटताना हस्तांदोलन करनं किंवा शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी केलेले शरीरस्पर्श हे संसर्गजन्य अशा भयंकर रोगांचे वाहक होवू श्क्तात. बाहेरच्या बूट, चपला, घालून घरात व जेवणघरात वावरणे, बुरख्यात किंवा पडद्यात राहणे, यासर्व प्रथा अस्वच्छता व अनआरोग्यास कारणीभूत ठरू शकतात.प्न त्याचा विचार न करता अंधानुकरण केले जाते.
8 Comments. Leave new
Kaydha suvevstha
अंधश्रद्धा निर्मुलनावर खरचं अप्रतिम लेख आहे.
Good
kbup chan lekh ahe
barch kahi shikayla bhetle.
thank you…
very nice
mast essay aahe khup information milali.
Khup sunder khup chan mahiti milale
Very nice essay