अजित पवारांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. २ ० ० ३ ते २ ० १ १ या काळात जलसंपदा आणि अर्थखात्याचे मंत्री असताना त्यांनी तब्बल 2 हजार दशलक्ष घनमीटर पाणी सिंचनाकडून उद्योगांसाठी वळवल्याचं उघड झालं आहे. `प्रयास` या पुण्यातल्या स्वयंसेवी संस्थेनं हा गौप्यस्फोट केलाय. अजित पवारांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले आहेत.
‘पाणी नाही तर मिळणार कुठून?’ हा अजित पवारांचा दावा योग्य होता. पण धरणांमधलं हे पाणी संपवलं कुणी? ज्यांच्यावर जनतेला पाणी देण्याची जबाबदारी होती त्या अजित पवारांनीच धरणांतलं पाणी संपवलं आहे. जलसंपदा आणि अर्थखात्याचे मंत्री असताना त्यांनी तब्बल २ हजार दशलक्ष घनमीटर पाणी सिंचनाकडून उद्योगांसाठी वळवल्याचं उघड झालंय. उच्चपदस्थ समितीचे प्रमुख या नात्यानं त्यांनी ही करामत केली.