महत्वाचे मुद्दे : शिक्षण म्हणजे काय ?(What is education), – पूर्वीची शिक्षण पद्धती (Old education system), – आजचे शिक्षण पुस्तकी स्वरूपाचे (Bookish education system), – वेगवेगळ्या कला विभागाचे शिक्षण आवश्यक, – शिक्षण पद्धतीत आमुलाग्र परिवर्तनाची गरज, – सुशिक्षित बनणार्या शिक्षण पद्धतीपेक्षा सुजाण व सुसंस्कृत बनणारे शिक्षण आवश्यक.
* मानसिक गुणाचे संवर्धन आणि दोषांचे उच्चाटन जे करते ते शिक्षण. जगात वावरण्यासाठी, स्वत:चा सर्वांगिण विकास करून घेण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान म्हणजेच शिक्षण. पूर्वीच्याकाळी प्रत्येक वर्णासाठी भिन्न स्वरूपाचे शिक्षण होते. ब्राम्हणवर्ग वेदविद्येचे, क्षत्रिय शस्त्रविद्येचे, आणि वैश्य व शुद्र हे आपापल्या वाडवडीलां कडून चालत आलेल्या कलेचे शिक्षण घेत असत. पण आज ही चातुर्वर्ण्य पद्धती नाहीशी झाली. त्यामुळे शिक्षण पद्धती बदललेली आहे.
* आजचे शिक्षण हे पूर्ण पुस्तकी स्वरूपाचे आहे. पुस्तकी माहिती ठराविक वेळेत पुन्हा उतरवून काढणे याला आजकाल ‘परीक्षा’ म्हटले जाते. पुस्तका बाहेरील कुठल्याही गोष्टीचा विचार करण्याची मुभा विद्यार्थ्याला आणि शिक्षकालाही नसते. त्यामुळे विद्यार्थ्याची स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता नष्ट होते. स्वत:च्या बुद्धीचा वापर करण्याची संधी न मिळाल्याने विद्यार्थ्याची खरी गुणवत्ता कळू शकत नाही. पदव्यांना अवास्तव महत्व प्राप्त होवून त्या मिळवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरु होते. याच कारणामुळे वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच, अन्य शैक्षणिक क्षेत्रांमध्ये प्रवेश मिळवणे हि गोष्ट आज जिकिरीची होऊन बसली आहे. ज्याचे पाठांतर उत्तम तो अत्यंत हुशार असा गैरसमज रूढ झाला आहे.
* दिवसे दिवस महाविद्द्यालयातुन बाहेर पडणाऱ्या पदवीधरांची संख्या वाढत आहे. परंतु त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा दर्जा वेगाने घसरत आहे. त्यामुळे देशाचे फार मोठे नुकसान होत आहे. आज वाढत्या औद्योगिकिकरणाच्या परिस्थितीत व्यवसायाभिमुख आणि प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षणाची निकडीची गरज आहे.परंतु ती गरज आज पूर्ण होत नाही. पुस्तकी शिक्षणावर जास्त भर दिलेला आढळतो. व्यक्ती विकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवल्यास नृत्य, गायन, शिल्पकला इत्यादी कलाविभागांचाही शिक्षणात अंतर्भाव करायला ह्वा. दुर्दैवाने या विषयांकडे अजूनही उपेक्षेने पाहिले जाते.
* शारीरिक, बौद्धिक, भावनिक असा सर्वकष विकास साधण्यासाठी शिक्षणपद्धतीत आमुलाग्र परिवर्तनाची गरज आहे. भाकरी मिळवून देणारे सुसंस्कार घडविणारे, स्वदेश, स्वभाषा, स्वदेशबांधवांच्याविषयी नितांत अभिमान निर्माण करणारे शिक्षण ह्वे आहे. व्यक्तीविकासाबरोबरच या व्यक्तीच्याद्वारे समाज विकास होईल. व राष्ट्र सर्व दृष्टीने संपन्न होईल असे शिक्षण मिळणे जरुरीचे आहे. भारत सरकारने यादृष्टीने टाकलेली पावले स्वागतार्ह आहेत असे म्हटले पाहिजे.
* आजच्या शिकण पद्धतीतून मनुष्य सुशिक्षित होतो पण तो सुजाण, सुसंस्कृत होतोच असे नाही. वास्तविक शिक्षण हा पवित्र संस्कार आहे. शिक्षण घेतलेली व्यक्ती सुसंस्कृत असायला ह्वी. दुर्दैवाने तसे फारसे दिसत नाही. उलट अधिकतर माणसे आत्मकेंद्रित, स्वार्थ व संकुचित वृत्तीची झालेली आढळतात. हुंड्याची राक्षसी प्रथा सुशिक्षितांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. अशिक्षित शेतकऱ्याच्या घरी त्याची पत्नी ही गुहलक्ष्मी मानली जाते. बहुसंख्य सुशिक्षितांमध्ये घरी येणारी नववधू ही केवळ एक उपभोग्य वस्तू, माहेराहून खूप मोठा हुंडा घेवून येणारी व्यक्ती असेच समजले जाते. कोणताही मोठा त्याग करण्याची वेळ आली तर अडाणी, अशिक्षित माणूस मागचा- पुढचा विचार न करता कर्तव्य भावनेने त्याग करतो. उलट अश्या प्रत्येक गोष्टीचे स्वार्थासाठी भांडवल करण्याची वृत्ती सुशिक्षितात आढळते. गुन्हेगारीचे प्रकार व प्रमाण सुशिक्षितांतच अधिक आढळतात. आजच्या शिक्षणपद्धतीची ही शोकांतिका आहे.
Education system is the most dangerous web that is spreading and strengthening itself in the human society. Education is an instrument which changes man into complete man. But today’s education system making man into half.
1 Comment. Leave new
Nice articles in Marathi and also useful for students