२६/११ मुंबई हत्याकांड वर बनलेला हा चित्रपट एक जिवंत कथा आहे. आपण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा कधीच विसरू शकत नाही … २६/११/२००८… संपूर्ण देशालाच हादरवून टाकणारी ही घटना प्रत्तेक व्यक्तीच्या लक्षात राहील अशी आहे. त्यावरच आधारित `द अटॅक्स ऑफ २६/११` हा चित्रपट, सर्वच्या आठवणी ताज्या करवून टाकणारा आहे. . या हल्ल्याशी प्रत्यक्षात संबंध आलेल्या आणि प्रत्यक्षात संबंध न येऊनही त्या घटनेचा पुरेपुर अनुभव घेणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात हल्ल्याच्या क्रूरतेच्या आठवणी आजही ताज्याच आहेत. याच पटकथेला घेऊन रामगोपाल वर्मा यांनी ‘द अटॅक्स ऑफ २६/११’ या सिनेमाच्या माध्यमातून ‘त्या’ भयानक आठवणी पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केलाय. या चित्रपटाचे दिग्दर्शक : राम गोपाल वर्मा आहेत आणि मुख्य कलाकार नाना पाटेकर, संजीव जयस्वाल हे आहेत. हा चित्रपट सर्वांनाच जुन्या आठवणी ताज्या करवून देणारा आहे. २६/११ मध्ये झालेला क्रूर हत्याकांड आपण कधीच विसरू शकणार नाही असा होता. ‘हा सिनेमा म्हणजे एकप्रकारे त्या दशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली आहे’ असं रामगोपाल वर्मा यांनी आधीच स्पष्ट केलंय आणि खरोखरच या सिनेमाला ‘त्या’ घटनेशी निगडीत असलेल्या भावनांनी जोडण्यात ते यशस्वीही झालेत. या चित्रपटा बद्धल अधिक माहिती आपण खालील लिंक द्वारे मिळवू शकता.
Source :