सध्या सुशीलकुमार शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात एकमेकांना टोलेबाजी सुरु आहे. नुकत्याच झालेल्या सोलापूर येथील जाहीर सभेत राज ठाकरे यांनी शिंदे यांची खिल्ली उडविली , शिंदे यांना टोमणा मारत ते , म्हणाले कि मी एक पट्टेवाला होता, मग मला गृहमंत्री केलं.. मी एक दलित असूनही मला त्यांनी एवढ्या मोठ्या पदावर नेलं… असे म्हणनाऱ्या सुशील कुमारांची राज यांनी टिंगली केली , मग सुशीलकुमार शिंदे का मागे राहणार त्यांनी सुद्धा राज यांना उत्तर देत म्हटले की राज हे फार मोठे नकलकार आहेत आणि ते नेहमी नकलच करत राहणार . असा टोला केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावलाय. गेल्या आठवड्यात सोलापूर येथील जाहीर सभेत राज ठाकरे यांनी सुशीलकुमार शिंदे यांची खिल्ली उडविली होती. आणि म्हणूनच याची परतफेड शिंदे करतांना सुशील कुमारांनी हा टोला हाणला.