हुतात्मा भगतसिंग




Like
Like Love Haha Wow Sad Angry
8431162

जन्म २८ सप्टेंबर १९०७–  मृत्यू २३ मार्च १९३१

Shaheed Bhagat Singh
देशासाठी ज्या स्वातंत्र वीरांनी आपले सर्वस्व वाहिले म्हणून त्यांचे गीत गाताना कवी म्हणतात,

सोडिले सर्व घरदार.. सोडीला सुखी संसार
ज्योतीसम जीवन जगले..ते अमर हुतात्मे झाले..

भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सरदार भगतसिंगाचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ रोजी पंजाबातील बंग या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. वडील किशनसिंग यांना क्रांतिकारी वाड्मयाचा प्रसार केल्या बद्दल मंडालेच्या तुरुंगात त्यांना सजा भोगावी लागली होती. भगतसिंग पाच-सहा वर्षाचा असताना त्याच्या काका सोबत शेतावर गेला होता काका शेतात गव्हाची पेरणी करीत असता तेहीत्यांना मदत करू लागले. तेव्हा त्यांच्या काकाने त्यांना विचारले ” भगत, कसली पेरणी करतोय ?” यावे तो म्हणाला, मी बंदुकीच्या बिया परत आहे ”,  का? असा प्रश्न काकांनी विचारला असता भगतसिंग म्हणाले ”कां म्हणजे काय?’ या बंदुकीच्या  बियांची झाडे झाली म्हणजे त्यांच्या वर बंदुका येतील आणि मग त्या बंदुकातून गोळ्या झाडून मी इंग्रजांना मारीन व माझा देश स्वतंत्र करीन”.

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बंग येथे झाल्यावर भगतसिंग लाहोरच्या डी. ए. व्ही. व पुढे न्यशनल कॉलेज मध्ये १९२३ साली बी. ए. झाले.  कॉलेज शिक्षण चालू असतानाच त्यांनी आजन्म अविवाहित राहून देश्याच्या स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित करण्याची शपथ घेतली. त्याच प्रमाणे बी.ए. होताच त्यांनी क्रांतीकारकाच्या संघटनेत प्रवेश केला. पुढे सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, जतींद्रनाथ दास आदी कट्टर क्रांतीकारकांच्या साहायाने त्यांनी  ‘नव जवान भारत सभा’  हि संघटना सुरु केली. दिनांक ९ फेब्रुवारी १९२५ च्या रात्री लखनौ जवळच्या काकोरी स्टेशनातून सरकारी खजिना घेऊन निघालेली एक रेल्वे आगगाडी वाटेत अडवून तिच्या तील सर्व खजिना त्या क्रांतीकारकांनी पिस्तुले खरीद्न्यासाठी व बॉंब तयार करण्यासाठी लांबविला.

३० आक्तोम्ब्र १९२८ रोजी सायमन कमिशन लाहोर शहरात गेले असता तेथे लालालचपतराय यांच्या नेतृत्वा खाली निदर्शने सुरु झाले. पोलिसांनी केलेल्या बेदम लाठी हल्ल्यात लालाजीन्ना बराच मार बसला.व आजारी पडून त्यातच त्यांचा अंत झाला. याचा सूड घेण्याचे भगतसिंग आदींनी ठरविले व लालाजींच्या मृत्युला कारणीभूत झालेल्या मिस्टर स्कॉटऐवजी गैरसमजुतीने  स्यण्डर्स ला मारले. व मारून पळून जात असता त्याचा पाठलाग करणार्या चननसिंग यालाही पिस्तुलाने टिपले. भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी स्वत:च्या स्वार्थाला लाथ मारून भगतसिंगाने आपले घर सोडले आणि तो स्वातंत्र चळवळीत दाखल झाला. याच बगतसिंगाने ९ एप्रिल १९२९ रोजी बटुकेश्वर या साथीदाराच्या मदतीने कायदे मंडळाच्या सभागृहात ‘ इंकलाब जिंदाबाद ‘ च्या घोषणा देत हात बॉम्ब टाकून इंगरजांना दणाणून सोडले.

पुढे ‘डिस्पूट बिल’ व ‘पब्लिक सेफ्टी बिल ‘ हे दोन अन्यायकारक कायदे ब्रिटीश सरकारने मंजूर करून घेण्यासाठी केंद्रीय विधानसभेपुढे आणले असता पेक्षागृहात कमी शक्तीशाली बॉंब टाकून व ब्रिटीश सरकारच्या धिक्काराची पत्रके भिरकावून, भगतसिंग व त्यांचा सहकार्यांनी ब्रिटीश सरकारला हादरवून सोडले. पण ते पकडले जावून त्यांच्यावर खटले भरले गेले व न्यायालयाच्या निर्णयानुसार भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या तिघांना लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात २३ मार्च १९३१ रोजी फासी देण्यात आले.   याच भगतसिंगाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर आपल्या मातेवर, भू  – मातेवर – भगिनीवर कोणी अत्याचार करू लागला तर स्वार्थाला बाजूस सारून कर्तव्यासाठी लढा. त्यामुळे जीवनात तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल .

Shaheed Bhagat Singh Biography and original picture collection.

 

Shaheed Bhagat Singh Biography and essay, Shaheed Bhagat Singh great martyrs of pun jab, read essay and Biography of Shaheed Bhagat Singh.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
8431162




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu