सरदार वल्लभभाई पटेल!




Like
Like Love Haha Wow Sad Angry
5711322

जन्म ३१ ओक्टोंबर १८७५ , मृत्यु  १५ डिसेंबर १९५०.

sardar patel information in hindi

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ओक्टोंबर १८७५ रोजी गुजराथ मधील खेडा जिल्ह्यातील करमसाड खेड्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव झवेरभाई पटेल आणि आईचे नाव लाडबाई  असे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण करमसाड या गावी झाले. न्न्ते पेतलाड येथील एकां शाळेत ते दाखल झाले. दोन वर्षा नंतर ते नडीयादच्या हायस्कूल मध्ये आले. बालपणा पासून करारी व अन्यायाची चीड असलेल्या वल्लभभाईनि शाळेत असताना एका मारकुट्या गुरुजीं विरुद्ध विद्यार्थ्यांना संघटीत करून सतत तीन दिवस संप घडवून आणण्याचे आक्रित केले व त्या गुरुजींना नरमाई ने वागायला लावले.

विद्यार्थी दशेतच त्यांचा जव्हेरबाईं शी विवाह झाला. दहावी झाल्यावर घरच्या गरिबीमुले त्याना पुढील शिक्षण घेन्याकरीता पैसा साठवू लागले.पुरेसे पैसे साठताच आपले वडीलबंधू विठ्ठलभाई यांना ते पैसे देऊन त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविले. १९०९ साली त्यांच्या पत्नी चे निधन झाले.विठ्ठल भाई ब्यरिष्टरी करून आल्यावर वल्लभभाई इंग्लंडला गेले, आणि बॉरिष्टरिची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण करून मायदेशी परत आले. व अहमदाबाद ला वकिली करू लागले.वकिलीत भरपूर पैसा कमावूनते वैभवशाली जीवन काढू लागले. पण महात्माजींच्या सहवासात येउन त्यांनी वकिली सोडून देश्याच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन अर्पण केले. त्यांनी असहकाराच्या चळवळीत भाग घेतला.व कारावास भोगला.

अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष असताना त्यांनी त्या शहरात अनेक सुधारणा व सोई केल्या गुजरात विद्यापिहाची स्थापना केली. १९२७ साली अतिवृष्टी मुळे गुजरात मध्ये जलप्रलय झाला असता. त्यांनी पुरग्रस्ताणा केलेले सहाय्य तर चीरस्मरणीय ठरते. १९२८ साली बार्डोलीस केलेल्या करबंदी चळवळीचे  नेतृत्व स्वीकारून त्यांनी ब्रिटीश सरकारला नमविले. त्यामुळे लोक त्यांना “सरदार पटेल” असे संबोधु  लागले.

१९३१ साली कराची येथे ब्र्लेल्या अखिल भारती कॉंग्रेस च्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.१९४२च्या ‘भारत छोडो” च्ल्व्लीठी भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावास घडला. २ सप्टेंबर १९४६ रोजी स्थापन झालेल्या मध्यवर्ती हंगामी मंत्रीमंडळात ते भारताचे पहिले गृहमंत्री होते. ते घटना समितीचेही सदस्य होते. १५ ऑगष्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान बनले. तेव्हा सरदार पटेल उपपंतप्रधान बनले. त्यांच्या कडे गृह, माहिती आणि प्रसारण तसेच घटक राज्यासंबधीचे प्रश्न हि खाती सोपविण्यात आली. पण देशाची फाळणी झाली पटेलांना या गोष्टीचे फार दु:ख झाले. भारतातील लहान मोठी संस्थाने संघराज्यात सामील करण्याचे फार मोठे कार्य सरदारांनी केले. निजामचे हैद्राबाद संस्थान त्यांनीच भारतात विलीन करून घेतले. सुप्रसिद्ध  सोरटीसोमनाथ मंदिराचा जिर्नोधार केला. ते मंदिर सर्वांना खुले केले. ते देशसेवेमुळे अमर झाले. देश हे एकच कुटुंब आहे अश्या भावनेनेच ते वागत.मात्र आपण “गृह मंत्री” ‘असतानाच गांधीजींची हत्या झाली. ‘ हि गोष्ट त्यांच्या मनाला अतिशय लागली. मग लवकरच हृद्य विकाराचा झटका येउन ते आजारी पडले. व त्यातच त्यांचे १५डिसेम्बर १९५० रोजी निधन झाले.

बारडोलीचे सरदार, गुजराथ चे सिंह, भारताचे लोहपुरुष, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील सेनापती, भारताच्या एकतेचे शिल्पकार आणि पहाडाप्रमाणे सुध्रुड ईच्छा शक्ती धारण करणारे वल्लभभाई पटेल इहलोकांतून गेले. त्यावेळी त्यांचे वय ७५ वर्ष्याचे होते. आपण त्यांचे आदराने स्मरण करू यां ! व त्यांच्या गुणांचे अनुकरण केले पाहिजे. त्याना कोटी कोटी प्रणाम!

Sardar Patel Biography and original picture collection, picture mahatma Gandhi.

What is Statue of Unity? 

The Statue of Unity is a monument dedicated to Indian independence movement leader Sardar Vallabhbhai Patel, the Iron Man of India and is located on the river island called Sadhu Bet facing the Narmada Dam near Rajpipla in Indian state of Gujarat.  Height: 182 m

Pictures:

Like
Like Love Haha Wow Sad Angry
5711322




, , , , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




3 Comments.

Comments are closed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा