टाटा उद्योग समूहाचे माजी अध्य़क्ष रतन टाटा हे कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत. रतन टाटा ह्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. आता हि बैठक कुठल्या उद्देश्याने करण्यात आली हे मात्र अजून कळलेले नाही. राज ठाकरेंनी टाटा यांचं स्वागत केलं आहे. टाटा यांनी राज यांची सदिच्छा भेट घेतली आहे. रतन टाटा यांनी राज ठाकरेंची भेट घेत काहीवेळ त्यांचाशी चर्चाही केली. राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी रतन टाटांचे स्वागत करून त्यांच्यांशी गप्पा मारल्या. रतन टाटा यांनी काही महिन्यापूर्वीच टाटा समूहातून निवृत्ती घेतली आहे आणि त्यानंतर राज बरोबर झालेली बैठक , याचे राज काय ते मात्र समोर आलेले नाही. आता २०१४ च्या निवडणुका लवकरच येत आहेत, त्याच मनसे या पक्षाची महत्वाची भूमिका असणार आहे . त्याच संदर्भात हि बैठक फार मह्त्वाची मानली जाते. २०१४ च्या आगामी निवडणुका पाहता राज ठाकरे यांची रतन टाटा यांनी घेतली भेट ही महत्त्वपूर्ण मानली जाते आहे.