जन्म १५४०. मृत्यू- १९ जानेवारी १५९७.
इ. सन. १५४० मध्ये महाराणा प्रतापसिंग यांचा जन्म झाला. मेवाडचा राणा व्दितिय उदयसिंग यास तेहतीस अपत्ये होती. या सर्वात जेष्ठ प्रताप. स्वाभिमान व सदाचार हे त्याचे मुख्य होते. तो बालपणा पासूनच धीट आणि शूर होता. त्याचे हे गुण पाहूनच मोठेपणी हा महापराक्रमी होणार याची सर्वांनाच कल्पना आली होती. शिक्षणापेक्षा मैदानी खेळ, व शस्त्रास्त्र चालविणे त्याला जास्त आवडे. आपला बंधू शक्तीसिंह याच्या बरोबर वन्य पशूंची शिकार करण्यात त्याचा बराच वेळ जंगलात जाई. महाराणा प्रतापसिंहाने अकबरा सारख्या बलाढ्य बाद्शहाशी, मेवाड आणि राजपुतांना यांच्या स्वातंत्र्यासाठी २५ वर्षे लढा दिला या लढ्यात त्याला पत्नीला घेऊन मुलाबाळांसोबत जंगलात भटकावे लागले. तहान- भूक वीसरावी लागली.मातृभूमीसाठी,मेवाडचे स्वातंत्र्य टिकवीन्यासाठीत्याने केलेल्या संघर्शाला तोड नाही.हे सारे कष्ट सोसत असतानाही त्याने आपल्या कुळाला आणि देशाच्या प्रतिष्ठेला धक्का लागू दिला नाही. ‘स्वातंत्र’ या शब्दाचा पर्यायच ‘ प्रतापसिंह ‘ व्हावा, असे त्याचे तेजस्वी जीवन होते. प्रतापसिंहाच्या तेजाने केवळ राज्पुतान्नाच नव्हे तर सारा भारत देश प्रभावित झाला. महाराणा प्रतापसिंहाचे नाव आजही राजस्थानात पूज्य मानले जाते.
भारतीय इतीहासात महाराणा प्रतापसिंहाचे नाव नेहमीच साहस,शौर्य,त्याग,आणि हौतात्म्य यासाठी प्रेरणादायक ठरलेले आहे. मेवाडच्या सिसोदिया घराण्यात राणा हमीर,बाप्पा रावळ ,राणा संग असे अनेक शूरवीर हून गेले. ह्या सर्व वीरांना ‘राणा’ असे संबोधिल्या जाते. पण प्रतापसिंहाला ” महाराणा ” हि उपाधी मिळाली आहे.
त्याकाळी दिल्लीच्या तख्तावर मोगल बादशहा अकबर हा अतिशय शक्तिशाली राजा विराजमान होता. तो अतिशय धूर्त होता. हिंदूच्याच बलाचा वापर करून तो हिंदू राज्यांना गुलाम बनवी.त्यांना तो आपापसात लढायला लाव. काट्याने काटा काढून, शस्त्राला शस्त्र भिडवून स्व:त अलिप्त राहून व फायदा आपल्या पदरात टाकून घेई. हिंडून मधील फुटीरता आणि स्वार्थ लोभ याचा त्याने भरपूर लाभ धेतला त्यांचा स्वाबिमान नष्ट करण्यासाठी त्याने अनेक प्रकारचे उपाय योजले आणि बहुतेक सर्व राजपुतांना वश करून घेतले. काही राजपूत राजांनी मानसन्मानाच्या लालचीने आपल्या उज्ज्वल परंपरां आणि क्षात्रधर्माला तिलांजली देऊन सुना-मुलींनाही अकबराच्या अं:पुरात पोचविले होते.
पण अश्याही परिस्थितीत मेवाड, बुंदेलखंड आणि सिरही वंशातील काही राजे आपला स्वाभिमान, धर्म. आणि स्वतंत्रता टिकवून ठेवण्यासाठी अकबराशी प्राणपणाने लढत होते. पुढे उदयसिंह हा मेवाडचा राजा झाला. त्याचे स्वातंत्र्य म्हणजे आपल्या सामर्थ्याचा अपमान होय, असे अकबराला वाटे. त्या खूप मोठी सेना पाठवून चितोडवर जोराचे आक्रमण केले.उद्यसिंह हा प्रथम पासूनच विलासी जीवनात रंगला होता. अर्थातच मेवाद्ची आज पर्रयंतचि शौर्य परंपरा राखण्याचे व आपल्या मानसंन्माचे रक्षण करण्याचे साहस त्याच्यात नव्हते. जीव वाचवण्या करीता तो चितोड सोडून पळून गेला आरवली पर्वतावर उदयपुर नावाची त्याने नवी राजधानी वसविली. चितोडच्या युद्धा नंतर ४ वर्रष्यांनी दिनांक ३ मार्च १५७२ उदयसिंहाचे निधन झाले.
प्रताप सिंहाचा राज्याभिषेक झाला. प्रतापसिंह हा राणा प्रतापसिंह म्हणून आला होतां. “कित्येक वर्ष्यापासून आपल्या पासून दुरावलेली वीरता आणि धर्म-न्याय यांच्या रक्षणार्थ युद्धाची भावना सर्व जनमानसात आपल्याला निर्माण करण्याची आहे. ज्याप्रमाणे श्री प्रभू रामचंद्राने पापी, अन्यायी, आणि अत्याच्यारि रावणाला युद्धात पराजित करून न्याय व धर्म याची स्थापना केली. तद्वतच आपल्याला आपल्या मातृभूमीवर लागलेल्या पारतंत्र्याचा कलंक नेहमीसाठी धुवून टाकायचा आहे. शक्तीशाली राजपुतांनो,’ पुढे व्हा व स्वातंत्र मिळविण्याची आकांक्षा तयारी करा. “हि ओजस्वी वाणी व प्रतापसिंहाची कठोर प्रतीज्ञां ऐकून तेथे उपस्थित असलेल्या सर्व सरदारांच्या अं:करणात उत्साहाची लहर उठवली. एक मुखाने त्यांनी घोषणा केली कि” हे प्रभो आमच्या शरीराती रक्ताच्या शेवटच्या थेम्बा पर्यंत आम्ही चितोडच्या मुक्तीसाठी राणा प्रतापसिंहाला सहाय्य करू व त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढू! आम्ही मरण पत्करू पण आमच्या ध्येयापासून हटणार नाही. राणाजी आम्ही सर्व आपल्या पाठीशी उभे आहोत. याची खात्री ठेवा. केवळ आपल्या इशाऱ्याचाच अवकाश कि आम्ही आत्म समर्पण करायला तयार आहोत.”
हळदीघाटच्या युद्धात अकबराच्या अपेक्षेनुसार निर्णायक निकाल लावला नाही. त्या युद्धात रन प्रतापला माघार घ्यावी लागली. हे जरी खरे असले तरी अकबराचेच सैन्य प्रतापाचा पूर्णपणे पाडाव करण्यात अयशस्वी ठरले. महाराणा प्रतापाने आपल्या सैन्यात क्षात्रतेज आणि बळ निर्माण केले व आपल्या सैन्याची वाढ करून संपूर्ण मेवाड प्रांत आपल्या कब्जात घेतला. हे कळल्यावरही अकबर बादशाला शांतच राहावे लागले. पुन्हा महाराणा प्रतापाशी संघर्ष करण्याचे धाडस त्याने केले नाही. नंतर अकबर बद्शहाणे आपले सारे लक्ष दक्षिणेकडे वळविले. परंतु एवढ्या विजयानंतरही महाराणा प्रतापचे समाधान झाले नाही. त्याची दृष्टी चित्तोडवर होती. चित्तोड मोगलच्या ताब्यात राहणे, हे त्यांना अतिशय खटकत होते. चित्तोड स्वतंत्र केल्या शिवाय त्यांना चैन पडत नव्हती. प्रतापचे साहस, शोर्य , चातुर्य व महापराक्रम बघून झालोर, जोधपुर, इडर, नोडोल व बुदेलचे राजे त्याच्या साह्यार्थ धावून आले व अकबर बादशाच्या विरोधात उभे राहिले. प्रतापचे दूत सर्वदूर या संघर्षाचा वणवा पेटवित होते. अकबराच्या विरुद्ध लोकांना भडकवीत होते. अकबराचे सैन्य बेसावद होते. ह्या सगळ्या प्रकरांनी अकबर बादशहा घाबरून गेला होता.
एकामागून एक पर्वतासमान संकटे येत होती व त्याच्याशी टक्कर देवून मार्ग काढण्यात महाराणाचे शरीर जर्जर झाले होते. १९ जानेवारी १५९७ रोजी त्याचे निधन झाले . भारतीय इतिहासात: प्रातःस्मरणीय महाराणा प्रतापसिंहाचे नाव, राष्ट्र, संकृती , स्वाभिमान आणि स्वतंत्र याचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या नरर्विराच्या परंपरेत असुर्यचंद्र तळपत राहिले .
Maharana Pratap, Read full Biography and essay of Maharana pratap in Marathi.
1 Comment. Leave new
It is a very good easily.Here explain the history with examples.It is very good for students. If they write this eassy they will chance to chase marks.