उन्हाळ्याला कसे तोंड द्यावे ?




Like
Like Love Haha Wow Sad Angry

summer care tips for you

उन्हाळ्याला कसे तोंड द्यावे ?

१) सतत उद्योगी राहावे, गप्पागोष्टी कराव्यात, बैठें खेळ खेळावे, उपाशी पोटी उन्हात जाऊ नये, शक्यतोवर दही किंवा ताक सेवन करून घरा बाहेर पडावे.

२) उन्हात बाहेर जाताना डोक्याला पांढरा खाडी किंवा कॉटन रुमाल बांधावा. कान व मानेचा मागील भाग नीट झाकून घ्यावा. खिश्यात एक छोटा सोललेला कांदा ठेवावा.

३) घरातून बाहेर पडताना एकदम कुलर मधून बाहेर किंवा बाहेरून आल्या आल्या कुलर समोर जाऊ नये. मध्यम तापमानात थोडे थांबून अवधीने थंड वातावरणात जावे.

४) कॉफी, चहा एवजी गोड किंवा खारट लस्सी, आले, निंबू, उसाचा रस, लिंबाचे सरबत, लेमन बार्ली, वाळ्याचे सरबत प्यावे.

५) उन्हातून आल्या नंतर चहा घ्यायचे झाल्यास काळी ( बिना दुधाची ) घ्यावी.

६) उन्हाळ्यात बाहेर जाण्या करीता शक्य तोवर पांढरे कॉटन कपडे वापरावे तसेच सैल कपडे वापरावेत. जीन्स वैगरे वापरू नयेत.

७) कडक उन्हातून आल्या आल्या आऎस्क्रिम ,बर्फ खाणे टाळावे.

८) चंदनाच गंध, मोगरा, चमेली हीना वै. अत्तरे वापरावीत.

९) चंद्रपुटी प्रवाळ टाकलेला चरक चा ‘गुलकंद’ १-१ चमचा खावा.

१०) सतत पंख्यात किंवा कुलर मध्ये बसू नये. थोड्या (वेगळ्या) गरम वातावरणाची सवय ठेवावी.

११) उठल्या बरोबर व झोपण्याचे वेळी हात-पाय व डोके गार पाण्याने धुवावे.

१२) उष्ण-पित्त प्रकृती वाल्यांनी थोडे पोहण्यास जावे त्यावेळी कानात स्पेशल कापसाचे बोळे, व डोक्यास प्लास्टिक टोपी वापरावी.

१३) उन्हात काम करता करताच थंड पाणी पिऊ नये, चहा चालेल. शक्यतोवर काळी चहा घ्यावी.

१४) झळवणी च्या पाण्याने रोज सायंकाळी आंघोळ करावी. (झळवणीचे पाणी म्हणजे बादलीत पाणी घेऊन ते दिवसा उन्हात ठेवावे म्हणजे ते सुर्यतापमानाने उष्ण झालेले पाणी नंतर थंड झाले असले तरी चालेल.त्या पाण्याला झळवणीचे पाणी म्ह्णतात.

१५) उन्हाळ्यात चंद्नासव हे आयुर्वेदिक औषध सकाळ- रात्री जेवणा नंतर २-२ चमच पाण्या सोबत घ्यावे.

 Beat the heat with fruit juices

How to be face at the summer, Since summer is swimsuit season, your skin has to be ready to be put on display. … Apricot Scrub for the face and Bath & Body Works

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu