काल दिनांक २७/०३/१३ रोजी संपूर्ण भारतभर होळी निमित्य रंग पंचमी खेळली गेली, या वर्षी रंग पंचमी कोरडी साजरी करावी असे भारत सरकारने आव्हाहण केले होते. सध्या संपूर्ण भारतभर पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे पाण्याचा विपरीत उपयोग करू नये असे सरकारने घोषित केले होते. महाराष्ट्रात पुणे , मुंबई, कोल्हापूर , नागपूर या सर्वच ठिकाणी होळी मोठ्या हर्षउल्हासाने साजरी करण्यात आली. दर वर्षी प्रमाणे यंदाही होळीला सर्वत्र पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला होता . होळीच्या दिवशी सर्वत्र काही ना काही घटना होतच असतात, होळी शांतता पूर्वक व्हावी या करिता पोलिस कार्यरत असते. होळी हा सण भारतात परंपरागत साजरा केला जातो. या सणा मुळे आपसातील तंटे , भांडण मिटविले जातात आणि एकमेकांना रंग लावून सुभेच्या दिल्या जातात .