डॉ. हेडगेवार (केशव)




Like
Like Love Haha Wow Sad Angry
51

dr hedgewar essay

 ” राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ” या शिस्तबद्ध संघटनेचि स्थापना व वाढ करणार्या डॉ.हेडगेवार यांचा जन्म १एप्रिल १८८९ रोजी नागपूर मध्ये एका भिक्षुक कुटुंबात झाला. त्यांचे नाव केशव व त्यांच्या वडिलांचे नाव बळीराम आणि आईचे नाव रेवती बाई होते त्यांचे वडील फार विद्वान होते.त्यांनी अग्निहोत्र घेतलेले होते. ते भिक्षुकी करीत असत पण विध्यार्थ्यांना वेद शिकवीत असत.

आईच्या मायेचे छत्र केशवांना अधीक काळ लाभले नाही. १९०२ साली नागपूर मध्ये जिकडे तिकडे प्लेग चा कहर झाला.बळीरामपंत शेजार-पाजारांना सर्व प्रकारे मदत करू लागले. पण शेवटी ते व त्यांच्या पत्नी दोघेही आजारी पडले. आणि एकाच दिवशी मरण पावलेत. केशव त्यावेळी फक्त बारा वर्षाचा होता. केशवची बुद्धी फार चांगली होती. रामरक्षा, मनाचेश्लोक, अशी अनेक स्तोत्रे याचे पाठांतर त्याना लवकर होत असे. तो शाळेत जावू लागला व अनेकांना प्रश विचारू लागला. रामायण-महाभारतातील कथा मन लावून ऐकू लागला.आणि बाल-वयातच तो आपल्या देशाचा विचार करू लागला. धिप्पाड शरीर, अंगातील जोम व चेहर्यातील तेज यामुळे आपोआपच त्याच्या विषयी सर्वांना आदर वाटत असे. नंतर लोक त्याला केशवराव म्हणू लागले. त्यांचे प्राथमिक शिक्षण नागपूर, अमरावती, यवतमाळ , व पुणे या ठिकाणी झाले.

अवघ्या ५१ वर्ष्याच्या आयुष्यात त्यांनी आसेतु -हिमाच्रल सार्या भारतभर सर्वांची हृद्य एका सूत्रात ओवण्याचे जे काम केले. त्याला जगाच्या इतिहासात तोड सापडणे कठीण आहे. डॉ कलकत्ताच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेवून १९१४ मध्ये एल.एम.& एस. हि पदवी मिळविली. नागपूरला येवून व्यवसाय व सामाजिक कार्ये दोन्हीस सुरवात केली. प्रबळ संघटना नसणे हे या देशाच्या अवनतीचे कारण आहे. हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून निश्चयाने रोज च्या रोज एकत्र येणे, राष्ट्रीय विचारांचे चिंतन करणे फार आवश्यक आहे. असे त्यांच्या मनाने हेरले. आणि अश्या प्रकारचा शिस्तबद्ध कार्यक्रम असणारी एक संघटना उभारावी असा संकल्प त्यांनी केला १९२५ मध्ये विजयादशमीच्या मुहूर्ता वर अवघ्या पाच स्वयंसेवकानिशी ”राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ”स्थापना केली. संघटनेसाठी संघतना या प्रमुख तत्वावर आधारित या संघटने कडे चारीत्य आणि शुचितेचे आशास्थान म्हणून पाहिले जाते.

संघटनेच्या उदिष्टप्राप्तीसाठी हजारो कार्यकर्त्यांनी या कार्याला वाहून धेत्लेले आहे.आणि शाखांमध्ये ते कवायत व बौद्धिके आज हि चालू आहेत. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उद्धीष्टांना पूरक आशी कार्ये करणार्या अन्य संघटनांच्या कार्याचा भारही अंगावर घेतलाआहे. डॉ. हेडगेवारांनी असहकार चळवळ तसेच कायदेभंग आंदोलनात भाग होता. हिंदू समाजाचे संघटन होणे आवश्यक आहे व त्या शिवाय या समाजाचा उत्कर्ष होणार नाही. या धारणेतून त्यांनी  ”राष्ट्रीय स्वयंसेवक संघा ”ची स्थापना केली. ” राष्ट्रीय स्वयं सेवक संघ” या नावाने विख्यात असलेल्या देशव्यापी संघटनेचे संस्थापक  डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी २१ जून १९४० रोजी शेवटचा श्वास घेतला.

डॉ. चे सर्व जीवन कष्टाचे, त्यागाचे आणि तळमळीचे होते. बालपणापासून घेतलेले देश सेवेचे व्रत त्यांनी आमरण पाळले.त्यांचे चारित्र्य अतिशय शुद्ध होते.भव्य शरीर,काळा वर्ण, चेहर्यावर देवीचे व्रण असे असूनही त्यांचा चेहरा नेहमी शांत, सौम्य, व प्रेमळ दिसे. ते नेहमी आनंदी असत. रात्र -दिवस धावपळ, संघाच्या कामाची चिंता, पैश्याची चणचण, साधनाची अडचण, असे सगळे असूनही ते सदा-सर्वदा प्रसंन्न असत. ती प्रसन्नता ते चहुकडे फैलवत. त्यांचे बोलणे साधे, सोपे पण परिणामकारी असायचे. व राहणी अतिशय साधी होती.

डॉ. हेडगेवार हे लक सोडून गेले असे आपणास वाटते.पण खरे पाहिले असता ते आजही जिवंत आहेत.कारण डॉ. हेडगेवार म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे डॉ. हेडगेवार !  आपण जर संघाच्या शाखेत गेलो, तेथील कार्यक्रमात समरस झालो, संघाचे काम जर आपण खर्या तळमळीने व तनमनधन पुर्वक केले तर डॉ.आज हि आपनाला दिसतील. ते आपल्याशी बोलतील, ते आपल्या हृदयात येउन बसतील.मात्र त्यासाठी आपण खर्या अर्थाने स्वयंसेवक बनले पाहिजेत.!!!

Source : Marathi Unlimited

Like
Like Love Haha Wow Sad Angry
51




, , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu