उन्हाळ्यासाठी काही खास पेय !




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Summer Drinks :

This post contains some special drinks which is made for summer season only and used as a cooling drinks. In india lots of fruits are available. it is one of the best and the healthiest option to beat summer heat.

उन्हाळ्या साठी काही टिप्स !

गुलकंद पाण्या बरोबर प्यायल्याने जळजळ व गर्मी शांत होते. कपाळावर गुलाबजल व गोपी चन्दनाचा लेप लावल्याने नाक फुटणे बंद होते.  गर्मी ने डोके दुखत असल्यास गुलाब जल घातल्याने डोकेदुखी थांबते.  गुलाबजल प्यायल्याने पोटाची आग शांत होते. गुलाबाचे अत्तराचा वास घेतल्याने डोके दुखी थांबते.  फळांमधून शरीराला व्हिटामिन्स  मिळतात. फळांच्या रसात आणखी काही घटक पदार्थ घालून त्याची चव जास्त वाढविता येते.शरिरात ताकत राहते व हे सर्व रस प्यायल्यामुळे कातडीच्या रोगांपासून बचाव होतो.उन्हाळंयात निरनिराळ्या चवींची नवीन व स्वादिष्ट पेये हवीहवीशी वाटतात.

उन्हाळ्यासाठी काही खास पेय !

cocktail summer drinks

फळांचे सरबत :- १ अननस , २ संत्री, २ मोसंबी, २ निंबू

कृती:- सर्वांचा रस काढून मोजावा. रसाच्या दीडपट साखर घेऊन त्यात थोडे पाणी घालून पाक करून घ्यावा. थंड झाल्यावर वरील रस बॉटल मध्ये भरावा. तो १५ ते २० दिवस सहज टिकतो. आयते वेळी थंड पाण्यात घालून सरबत घेता येते, त्यात किंचित मीठ घातले तरी चालेल.

खस सरबत :- साखर व पाणी एकत्रित करून गरम करा त्यास चांगली उकळी येऊ द्या, थंड झाल्यावर गाळून घ्या. त्यात खस इंसेस व रंग घाला पाहिजे तेव्हा थंड पाण्यात सरबत घालून प्या.

अननसाची लस्सी !
साहित्य :- ताक किंवा दही, अननसाचे तुकडे, विलाईचि पूड. किंचित साखर
कृती :- अननसाचा रस काढून सर्व एकत्रित करून मिक्सर काढा,त्यात बर्फ घालून ग्लास मध्ये लस्सी द्या, त्याला छान सुगंध येतो .

कैरीचे पन्हे :
कैरीची साले काढून किसून घ्या.थंड पाण्यात कुस्करून गाळून घ्या. त्यात साखर विलाइचीपूड टाका. किंचित मीठ व बर्फ घालून प्यायला द्या

चिंचेचे सरबत !
वाळलेली चिंच घ्यावी त्यांतील चिंचोके काढून घ्यावे नंतर त्यात पाणी घालून भिजत घालावी. काही वेळाने चिंच कुस्करून घ्यावी व चिंच काढून घ्यावी.चिंचेच्या पाण्यात साखर,मीठ, सोप व जिरे पूड टाकावी व बर्फ टाकून पिण्यास द्यावे.

refreshing summer drinks

* टोमाटो व काकडी
साहित्य -: तीन कप टोमाटोचा ज्यूस दन चमचे लिंबाचा रस,दोन लवंगा एक दालचिनी काडी, एक लहान कांदा किसून, अर्धा कप काकडीचा कीस, चवीपुरते मीठ, तीन चमचे साखर व बर्फाचे क्युब्ज .
कृती -: कांदा व काकडी किसून घ्यावी, व्र्फ सोडून सर्व घटक पदार्थ एकत्र करून फ्रीज मध्ये एकतास भर ठेवावेंन्त्र गाळून घ्यावे. सर्व्ह करण्यापूर्वी चांगले ढवळून प्रत्येक ग्लासात घालून बर्फाचा क्युब्ज धालाव्यात  व हे मिश्रण ओतावे.

* कलिंगडचे सरबत
साहित्य -: एक कलिंगड, चवीपुरते मीठ, दालचिनी/ मिरपूड , साखर एका लिंबाचा रस.
कृती -: कलिंगड कापून त्याच्या लालबुंद मधल्या भागातील गर स्कुपने( गोल आकाराचा चमचा आईस्क्रीम काढण्याचा ) काढून ते गोळे एका बाउल मध्ये घालून फ्रीज मध्ये ठेवावे. आणि मग उरलेल्या कलिंगडचा लाल भाग अगदी बारीक चिरून त्याच्या बिया काढून त्याचा रस काढून तो गाळून घ्यावा.  त्यात मीठ,साखर, दालचिनी पूड किंवा मिरपूड,लिंबाचा रस घालून तासभर फ्रीज मध्ये ठेऊन थंड करावे.सर्व्ह करतेवेळी प्रत्येक ग्लासात थंड सरबत काढून ठेवलेल्या कलिंगड च्या तुकड्यातील एक दोन तुकडे त्या सरबतात घालून प्यायला द्यावे. या सरबतात बर्फ क्यूब्ज घालू नये.

*  सफरचंदा चे पेय
साहित्य -: २५० ग्राम सफरचंद चवी पुरती साखर, एक लिंबू, मीठ.
कृती -:  स्वच्छ धुवून साला सकट बारीक चिरून घ्यावी. साखरेवर लिंबाची साल किसून घ्यावी. व ती सफरचंदात मिसळावी. तीन कप उकळीचे पाणी त्यातओतावे व झाकण घालून ठेवावे. थंड झाल्यावर गाळून घ्यावे.चवी पुरती साखर घालावी. मीठ रुची प्रमाणे घालावे किंवा नाही घातले तरी चालेल.  सर्व्ह करण्यापूर्वी चांगले ढवळून बर्फ घालून लहान लहान ग्लासातून सर्व्ह करावे.

* जिंजरेल
साहित्य-: एक किलो प्रत्येकी बेताच्या आकाराचा एक कप आल्याचा रस व लिंबाचा रस त्याच कपाने मोजून चार कप पाणी .
कृती -: साखर व पाणी एकत्रित करून साखर पाण्यात चांगली मिसळू द्यावी. ते पानी पाच ते सात मिनिटे उकळावे. गार झाल्यावर आल्याचा रस व लिंबाचा रस गाळून व्यवस्थित  मिसळावा. हे टिकाऊ करण्यासाठी दोन चमचे पाण्यात अर्धा चमचा पोट्यशियम मेटाबाय सल्फाईड गाळून ते मिश्रण त्या रसात मिसळावे. सर्व्ह करताना उंच ग्लासमध्ये दोन चमचे करड बर्फ व थोडा जिंजरेल सोडा किंवा पाणी गाळून द्यावे.

9 healthy summer drinks for you, Refreshing drinks for summer care, health tips on summer. Jinjrel, Apple Juice, watermelon,  tomato juice all are really healthy drinks. all above drinks keeps you fresh and healthy in summer. It goes round and round spreading its golden fingers on the ground the whole day. Yes, summer time is here with Sun in its full swing to spread heat all around.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा