१९ च्या दशक मध्ये प्रसिद्ध असलेला खलनायक म्हणजे संजय दत्त. त्याचा खलनायकाचा तो रोल आपण कधीच विसरू शकत नाही. आज त्याच खलनायकाला म्हणजेच संजय दत्तला १९९३च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आणि संजय दत्त आता तुरुगात जाणार . तल्लब २० वर्षे चालेला हा खटला आज संपला . संजय दत्तला शिक्षा सुनावल्यावर संपूर्ण बॉलिवूडला दुःख झालं आहे. सर्वच तारकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत . त्याला झालेल्या शिक्षे मुळे संपूर्ण बॉलीवूड भावूक झाले आहे. आणि आरोपी याकूब मेमनची फाशी कायम ठेण्यात आलेली आहे. २००७ ला संजय दत्तसह १०० आरोपींना शिक्षा सुनावली होती. तसेच बाकी १० दोषींची फाशीची शिक्षा माफ करून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. टाडा कोर्टाने ११ जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मात्र या १० आरोपींची फाशी रद्द केली आहे.