विद्यार्थ्यांना दावणीला बांधून आपल्या मागण्या मान्य करून घेणासाठी प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्कार टाकणाऱ्या कॉलेज शिक्षकांना विद्यापीठाने कारवाईचा दणका दिला . याला काही तास उलटत नाहीत तोच , आपल्या मागण्यांसाठी बारावीच्या पेपर तपासणीच्या कामावर शिक्षक संघटनांनी बहिष्कार घातला आहे . यामुळे काम पूर्णतः बंद झाले असून , बारावीचा निकाल टांगणीला लागला आहे . सध्यातरी सरकारने या विषया मध्ये दखल घेतलेली नाही. शिक्षण संस्थे मध्ये असे गचाळ कारभार आपण नेहमीच बघत असतो.
आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेने बारावीच्या पेपर तपासणीच्या कामावर बहिष्कार घातला आहे . यामुळे पेपर तपासणीची प्रक्रिया पूर्णतः खोळंबली आहे . आणि ती केव्हा पर्यंत बंद राहणार याचा काही नेम नाही. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये मॉडरेटरच्या बैठका नियमित होत होत्या . मात्र , आता १ मार्चपासून या बैठकांवरही बहिष्कार घातल्यामुळे कामकाज पूर्ण बंद पडले आहे . शासनाने अद्याप याची कोणतीही दखल घेतलेली नाही . तसेच शिक्षकही मागे हटण्यास तयार नाहीत . त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे . सरकारने या बाबतीत विशेख दखल घेतली नाही तर परिस्तिति अजूनच गंभीर होणार. आणि बारावीचा निकाल अजूनच उशिरा होणार हे मात्र नक्क.